Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७-२०५)
देवीरनुजा श्रेष्ठपितुस्तस्यां तनूद्भवौ । जातौ सागरसेनस्य सागरो दत्तवाक्परः ॥ १९५ ततः समुद्रदत्तश्च सह सागरदत्तया । सुतौ सागरसेनानुजायां जातमहोदधौ ॥ १९६ जातौ सागरसेनायां दत्तो वैश्रवणादिवाक् । दत्ता वैश्रणादिश्च दायादः श्रेष्ठिनः स तु ॥ १९७ भार्या सागरदत्तस्य दत्ता वैश्रवणादिका । सती समुद्रदत्तस्य सा सर्वदयिता प्रिया ॥। १९८ सा वैश्रवणदत्तेष्टा दत्तान्ता सागराह्वया । तेषां सुखसुखेनैव काले गच्छति सन्ततम् ॥ १९९ यशः पालमहीपालमावर्जितमहाधनः । वणिग्धनञ्जयोऽन्येद्युः सद्रत्नैर्दर्शनीकृतैः ॥ २०० व्यलोकष्ट स भूपोऽपि तस्मे सन्मानपूर्वकम् । प्रीत्या घनं हिरण्यादि प्रभूतमवितोचितम् ॥ २०१ विलोक्य तं वणिक्पुत्राः सर्वेऽपि धनमजितुम् । ग्रामे पुरोपकण्ठस्थे सम्भूय निविवेशिरे ॥ २०२ तन्निवेशादथान्येद्युः स समुद्रादिदत्तकः । रात्रौ स्वगृहमागत्य भार्यासम्पर्कपूर्वकम् ॥ २०३ केनाप्यविदितो रात्रावेव सार्थमुपागतः । काले गर्भं विदित्वास्याः पापो दुश्चरितोऽभवत् ॥ २०४ इति सागरदत्ताख्यस्तया भर्त्तृसमागमं । बोधितोऽप्यपरीक्ष्यासौ स्वगेहात्तामपाकरोत् ॥ २०५
महापुराण
(६८३
सर्वदयित श्रेष्ठीचा पिता जो सर्वसमृद्ध श्रेष्ठी त्याच्या धाकट्या बहिणीचे नांव देवश्री होते. तिच्या ठिकाणी सागरसेनाला सागरदत्त व समुद्रदत्त असे दोन पुत्र व सागरदत्ता नांवाची कन्या असे तिघे जन्मले. सागरसेनाची धाकटी बहीण जी सागरसेना तिच्या ठिकाणी ज्यांचा मोठा उत्कर्ष झाला आहे असे दोन पुत्र झाले ।। १९५-१९६ ॥
सागरसेनेच्या ठिकाणी वैश्रवणदत्त हा पुत्र व वैश्रवणदत्ता ही कन्या झाली. हा वैश्रवणदत्त सर्वदयितश्रेष्ठीचा गोत्रज भाऊबंध होता. सागरदत्ताच्या पत्नीचे नांव वैश्रवणदत्ता असे होते व समुद्रदत्ताची भार्या पतिव्रता सर्वदयिता ही होती. सागरदत्ता ही वैश्रवणदत्ताची प्रिय भार्या होती. या सर्वांचा काल सर्वदा अतिशय सुखाने जात असे ।। १९७ - १९९ ॥
ज्याने पुष्कळ धन मिळविले आहे असा धनंजय व्यापारी एके दिवशी यशः पाल राजाकडे आला व त्याने राजाला उत्तम रत्ने भेट म्हणून दिली व राजाचे दर्शन घेतले. राजाने देखिल सन्मानपूर्वक प्रीतीने सुवर्णादिक योग्य धन धनंजयाला दिले ।। २०० - २०१ ॥
हा राजाने त्याचा सन्मान केलेला पाहून बाकीचे वैश्यपुत्र धन मिळविण्यासाठी नगराच्या जवळ असलेल्या ठिकाणी एकत्र जमून गेले ॥ २०२ ॥
Jain Education International
त्या गावच्या मुक्कामांतून एके दिवशी समुद्रदत्त हा रात्री आपल्या घरी आला व त्याने आपल्या पत्नीशी संभोग करून कोणाला न समजेल अशा रीतीने पुनः आपल्या मंडळीत गेला. कालान्तराने तिचा गर्भ वाढू लागला हे जाणून हिचे हे पापरूप दुश्चरण केलें असे सागरदत्ताला वाटले. तेव्हा पतिसमागमाने मला गर्भ राहिला आहे असे तिने सांगितले तरीही त्याविषयी त्याने विचार केला नाही व त्याने तिला आपल्या घरातून बाहेर काढले ।। २०३–२०५ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org