Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 703
________________ ६९२) पदं परं परिप्राप्तुमव्यग्रमभिलाषुकः । विसर्जितसगोत्रादिविनिर्जितनिजे न्द्रियः ॥ २७९ वितजितमहामोहः समजतशुभात्रवः । विजयेन जयन्तेन सज्जयन्तेन सानुजेः ॥ २८० अन्यैश्च निश्चितत्यागैः रागद्वेषाविदूषितैः । रविकीर्ती रविजयोरिदमोऽरिजयाह्वयः ।। २८१ सुजयश्च सुकान्तश्च सप्तमश्चाजितञ्जयः । महाजयोऽतिवीर्यश्च वरञ्जयसमाह्वयः ।। २८२ रविवीर्यस्तथान्ये च तनूजाश्चक्रवर्तिनः । तैश्च सार्धं सुनिविष्णैश्चरमाङगो विशुद्धिभाक् ॥ २८३ एष पात्रविशेषस्ते संबोढुं शासनं महत् । इति विश्वमहीशेन देवदेवस्य सोऽर्पितः ॥ २८४ कृतग्रन्थपरित्यागः प्राप्तग्रन्थार्थसङग्रहः । प्रकृष्टं संयमं प्राप्य सिद्धसप्तद्धर्वाद्धितः ॥ २८५ चतुर्ज्ञानामलज्योतिर्हताततमनस्तमाः । अभूद्गणधरो भर्तुरेकसप्ततिपूरकः ॥ २८६ सुलोचनाप्यसंहार्यशोका पतिवियोगतः । गलिता कल्पवल्लीव प्रम्लानामरभूरुहात् ॥ २८७ महापुराण ( ४७-२७९ यानंतर परमपद - उत्कृष्ट मुक्तिपदाची प्राप्ति एकाग्रतेने करून घेण्याची इच्छा जयकुमाराने मनात धारण केली. त्याने आपल्या गोत्रजांचा व मित्रादिकांचा त्याग केला. आपली सर्व इन्द्रिये त्याने जिंकली व महामोहाला त्याने हाकालून दिले आणि शुभ-पुण्यरूप परिणामानी शुभ अशा कर्मास्रवाला मिळविले. ज्यानी परिग्रहांचा त्याग करण्याचा निश्चय केला आहे, ज्यांचे मन रागद्वेषानी दूषित झाले नाही असे विजय, जयन्त आणि संजयन्त असे आपले भाऊ आणि इतर घर्मबंधु, तसेच रविकीर्ति, रविजय, अरिंदम, अरिञ्जय, सुजय, सुकान्त, अजितञ्जय, महाजय, अतिवीर्य, वरञ्जय, रविवीर्य असे चक्रवर्तीचे विरक्त झालेले पुत्र या सर्वासह हा तद्भव मोक्षगामी आणि निर्मल परिणाम धारण करणारा जयकुमार आदिप्रभुकडे गेला ।। २७९-२८३ ।। त्यावेळी हे प्रभो, देवांचे देव अशा आपले महान् धर्मशासन धारण करण्यासाठी हा पात्रविशेष आपणास अर्पण केला आहे असे चक्रवर्ती भरताने प्रभूला म्हणून जयकुमाराला त्याने अर्पण केले ॥ २८४ ॥ त्यावेळी जयकुमाराने सर्व ग्रंथांचा बाह्याभ्यन्तर परिग्रहांचा त्याग केला व ग्रंथांच्या अर्थांचा संग्रह केला. अर्थात् जिनशास्त्रांच्या अर्थांचे जीवादिक सप्ततत्त्वांचे व नवपदार्थाचे ज्ञानाचा खूप संग्रह प्राप्त करून घेतला. उत्कृष्ट संयमाला प्राप्त करून हे जयकुमारमुनि सिद्ध झालेल्या सातऋद्धीनी वृद्धिंगत झाले. यानी मति, श्रुत, अवधि आणि मन:पर्यय या चार ज्ञानांच्या निर्मल प्रकाशांनी अन्तःकरणातील विस्तृत अज्ञानरूपी अंधार पूर्ण नष्ट केला व ते आदि भगवंताचे एकाहत्तरावे गणधर झाले ।। २८५-२८६ ॥ Jain Education International सुलोचनेला पतीच्या वियोगाने निवारण न करता येईल असा शोक झाला व ती कल्पवृक्षापासून गळून खाली पडलेल्या कल्पलते प्रमाणे सुकून गेली ॥ २८७ ॥ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 701 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720