Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 704
________________ ४७-२९५) महापुराण शमिता चक्रवर्तीष्टकान्तयाशु सुभद्रया । ब्राह्मोसमीपे प्रव्रज्य भाविसिद्धिश्चिरं तपः ॥ २८८ कृत्वा विमाने सानुत्तरेऽभूत्कल्पेऽच्युतेऽमरः । आदितीर्थाधिनाथोऽपि मोक्षमार्ग प्रवर्तयन् ॥ २८९), चतुरुत्तरयाशीत्या विविद्धिविभूषितः । चिरं वृषभसेनादिगणेशैः परिवेष्टितः ॥ २९० खपञ्चसप्तवाराशिमितपूर्वधरान्वितः। खपञ्चैकचतुर्मयशिक्षकर्मुनिभिर्वृतः ॥ २९१ तृतीयज्ञानसन्नेत्रैः सहस्रनवभिर्युतः । केवलावगमविशतिसहस्रः समन्वितः ॥ २९२ खद्वयर्तुखपक्षोरुविक्रिद्धिविद्धितः । खपञ्चसप्तपक्षकमिततूर्यविदन्वितः ॥ २९३ तावद्धिर्वादिभिर्वन्द्यो निरस्तपरवादिभिः । चतुरष्टखवार्यष्टमितैः सर्वैश्च पिण्डितैः ॥ २९४ संयमस्थानसम्प्राप्तसम्पद्भिस्सद्भिरचितः । खचतुष्केन्द्रियान्युक्तपूज्यबाहम्यायिकादिभिः॥२९५ त्यावेळी चक्रवर्तीची आवडती राणी असलेल्या सुभद्रेने तिचा शोक शान्त केला. तेव्हां तिने ब्राह्मी आबिकेजवळ दीक्षा घेतली. जिला पुढील कांही भवांनी मुक्ति प्राप्त होईल अशा तिने दीर्घ कालपर्यन्त तपश्चरण केले ॥ २८८ ।। ___ यानंतर ती अच्युतकल्पातील अनुत्तरविमानात देव झाली. श्रीआदितीर्थंकरांनी देखिल मोक्षमार्गाचे प्रवर्तन चालू केले ॥ २८९ ॥ नाना प्रकारच्या ऋद्धीनी विभूषित अशा वृषभसेनादि चौयाऐंशी गणधरानी आदि भगवान् दीर्घकालपर्यन्त वेष्टित होऊन विहरत होते ॥ २९० ।। ___ चार हजार सातशे पन्नास (४७५०) मुनि चौदा पूर्वाचे ज्ञाते होते. त्यांनी आदि प्रभु युक्त होते आणि चार हजार एकशे पन्नास (४१५०) शिक्षकमुनीनी प्रभु वेष्टित होते. अवधिज्ञानरूपी नेत्राचे धारक अशा नऊ हजार मुनींनी प्रभु युक्त होते व वीस हजार केवलज्ञानी मुनींनी सहित प्रभु विहरत होते ।। २९१-२९२ ॥ वीस हजार सहाशे विक्रियद्धि धारक मुनींनी प्रभु शोभत होते व बारा हजार सातशे पन्नास मनःपर्ययज्ञानी मुनिवर्यानी प्रभू वेढले होते ॥ २९३ ॥ ___ ज्यांनी परवाद्यांचे खण्डन केले आहे अशा १२७५० वादीमुनींनी प्रभुयुक्त होते ॥ २९४ ॥ सर्व मुनिसंख्या चौयाऐंशी हजार चौन्याऐंशी होती. हे सर्वमुनि संयम तपरूपी संपत्तींनी युक्त व सत्पुरुषांनी वन्द्य होते. अशा मुनींनी प्रभु पूजित झाले. तीन लक्ष पन्नास हजार अशा पूज्य ब्राह्मी वगैरे आर्यिकांनी ज्यांच्या गुणांचा उत्कर्ष स्तविला आहे असे प्रभु शोभत होते ।। २९५ ॥ दृढव्रतनामक श्रावक ज्यात मुख्य आहे अशा तीन लाख श्रावकांनी प्रभूचा आश्रय घेतला होता. सुव्रताश्राविका ज्यात मुख्य आहे अशा पाच लाख श्राविकांनी प्रभु स्तविले जात असत. तसेच भवनवासी, व्यंतर, ज्योतिष्क आणि कल्पवासी देवदेवी प्रभूच्या चरणांची स्तुति करीत असत ।। २९६-२९७ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720