Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 705
________________ ६९४) महापुराण आर्यिकाभिरभिष्ट्रयमाननानागुणोदयः । दृढव्रतादिभिर्लक्ष त्रयोक्तैः श्रावकैः श्रितः ॥ २९६ श्राविकाभिः स्तुतः पञ्चलक्षाभिः सुव्रतादिभिः । भावनादिचतुर्भेददेवदेवीडितक्रमः ॥ २९७ चतुष्पदादिभिस्तिर्यग्जातिभिश्चाभिषेकितः । चतुस्त्रिंशदतीशेष विशेषैर्लक्षितोदयः ॥ २९८ ॥ आत्मोपाधिविशिष्टावबोधदृक्सुखवीर्यसत् । देहसौन्दर्यवान्स्वोक्त सप्तकस्थानसङ्गतः ॥ २९९ प्रातिहार्यष्टकोद्दिष्टनष्टघातिचतुष्टयः । वृषभाद्यन्वितार्थाष्टसहस्राह्वयभाषितः ॥ ३०० विकासित विनेयाम्बुजाव लिर्वचनांशुभिः । संवृताञ्जलिपङ के जमुकुलेनाखिलेशिना ॥ ३०१ भरतेन समभ्यर्च्य पृष्टो धर्ममभाषत । ध्रियते धारयत्युच्चैविनेयान्कुगतेस्ततः ॥ ३०२ धर्म इत्युच्यते सद्भिश्चतुर्भेदं समाश्रितः । सम्यग्दृक्ज्ञानचारित्रतपोरूपः कृपापरः ॥ ३०३ जीवादिसप्तके तत्त्वे श्रद्धानं यत्स्वतोऽञ्जसा । परप्रणयनाद्वा तत्सम्यग्दर्शनमुच्यते ॥ ३०४ (४७-२९६ चार पाय ज्याना आहेत व पंख ज्यांना आहेत असे जे तिर्यंचजातीचे पशु आणि पक्षी त्यानी प्रभु सेविले गेले. प्रभूंच्या ठिकाणी जे चौतीस अतिशय प्रकट झालेले होते त्यांनी त्यांचे ऐश्वर्य प्रकट झाले होते ।। २९८ ॥ भगवंताना आत्म्यापासूनच विशिष्ट ज्ञान म्हणजे केवलज्ञान, केवलदर्शन, अनन्तसुख व अनन्तवीर्य हे गुण प्राप्त झालेले होते आणि ते देहसौन्दर्यानें शोभत होते. सज्जाति, सद्गृहस्थत्व, आदिक सात परमस्थानें ज्यांचे वर्णन त्यानीच केले होते ते त्या सप्तस्थानांनी युक्त होते ।। २९९ ॥ अशोकवृक्ष, देवनगारे वाजणे, पुष्पवृष्टि होणे वगैरे आठ प्रातिहार्यानी प्रभु युक्त होते पण त्यानी ज्ञानावरणादिक चार घातिकर्मांचा नाश केला होता व वृषभादिक एक हजार नांवानी प्रभू इन्द्रादिकाकडून वर्णिले गेले आहेत. आपल्या वचनकिरणानी ज्यांनी भव्यरूपी कमलांना प्रफुल्लित केले होते अशा प्रभूला षट्खंडपृथ्वीतील सर्व राजांचे प्रभु अशा भरताने आपली ओंजळरूपी कमळकळीच्याद्वारे वन्दन केले व त्यांचें पूजन करून धर्माचे स्वरूप विचारले. तेव्हां भगवान असे म्हणाले ।। ३००-३०१ ॥ जो भव्यजनाना कुगतिपासून उच्च स्थानी ठेवतो, स्थापन करतो त्याला धर्म असे म्हणतात. तो धर्म सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान, सम्यक्चारित्र व सम्यक्तप असा चार प्रकारचा आहे व तो दयेनें पूर्ण भरलेला आहे ।। ३०२-३०३ ।। जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष या सात तत्त्वावर आपण होऊन परमार्थ रीतीने खरी श्रद्धा ठेवणे किंवा गुरू, शास्त्र यांच्या उपदेशाने श्रद्धान ठेवणें यास सम्यग्दर्शन म्हणतात. ते शंका वगैरे दोषांनी रहित आहे व ते सम्यग्दर्शन तीन भावांनी सहित आहे. अर्थात् औपशमिक सम्यग्दर्शन, क्षायिक सम्यग्दर्शन आणि क्षायोपशमिक सम्यग्दर्शन असे तीन प्रकारचे आहे. अनन्तानुबन्धी, क्रोध, मान, माया व लोभ तसेच मिथ्यात्त्व, सम्यक्त्व आणि सम्यङमिथ्यात्त्व या सात कर्मप्रकृतींचा पूर्ण नाश झाला म्हणजे क्षायिक सम्यग्दर्शन होते व या सात कर्मप्रकृति आत्म्याच्या ठिकाणी उदयाला न येता उपशम पावल्यामुळे जे सम्यग्दर्शन होते ते उपशम सम्यग्दर्शन होय व अनन्तानुबंधी क्रोध मानादिक चार प्रकृति व मिथ्यात्व प्रकृति आणि सम्यङमिथ्यात्व प्रकृतींचा उदय न होता सम्यवत्त्वप्रकृतीचा उदय होऊन चल, मलिन व अगाढ अशी जी जीवादिक तत्त्वावर श्रद्धा होणें तिला क्षायोपशमिक सम्यक्त्त्व म्हणतात ।। ३०४ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720