Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

Previous | Next

Page 690
________________ ४७-१६३) महापुराण - (६७९ कुमारोऽपि समीपस्थशिलायां धरणीधरे । शनैः समापतत्तस्य देवश्रीजननी पुरा ॥ १५३ यक्षीभूता तदागत्य संस्पृशन्ती करेण तं । अपास्यास्य श्रमं मंक्षु कुमारं प्रविश ह्रदम् ॥ १५४ जगादैनमिति श्रुत्वा सोऽपि विश्वस्य तद्वचः। प्रविश्य तं शिलास्तम्भस्योपरि स्थितवान्निशि ॥१५५ कुर्वन्पञ्चनमस्कारपदानां परिवर्तनम् । प्रभाते तदुदग्भागे जिनेन्द्रप्रतिबिम्बकम् ॥ १५६ विलोक्य कृतपुष्पादिसम्पूजननमस्क्रियः । सहस्रपत्रमम्भोज चक्ररत्नं सकूर्मकम् ॥ १५७ आतपत्रं सहस्रोरुफणं च फणिनां पतिम् । दण्डरत्नं समण्डूकं नकं चूडामणि तथा ॥ १५८ चर्मरत्नं स्फुरद्रक्तवृश्चिकं काकिणीमणिम् । ईक्षाञ्चक्रे स पुण्यात्मा तत्र यक्ष्युपदेशतः ॥ १५९ तदा मुदितचित्तः सन् छत्रमुद्यम्य दण्डभृत् । प्रद्योतमानरत्नोपानको यक्षीसमर्पितः ॥ १६० सर्वरत्नमर्यदिव्यभूषाभेदैविभूषितः । निर्जगाम गुहातोऽसौ तदैवेत्य सुखावती ॥ १६१ धूमवेगं विनिजित्य प्रतिपद्वा हिमद्युतिम् । वृद्ध्यै कुमारमापन्ना सफलासिलतान्विता ॥ १६२) एतया सह गत्वातः सम्प्राप्य सुरभूघरम् । गुणपालजिनाधीशसभामण्डलमाप्तवान् ॥ १६३ ___ तो कुमार देखिल त्या पर्वतावर जी जवळच शिला होती तिच्यावर हळूहळू येऊन पडला. त्यावेळी त्याची जी मागच्या जन्मी माता होती ती यक्षी झाली होती. ती तेव्हा त्याच्याकडे आली व आपल्या हातानी त्याच्या अंगाला उत्तम स्पर्श करून त्याचे श्रम तिने दूर केले व ती त्याला हे कुमार तू शीघ्र या डोहात प्रवेश कर असे म्हणाली. ते तिचे बोलणे ऐकून व त्यावर विश्वास ठेवून त्याने त्या डोहात प्रवेश केला. यानंतर तो रात्री त्या शिलास्तंभावर बसून राहिला व त्याने रात्री सतत पंचनमस्काराचे परिवर्तन केले. प्रातःकाली उत्तर दिशेकडे जिनेश्वराचे प्रतिबिम्ब पाहून त्याचे त्याने पुष्पादिकानी पूजन केले व वन्दन केले. यानंतर पुण्यात्मा अशा त्या श्रीपाल कुमाराने यक्षीच्या उपदेशाने सहस्रपत्रानी-पाकळयानी युक्त असे कमल चक्ररूप होत आहे असे पाहिले. कासवाने सहित असे छत्र, ज्याला हजार मोठ्या फणा आहेत असा नागेन्द्र. बेड़काने सहित असे दण्डरत्न व सुसरीने शोभणारें चूडामणिरत्न चमकणाऱ्या लाल विंचवाने सहित असे चर्मरत्न व काकिणी रत्न ही रत्ने पाहिली ॥ १५३-१५९ ॥ त्यावेळी श्रीपालाला आनन्द वाटला. त्याने छत्र उघडून मस्तकावर धारण केले. हातात दण्ड धारण केला. यक्षीने दिलेली सर्व प्रकारच्या रत्नानी बनविलेली भूषणे धारण करून तो फार सुंदर दिसू लागला. अशा रीतीने तो गुहेतून बाहेर पडला. त्याचवेळी सुखावतीही धूमवेगाला जिंकून तेथे आली. जशी प्रतिपदा चन्द्राची वाढ करण्याकरिता चन्द्राचा आश्रय करिते. तशी सुंदर तरवारीने युक्त अशी सुखावती श्रीपालाच्या वैभवाची वृद्धि करण्यासाठी त्याच्याकडे आली. या सुखावतीबरोबर तो सुरगिरि पर्वतावर आला आणि गुणपालजिनेश्वराच्या समवसरणात येऊन पोहोचला ॥ १६०-१६३ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 688 689 690 691 692 693 694 695 696 697 698 699 700 701 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720