Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(४७-२५९
अमरेन्द्र सभामध्ये शीलमाहात्म्यशंसनम् । जयस्य तत्प्रियायाश्च प्रकुर्वति कदाचन ॥ २५९ श्रुत्वा तदादिमे कल्पे रविप्रभविमानजः । श्रीशा रविप्रभाख्येन तच्छीलान्वेषणं प्रति ॥ २६० प्रेषिता काञ्चना नाम देवी प्राप्य जयं सुधीः । क्षेत्रेऽस्मिन्भारते खेचरानेरुत्तरदिक्तटे ॥ २६१ मनोहराख्य विषये राजा रत्नपुराधिपः । अभूत्पिङ्गलगान्धारः सुखदा तस्य सुप्रभा ॥ २६२ तयोविद्युत्प्रभा पुत्री नमेर्भार्या यदृच्छया । त्वां नन्दने महामेरौ क्रीडन्तं वीक्ष्य सोत्सुका ॥ २६३ तदाप्रभृति मच्चित्तेऽभवस्त्वं लिखिताकृतिः । त्वत्समागममेवाहं ध्यायन्ती दैवयोगतः ॥ २६४ दृष्टवत्यस्मि कान्तास्मिन्निगं सोढुमक्षमा । इत्यपास्तोपकण्ठत्वात्स्वकीयान्स्मरविह्वला ॥ २६५ स्वानुरागं जये व्यक्तमकरोद्विकृतेक्षणा । तदुष्टचेष्टितं दृष्ट्वा मा मंस्थाः पापमीदृशं ॥ २६६ सोदर्या त्वं ममादायि मयामुनिवराव्रतम् । पराङ्गनाङ्गसंसर्गसुखं मे विषभक्षणम् ॥ २६७ महीशेनेति सम्प्रोक्ता मिथ्या सा कोपवेपिनी । उपात्तराक्षसीवेषा तं समुद्धृत्य गत्वरी ॥ २६८ पुष्पावचयसंसक्तनृपकान्ताभितजिता । भीत्वा तच्छोलमाहात्म्यात्काञ्चनाऽदृश्यतां गता ॥ २६९
त्यावेळी देवेन्द्र सभेमध्ये जयकुमार व त्याची प्रिया जी सुलोचना या उभयांचे शीलाचे महत्त्व वर्णन करीत असता ते सौधर्मस्वर्गातील रविप्रभविमानाचा स्वामी अशा रविप्रभदेवाने ऐकले व जयकुमाराच्या शीलाचे परीक्षण करण्यासाठी कांचनमाला नांवाची देवी पाठविली, ती जयकुमाराकडे आली. तेव्हा ती त्याला याप्रमाणे आपला वृत्तान्त सांगू लागली. या भरतक्षेत्रात विजयार्धपर्वताच्या उत्तरदिशेच्या तटावर मनोहर नामक देशात रत्नपुर नगराचा अधिपति पिंगलगांधार नांवाचा राजा होता. त्याच्या सखदायक राणीचे नां
चा राजा होता. त्याच्या सुखदायक राणीचे नांव सुप्रभा असे होते. या उभयताना विद्युत्प्रभा नामक कन्या झाली. ती नमिविद्याधराची पत्नी. एके वेळी महामेरुपर्वतावरील नंदनवनात हे जयकुमारा! क्रीडा करीत असता तुला मी पाहिले तेव्हापासून तुझ्याविषयी मी उत्कंठित झाल्ये आहे. तेव्हापासून तुझी आकृति माझ्या मनामध्ये कोरल्याप्रमाणे लिहिली गेली आहे व तुझ्या समागमाचे मी ध्यान करीत आहे. आज तुला मी दैवयोगाने पाहिले आहे. मी आता मदनाचा वेग सहन करण्यास असमर्थ झाल्ये आहे. मी माझ्यापासून इतर लोकाना दूर केले आहे. मी कामवेदनेने पीडित झाल्ये आहे असे म्हणून ती त्याला वाकड्या नजरेने पाहू लागली व आपला अनुराग जयकुमारावर तिने व्यक्त केला. तिची ती दूषित चेष्टा पाहून जयकुमार म्हणाला तू असला पापी विचार मनात आणू नकोस. तू माझी बहिण आहेस. मी मुनिवर्यापासून व्रत घेतले आहे. परस्त्रीच्या अंगापासून होणारे सुख म्हणजे मी विषभक्षणाप्रमाणे समजतो. याप्रमाणे राजा जयकुमाराने जेव्हा असे भाषण केले तेव्हा ती खोटया रागाने थर थर कापू लागली. तिने राक्षसीचा वेष घेतला व त्याला उचलून ती वेगाने निघाली. परंतु पुष्पे वेचण्यात तत्पर झालेल्या सुलोचनेने जेव्हा तिची खरडपट्टी केली तेव्हा तिच्या शीलमाहात्म्यामुळे ती कांचनदेवी भ्याली व ती अदृश्य झालो ।। २५९-२६१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org