Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 711
________________ ७००) महापुराण (४७-३५१ तोषात्सम्पादयामासुः सम्भूयानन्दनाटकम् । सप्तमोपासकाद्यास्ते सर्वेऽपि ब्रह्मचारिणः ॥ ३५१ गार्हपत्याभिधं परमाहवनीयनामकम् । दक्षिणाग्नि ततो न्यस्य सन्ध्यासु तिसषु स्वयम् ॥ ३५२ तच्छिखित्रयसान्निध्ये चक्रमातपवारणम् । जिनेन्द्रप्रतिमाश्चावस्थाप्य मन्त्रपुरस्सरम् ॥ ३५३ तास्त्रिकालं समभ्यर्च्य गृहस्थैविहितादराः । भवतातिथयो यूयमित्याचरव्युरुपासकान् ॥ ३५४ स्नेहादिष्टवियोगोत्थः प्रदीप्तः शोकपावकः । तदा प्रबुद्धमप्यस्य चेतोऽधाक्षीदधीशितुः॥ ३५५ गणी वृषभसेनाख्यस्तच्छोकापनिनीषया । प्राक्रस्त वक्तुं सर्वेषां स्वेषां व्यक्तां भवावलिम् ॥३५६ जयवर्मा भवे पूर्वे द्वितीयेऽभन्महाबलः। ततीये ललिताडाख्यो वनजङ्गचतुर्थके ॥ ३५७ पञ्चमे भोगभूजोऽभूत् षष्ठेऽयं श्रीधरोऽमरः । सप्तमे सुविधिः क्ष्माभृदष्टमेऽच्युतनायकः ॥ ३५८ नवमे वज्रनाभीशो दशमेऽनत्तरान्त्यजः । ततोवतीर्य सर्वेन्द्रवन्दितो वृषभोऽभवत् ॥ ३५९ धनश्रीरादिमे जन्मन्यतो निर्णामिका ततः। स्वयम्प्रभा ततस्तस्माच्छीमत्यार्या ततोऽभवत् ॥३६० स्वयम्प्रभः सुरस्तस्मादस्मादपि च केशवः । ततः प्रतीन्द्रस्तस्माच्च धनदत्तोऽहमिन्द्रताम् ॥ ३६१ गतस्ततस्ततः श्रेयान दानतीर्थस्य नायकः । आश्चर्यपञ्चकस्यापि प्रथमोऽभत्प्रवर्तकः ॥३६२ सातव्या ब्रह्मचर्य प्रतिमेचे घारक अशा ब्रह्मचारी श्रावकापासून आरंभत्यागी, परिग्रहत्यागी, अनुमतित्यागी आणि उद्दिष्टाहारत्यागी अशा पांच प्रतिमाधारक श्रावकांनी तीनही संध्यासमयी प्रथम गार्हपत्य, नंतर आहवनीय आणि तिसरा दक्षिणाग्नि असे तीन अग्निक्रमाने स्थापावेत व या तीन अग्नीच्या जवळ चक्र, छत्र आणि जिनप्रतिमांची स्थापना करावी व त्यांची नित्त्य तीन वेळा आदराने गहस्थानी पूजा करावी. त्यामळे तुम्ही गहस्थांचे आदरणीय अतिथि व्हाल. असा उपदेश केला गेला ।। ३५१-३५४ ।। त्यावेळी जरी भरतेश्वराचे मन अतिशय प्रबुद्ध होते तथापि स्नेहाने इष्ट वियोगापासून तो प्रदीप्त असा शोकरूपी अग्नि प्रकट झाला व त्यामुळे त्यांचे मन दाहयुक्त झाले ।। ३५५ ।। त्यावेळी भरतेशाचा शोक नाहीसा करण्याच्या इच्छेने सर्वांची भवावलि वृषभसेन गणधरानी स्पष्ट सांगण्यास प्रारंभ केला ॥ ३५६ ॥ पहिल्या भवात जयवर्मा राजपुत्र, दुसऱ्या भवात महाबल विद्याधर राजा, तिसऱ्या जन्मात ललितांगदेव, या नंतर चौथ्या भवी वज्रजंघ राजा, पांचव्या भवात भोगभूमिज, सहाव्यात श्रीधरदेव, सातवा जन्म सुविधिराजाचा, आठव्या जन्मी अच्युतेन्द्र, नवव्या भवात वज्रनाभिराजा, दहाव्या जन्मात सर्वार्थसिद्धिअनुत्तरात अहमिन्द्र. तेथून अवतरून सर्व इन्द्रानी वन्दित वृषभजिनेश्वर झाले. याप्रमाणे आदिभगवंताचे अकरा भवांचे वर्णन आहे ।। ३५७-३५९ ॥ दानतीर्थ नामक श्रेयांसराजाचे पूर्वभव वर्णन-पहिल्या जन्मात धनश्री, या नंतर दुसरा जन्म निर्णामिकेचा, तिसऱ्या जन्मी स्वयंप्रभादेवी, तदनंतर चौथ्या जन्मात श्रीमतीवज्रजंघराजाची पत्नी, पांचव्या जन्मी भोगभूमीत आर्या, साहव्या जन्मी ऐशान स्वर्गात स्वयम्प्रभ देव, सातव्या जन्मी केशवनामक राजपुत्र, आठव्या जन्मी प्रतीन्द्र, नवव्या जन्मात धनदत्तश्रेष्ठी, दहाव्या जन्मी अहमिन्द्र व अकराव्या जन्मात दानतीर्थाचा प्रथम नायक व आश्चर्यपंचकाचाही पहिला प्रवर्तक श्रेयांस राजा झाला ॥ ३६०-३६२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720