Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 707
________________ महापुराण (४७-३१३ तयूयं संसृतेर्हेतुं परित्यज्य गृहाश्रमम् । दोषदुःखजरामृत्युं पापप्राय भयावहम् ॥ ३१३ भक्तिमन्तः समासन्नविनेया विदितागमाः । गुप्त्यादिषड्विधं सम्यगनुगत्य यथोचितम् ॥ ३१४ प्रोक्तोपेक्षादिभेदेषु वीतरागादिकेषु च । पुलाकादिप्रकारेषु व्यपेतागारकेषु च ॥ ३१५ प्रमत्तादिगुणस्थानविशेषेषु च सुस्थिताः । निश्चयव्यवहारोक्तमुपाध्वं मोक्षमुत्तमम् ॥ ३१६ तथा गृहाश्रमस्थाश्च सम्यग्दर्शनपूर्वकम् । दानशीलोपवासाहदादिपूजोपलक्षिताः ॥३१७॥ आधिकादशोपासकवताः सुशुभाशयाः। सम्प्राप्तपरमस्थानसप्तकाः सन्तु धीषनाः ॥३१८॥ इति तत्तत्वसन्दर्भगर्भवाग्विभवाद्विभोः । ससभो भरताधीशः सर्वमेवममन्यत ॥ ३१९ त्रिज्ञाननेत्रसम्यक्त्वशुद्धिभाग्देशसंयतः । स्रष्टारमभिवन्द्यायाकलासानगरोत्तमम् ॥ ३२० जगत्रितयनाथोऽपि धर्मक्षेत्रेष्वनारतम् । उप्त्वा सद्धर्मबीजानि न्यषिञ्चद्धर्मवृष्टिभिः ॥ ३२१ म्हणून तुम्ही संसारभ्रमण करण्यास कारण असलेल्या गृहाश्रमाचा त्याग करा. कारण हा दोषांनी भरलेला आहे, दुःखें, वृद्धावस्था व मरण याने युक्त आहे. पापाने भरलेला आणि भय उत्पन्न करणारा आहे ॥ ३१३ ॥ तुम्ही भक्तियुक्त अन्तःकरणाचे आहात, निकटभव्य आहात व जिनशास्त्राची माहिती तुम्हाला झाली आहे. तुम्ही ३ गुप्ति, ५ समिति, १० धर्म, १२ अनुप्रेक्षा, क्षुधादि बावीस परीषहांना जिंकणे, व सामायिकादि पाच प्रकारचे चारित्र पाळणे या गुप्त्यादि सहांचे यथायोग्य पालन करा ॥ ३१४ ॥ पूर्वी सांगितलेले जे उपेक्षादिभेदानी युक्त, वीतरागादिक भेदांनी युक्त, ज्यानी गृहत्याग केलेला आहे असे जे पुलाकादि मुनींचे प्रकार आहेत व जे प्रमत्तविरतादि मुनींच्या गुणस्थानात उत्तम रीतीने स्थिर झाले आहेत अशा मुनिवर्यानी निश्चयमोक्ष व व्यवहार मोक्षाची आराधना करावी ॥ ३१५-३१६ ॥ तसेच जे गृहाश्रमात आहेत त्यांनी सम्यग्दर्शनपूर्वक दानशील, उपवास व अरिहंतादिक पूजेमध्ये तत्पर राहावे. ते दर्शनप्रतिमादिक अकरा प्रतिमांचे धारक होऊन उत्तम शुभ परिणामांचे धारक होवोत व ते बुद्धिमान् श्रावक सज्जाति, सद्गृहस्थत्व वगैरे सात परमस्थानांचे धारक होवोत ॥ ३१७-३१८॥ ___ याप्रमाणे जीवादिक तत्त्वांची रचना जीमध्ये भरली आहे अशा त्या प्रभूच्या वाणीच्या सामर्थ्याने भरतेश्वराने सर्व सभेसह प्रभूचा उपदेश पूर्ण मान्य केला ॥ ३१९ ॥ मति, श्रुत आणि अवधि ज्ञानरूपी तीन नेत्रांचा धारक व सम्यकत्वशुद्धीला धारण करणारा, देशसंयमी अशा भरताने आदिब्रह्मा अशा भगवंताला नमस्कार केला व कैलासावरून आपल्या नगराकडे आला ।। ३२० ॥ ___ त्रैलोक्यनाथ आदिभगवंतानी सर्व धर्मक्षेत्रात जिनधर्मरूपी बीजांची निरन्तर पेरणी केली व धर्मकथनरूपी जल वारंवार शिंपडले ।। ३२१ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720