Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 708
________________ ४७-३३१) महापुराण सतां सत्फलसम्प्राप्त्यै विहरन्स्वगणैः समम् । चतुर्दशदिनोपेतसहस्राब्दोनपूर्वकम् ॥ ३२२ लक्ष कैलासमासाद्य श्रीसिद्धशिखरान्तरे । पोर्णमासीदिने पौषे निरिच्छः समुपाविशत् ॥ ३२३ तदा भरतराजेन्द्रो महामन्दरभूधरम् । आप्राग्भारं व्यलोकिष्ट स्वप्ने दैर्येण संस्थितम् ॥ ३२४ तदैव युवराजोऽपि स्वर्गादेत्य महौषधि । द्रुमं छित्वा नृणां जन्मरोगं स्वर्यान्तमैक्षत ॥ ३२५ कल्पद्रुममभीष्टार्थ दत्वा नृभ्यो निरन्तरम् । गृहेट् निशामयामास स्वर्गप्राप्तिसमुद्यतम् ॥ ३२६ रत्नद्वीपं जिघाभ्यो नानारत्नकदम्बकम् । प्रादायाभ्रगमोधुक्तमद्राक्षीत्सचिवानिमः ॥ ३२७ वज्रपञ्जरमुद्भिद्य कैलासं गजवैरिणम् । उल्लङघयितुमुद्यन्तं सेनापतिरवक्षत ॥ ३२८ आलुलोके बुधोऽनन्तवीर्यः श्रीमानजयात्मजः । यान्तं त्रैलोक्यमाभास्य सतारं तारकेश्वरम् ॥३२९ यशस्वतीसुनन्दाभ्यां साद्धं शक्रमनःप्रियाः। शोचन्तीश्चिरमद्राक्षीत्सुभद्रा स्वप्नगोचराः ॥३३० ___सज्जनाना धर्मफलांची प्राप्ति व्हावी म्हणून आपल्या सर्वद्वादशगणासह प्रभूनी विहार केला. तो त्यांचा विहार हजार वर्षे व चौदा दिवस ज्यात कमी आहेत अशा एक लक्ष पूर्व वर्षेपर्यन्त झाला. यानन्तर ते कैलास पर्वतावर श्रीशिखर व सिद्धशिखर याच्या मध्यभागी आले आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी निरिच्छ असे होत्साते विराजमान झाले ।। ३२२-३२३ ॥ त्यावेळी महामेरुपर्वत अतिदीर्घ होऊन प्राग्भारपृथ्वीपर्यन्त जाऊन भिडला आहे असे स्वप्नामध्ये भरतराजेन्द्राने पाहिले ॥ ३२४ ॥ त्याच वेळी युवराजाने अर्थात् अर्ककीर्तीने देखिल एक महौषधिवृक्ष मनुष्यांच्या जन्मरोगांचा नाश करून तो स्वर्गाला जात आहे असे पाहिले ॥ ३२५ ॥ त्याच दिवशी गृहपतिने स्वप्नात असे पाहिले- एका कल्पवृक्षाने मनुष्याना त्यांचे इच्छित पदार्थ निरन्तर दिले आणि तो स्वर्गात जाण्यास उद्युक्त झाला ॥ ३२६ ॥ मुख्यप्रधानाने स्वप्नात असे पाहिले-एक रत्नद्वीप रत्ने ग्रहण करण्याची इच्छा असलेल्या लोकाना अनेक रत्नांचा समूह देऊन आकाशात जाण्यासाठी उद्युक्त झाले आहे ॥ ३२७ ॥ वज्रमय पिंजरा फोडून व कैलासपर्वताला उल्लंघून हत्तींचा शत्रु अर्थात सिंह वर जाण्याकरिता उद्युक्त झाला आहे असे सेनापतीने स्वप्नात पाहिले ॥ ३२८ ॥ लक्ष्मीसंपन्न व विद्वान जयकुमारपुत्र अनन्तर्वार्याने त्रैलोक्याला प्रकाशित करून जाणाऱ्या तारकासहित चन्द्राला स्वप्नात पाहिले ।। ३२९ ॥ इन्द्राच्या मनाला आवडणा-या अशा स्त्रिया यशस्वती व सुनन्दा यांच्यासह शोक करीत आहेत असे सुभद्रेने- भरतेश्वराच्या स्त्रीरत्नाने स्वप्नात पाहिले ॥ ३३० ॥ म. ९१ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720