Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७-२७८)
महापुराण
(६९१
अबिभ्यद्देवता चैवं शीलवत्याः परे न के । ज्ञात्वा तच्छीलमाहात्म्यं गत्वा स्वस्वामिनं प्रति ॥२७० प्राशंसत्सा तयोस्तादृडमाहात्म्यं सोऽपि विस्मयात् । रविप्रभः समागत्य तावुभौ तद्गुणप्रियः ॥२७१ स्ववृत्तान्तं समाख्याय युवाभ्यां क्षम्यतामिति । पूजयित्वा महारत्न कलोकं समीयिवान् ॥ २७२ तया चिरं विहृत्यात्तसम्प्रीतिः कान्तया समम् । निवृत्य पुरमागत्य सुखसारं समन्वभूत् ॥ २७३ अथान्यदा समुत्पन्नबोधिर्मेघस्वराधिपः । तीर्थाधिनाथमासाद्य वन्दित्वानन्दभाजनम् ॥ २७४ कृत्वा धर्मपरिप्रश्नं श्रुत्वा तस्माद्यथोचितम् । आक्षेपण्यादिकाः कृत्वा कथा बन्धोदयादिकाः॥२७५ कर्मनिर्मुक्तसम्प्राप्यशर्मसारप्रबुद्धधीः । शिवङ्करमहादेव्यास्तनुजो जनताप्रियः ॥ २७६ अवार्योऽनन्तवीर्याख्यः शत्रुभिः शस्त्रशास्त्रवित् । आकुमारं यशस्तस्य शौर्य शत्रुजयावधि ॥ २७७ त्यागः सर्वाथिसन्ती सत्यं स्वप्नेऽप्यविप्लुतम् । विधायाभिषवं तस्मै प्रदायात्मीयसम्पदम् ॥ २७८
शीलवती स्त्रियांना पाहून देव देखिल भितात मग इतर कोण बरे भययुक्त होणार नाहीत ।। २७० ॥
जयकुमार व सुलोचना यांच्या शीलाचे माहात्म्य जाणून ती देवता आपल्या स्वामीकडे गेली व तिने त्या दोघांच्या शीलाच्या अपूर्व माहात्म्याची प्रशंसा केली. तो देखिल आश्चर्यचकित झाला. यानंतर रविप्रभ तेथे आला. तो सद्गुणावर प्रेम करणारा होता. त्याने आपली सर्व हकीकत सांगितली व आपण दोघांनी क्षमा करावी असे बोलला आणि अमूल्यरत्नांनी त्यांची त्याने पूजा केली व स्वर्गाकडे निघून गेला ।। २७१-२७२ ।।
या नंतर पुष्कळ विहार करून प्रेमळ असा तो जयकुमार आपल्या स्त्रीसह आपल्या नगराकडे परतला. नगरात येऊन उत्कृष्ट सुखाचा अनुभव घेऊ लागला ॥ २७३ ।।
या नंतर कोणे एके वेळी या जयकुमाराला आत्मज्ञान उत्पन्न झाले व तो रत्नत्रयांचे उत्कृष्ट स्वामी असलेल्या आदिभगवंताकडे आला व अनन्त आनन्दांचे पात्र अशा त्यांना त्याने वन्दन करून त्यांना धर्माविषयी प्रश्न विचारला. यथायोग्य उत्तर प्रभूपासून त्याने ऐकले. या नंतर त्याने प्रभूपासून आक्षेपणी आदिक कथा व कर्माचे बन्ध, उदय, सत्त्व आदिकांचे स्वरूप समजून घेतले. जीत आपल्या मताचे-स्याद्वादादिकांचे स्वरूप वणिले आहे ती आक्षेपणी कथा, जीत परमतांचे खंडन केले आहे ती विक्षेपणी कथा, धर्म व धर्माचे फलाविषयी मनात प्रेम उत्पन्न करणारी कथा संवेजनी कथा होय व संसारापासून विरक्ति उत्पन्न करणारी निर्वेजनी कथा अशा चार कथांचे स्वरूप त्याने जाणून घेतले. यामुळे त्याच्या मनात कर्मापासून पूर्ण मोकळे झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या उत्कृष्ट सुखाचे स्वरूप जाणून घेण्याची बुद्धि उत्पन्न झाली ॥ २७४-२७५ ॥
यानंतर जयकुमाराने शिवंकरा महाराणीच्या अनन्तवीर्य नामक मुलाला त्याचा राज्याभिषेक करून राज्य दिले. हा नूतन राजा शस्त्रे व शास्त्रांचा जाणता होता व लोकप्रिय होता. शत्रु त्यांचे निवारण करण्यास असमर्थ होते व त्याची कीर्ति लहानपणापासूनच सर्वत्र पसरली होती. त्याचा पराक्रम शत्रूवर पूर्ण जय मिळेपर्यन्त होता व तो आपल्या धनदानाने सर्व याचकांची तृप्ति करीत असे. त्याचा सत्यवादीपणा स्वप्नात देखिल भ्रष्ट झालेला नव्हता ॥ २७६-२७८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org