________________
६८४)
( ४७ - २०६
ततः श्रेष्ठिगृहं याता तेनापि त्वं दुराचरः । नास्मद्गृहं समागच्छेत्यज्ञानात्सा निवारिता ॥ २०६ समीपवर्तिन्येकस्मिन्केतने विहितस्थितिः । नवमासावषो पुत्रमलब्धानल्पपुण्यकम् ॥ २०७ तद्विदित्वा कुलस्यैष समुत्पन्नः पराभवः । यत्र क्वचन नीत्वेनं निक्षिपेत्यनुजीविकः ॥ २०८ प्रत्येयः श्रेष्ठिना प्रोक्त; श्रेष्ठिमित्रस्य बुद्धिमान् । श्मशाने साषितुं विद्यामागतस्य रवयायिनः ॥ २०९ बालं समर्पयामास विचित्रो दुरितोदयः । खगोऽसौ जयधामाख्यो जयभामास्य वल्लभा ॥ २१० तौ भोगपुरवास्तव्य जितशत्रुसमाह्वयम् । कृत्वावर्षयतां पुत्रमिव मत्वौरसं मुदा ॥ २११ तदा पुत्रवियोगेन सा सर्वदयिताचिरात् । स्त्रीवेदनंदनान्मृत्वा सम्प्रापज्जन्म पौरुषम् ॥ २१२ ततः समुद्रदत्तोऽपि सार्थेनामा समागतः । श्रुत्वा स्वभार्यावृतान्तं निन्दित्वा भ्रातरं निजम् ॥२१३ श्रेष्ठिनेऽनपराधाया गृहवेशनिवारणात् । अकुप्यन्नितरां कृत्यं कः सहेताविचारितम् ॥ २१४ ज्येष्ठे न्यायागतं योग्ये मयि स्थितवति स्वयम् । श्रेष्ठित्वमयमध्यास्त इति श्रेष्ठिनि कोपवान् ॥ २१५
महापुराण
या नंतर ती सर्वदायिताच्या घरी गेली. पण त्यानेही तूं दुराचरण केलेस म्हणून तू आमच्या घरी येऊ नकोस असे म्हणून त्याने अज्ञानपणाने तिचे निवारण केले. अर्थात् तिला त्याने घरात घेतले नाही ॥ २०६ ॥
तेव्हां तिने एका जवळच्या घरात निवास केला. नऊ महिन्याचा अवधि समाप्त झाल्यावर तिला विपुल पुण्यधारक पुत्र प्राप्त झाला ॥ २०७ ॥
ते जाणून हा पुत्र आपल्या कुलाला कलंक उत्पन्न झाला असे श्रेष्ठीने मानले व त्यानें आपल्या नोकराला याला कोठे तरी नेऊन ठेवून दे असे सांगितले. तेव्हां त्या बुद्धिमान् नोकराने श्मशानात एक श्रेष्ठीचा मित्र विद्याधर विद्यासाध्य करण्यासाठी आला होता. त्याला तो बालक त्याने अर्पण केला. पापाचा उदय विचित्र आहे. ज्याला तो मुलगा दिला त्या विद्याधराचे नांव जयधाम असे होते व त्याच्या पत्नीचे नाव जयभामा असे होते. त्यांनी त्या मुलाला आपला जणु औरस पुत्र आहे असे समजून आनंदाने वाढविले ।। २०८-२११ ।।
त्यावेळी ती सर्वदयिता पुत्राच्या वियोगाने लौकरच मरण पावली. तिने स्त्रीवेदाची निंदा केल्यामुळे मरण पावून पुरुष होऊन जन्मली ॥ २१२ ॥
या नन्तर तो समुद्रदत्त देखिल आपल्या व्यापान्यांच्या समूहासह आपल्या घरी आला. त्याला आपल्या पत्नीची सर्व हकीकत समजली. तेव्हां त्याने आपल्या भावाची निंदा केली. आपली पत्नी अपराधी नसताही श्रेष्ठीने आपल्या घरात तिला येऊ दिले नाही म्हणून तो श्रेष्ठीवर अतिशय रागावला. बरोबरच आहे कीं, अविचाराचे कृत्य कोणाला बरे सहन होते ? ।। २१३ - २१४॥
मी ज्येष्ठ भाऊ व श्रेष्ठिपदाला मी योग्य असता व मी जिवंत असता तूं श्रेष्ठीच्या पदावर आरूढ झाला आहेस असे बोलून तो समुद्रदत्त श्रेष्ठीवर रागावला ॥। २१५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org