Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७-१८४)
महापुराण
(६८१
स सर्वाश्चक्रवर्युक्तभोगाननुभवन् भृशम् । शकलीलां व्यलम्बिष्ट लक्ष्मीलक्षितविग्रहः ॥ १७३ अभूज्जयवतीभ्रातुस्तनुजा जयवर्मणः । जयसेनाह्वया कान्त्या सा सेनेव विजित्वरी ॥ १७४ मनोवेगोऽशनिवरः शिवाख्योऽशनिवेगवाक् । हरिकेतुः परे चोच्चः क्षमाभुजः खगनायकाः॥ १७५ जयसेनाख्यमुख्याभिस्तेषां तुग्भिः सहाभवत् । विवाहो गुणपालस्य स ताभिः प्राप्तसम्मदः॥१७६ कदाचित्काललब्ध्यादिचोदिताभ्यर्ण निर्वृतिः। विलोकयन्नभोभागमकस्मादधकारितम् ॥ १७७ चन्द्रग्रहणमालोक्य धिगेतस्यापि चेवियम् । अवस्था संसृतौ पापनस्तस्यान्यस्य का गतिः ।। १७८ इति निविद्य सञ्जातजातिस्मृतिरुदारधीः । स्वपूर्वभवसम्बन्धं प्रत्यक्षमिव संस्मरन् ॥ १७९ पुष्कराद्धेऽपरे भागे विदेहे पद्मकाह्वये । विषये विश्रुते कान्तपुराधीशोऽयमीश्वरः ॥ १८० रथान्तकनकस्तस्य वल्लभा कनकप्रभा। तयोर्भूत्वा प्रभापास्तभास्करः कनकप्रमः॥ १८१ तस्मिन्नन्येद्यरुद्याने दण्टा सण मत्प्रिया। विद्यत्प्रभाहृया तस्या वियोगेन विषण्णवान् ॥ १८२ साधं समाधिगप्तस्य समीपे संयम परम् । सम्प्राप्तवानतिस्निग्धैः पितमातसनाभिभिः॥ १८३ तत्र सम्यक्त्वशुद्धयाविषोडशप्रत्ययान्भृशम् । भावयित्वा भवस्यान्ते जयन्ताख्यविमानजः॥१८४
__ राज्यलक्ष्मीने ज्याच्या देहाला आलिंगिले आहे अशा त्या श्रीपालाने चक्रवर्तीला सांगितलेल्या सर्व भोगांचा पुष्कळ अनुभव घेतला व इन्द्राच्या लीलेचा त्याने आश्रय घेतला ॥ १७३ ॥
___जयावतीचा भाऊ जो जयवर्मा त्याला जयसेना नांवाची कन्या होती व ती सेनेप्रमाणे सर्वांना जिंकणारी होती ॥ १७४ ।।
मनोवेग, अशनिवर, शिव, अशनिवेग, हरिकेतु व इतरही राजे आणि विद्याधरांचे अधिपति, यांच्या कन्याशी गुणपालाचा विवाह झाला व या सर्व कन्यामध्ये जयसेना ही मुख्य होती. या सर्वविवाहित राजकन्यानी गुणपालाला फार आनंद वाटला ।। १७५-१७६ ॥
कोणे एके वेळी ज्याचे मोक्षाला जाणे अतिशय जवळ आले आहे अशा गुणपालाने काललब्ध्यादिकानी प्रेरित होऊन अकस्मात् अन्धकाराने युक्त झालेल्या आकाशाला पाहिले व चन्द्राला ग्रहण लागले आहे असे त्याला दिसले. त्यावेळी अशा या चन्द्राची देखिल अशी अवस्था आहे तर या संसारात पापग्रस्त झालेल्या जीवाची काय दुर्दशा होत असेल ? अशा विचारानी तो गुणपाल संसारापासून भ्याला. त्या महाबुद्धिवन्ताला त्यावेळी जातिस्मरण झाले व त्याला पूर्वभवाचे स्मरण प्रत्यक्षाप्रमाणे झाले ।। १७७-१७९ ॥
पुष्करार्द्धद्वीपाच्या दुसऱ्या भागातील विदेहक्षेत्रात पद्मक नामक प्रसिद्ध देश आहे व त्यातील कान्तपुरामध्ये कनकरथ नामक राजा होता व त्याची पत्नी कनकप्रभा होती. त्या उभयताना ज्याने आपल्या प्रभेने सूर्याला जिंकले आहे असा कनकप्रभ नामक पुत्र झाला. एके दिवशी हा उद्यानात गेला असता विद्युत्प्रभानामक त्याच्या पत्नीला सर्प चावला व त्यामुळे हा अतिशय खिन्न झाला. त्यावेळी अत्यंत प्रेमळ असे माता-पिता व भाऊबंद यांच्यासह समाधि गुप्त मुनीश्वराजवळ अतिशय उत्कृष्ट संयम त्याने धारण केला. त्याने सम्यक्त्वशुद्धि, विनयसंपन्नता आदिक सोळाकारणांच्या उत्कृष्ट भावना भावल्या व त्या जन्माच्या शेवटी जयन्त नामक विमानात तो देव झाला ।। १८०-१८४ ।। म. ८९
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org