Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६७८)
महापुराण
(४७-१४२
मूकः श्रेयःपुरे जातस्तस्य भावी पुरोहितः । शिवसेनमहीपालः श्रीमांस्तनगरेश्वरः ॥ १४२ बीतशोकाया तस्य तनुजा वनजेक्षणा । मूकभाषणमादेशः कुमारस्य तदायने ॥ १४३ कुणिः शिल्पपुरोत्पन्नः स्थपतिस्तस्य भाव्यसौ । नाम्ना नरपतिस्तत्पुरेशो नरपतेः सुता ॥ १४४ रत्यादिविमला साद्धं तयेतस्य समागमः । अडागुलिप्रसरादेशात्स्मरव्ययदया चिरम् ॥ १४५ स वज्रमणिपाक्यस्य प्रधानपुरुषो भवेत् । तस्य धान्यपुरे जातिविशालस्तत्पुराधिपः ॥ १४६ सुता विमलसेनास्य श्रीपालस्य तदाप्तये । आदेशस्तस्य तद्वज्रमणिपाको महौजसः ॥ १४७ इत्यादेशानरं ज्ञात्वा सर्वे स्वं स्वं पुरं ययुः । तदा कुमारमूढ़वायानभोभागे सुखावती ॥ १४८ धूमवेगो विलोक्यनं विद्विषो भीषणारवः । अभितय॑ स्थितो रुद्ध्वा खे खेटकयुतासिभृत् ॥ १४९ तदा पूर्वोदितार्चायां देवता यास्य पालिका । सा विद्याधररूपेण समुपेत्य सुखावतीम् ॥ १५० मुक्त्वा कुमारमभ्येत्य विभीविद्याधराधमम् । नियुध्य विजयस्वेति निजगाद निराकुलम् ॥ १५१ सापि मुक्त्वा कुमारं तं धूमवेगं रणाङ्गणे । चिरं युद्ध्वा स्वविद्याभिधरौत्सोच्छौर्यशालिनी ॥१५२
जो श्रेयःपुर नगरात मुका जन्मलेला आहे तो या श्रीपालाचा भावी पुरोहित आहे व त्याच श्रेयःपुर नगराचा स्वामी राजा शिवसेनाची कन्या जिचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत अशी वीतशोका कन्या या श्रीपालाची पत्नी होईल ।। १४२ ।।।
__ ज्याची अंगुलि वाकडी आहे असा हा मनुष्य शिल्पपुर नगरात उत्पन्न झालेला होता व हा श्रीपालाचा भावी स्थपतिरत्न-सुतार आहे. शिल्पपुराचा राजा जो नरपति त्याची जी रतिविमला नामक कन्या तिच्याबरोबर याचा समागम होईल आणि तिला पाहण्याने याची बोटे सरळ होतील व त्याच्याबरोबर कामक्रीडा करणा-या हिचा चिरकाल समागम राहील असे निमित्तज्ञान्यानी सांगितले आहे ।। १४३-१४५ ।।
ज्याने हिरे शिजवून त्यांचे भस्म केले होते तो मनुष्य या श्रीपालाचा प्रधापुनरुषसचिव-मंत्री होणारा आहे व धान्यपुर नगरात याचा जन्म झाला आहे. या धान्यपुराचा राजा विशाल नांवाचा आहे व या राजाच्या कन्येचे नांव विमलसेना असे आहे व ती या श्रीपालाची पत्नी होईल. ज्याच्या येण्याने हिन्यांचा पाक-भस्म होईल असा आदेश निमित्तज्ञान्यानी दिला आहे त्या तेजस्वी राजाची-श्रीपालाची ही पत्नी होईल ।। १४६-१४७ ॥
याप्रमाणे निमित्तज्ञान्याच्या आदेशाला अनुसरून त्या पुरुषाला-श्रीपालाला ओळखून ते सगळे आपआपल्या नगराला गेले तेव्हा सुखावती कुमाराला आपल्या खांद्यावर घेऊन आकाशात गेली ॥ १४८ ॥
___ त्यावेळी धूमवेग शत्रूने त्याला पाहिले व भयंकर गर्जना करून त्याने त्याचा तिरस्कार केला आणि हातात ढाल व तरवार घेऊन त्या कुमाराला आडवून युद्धासाठी उभा राहिला. त्यावेळी पूर्वी जिचे वर्णन केले आहे अशा प्रतिमेमध्ये या श्रीपालाचे रक्षण करणारी जी देवता होती ती विद्याधररूपाने प्रकट झाली व सुखावतीला सोडून त्या कुमाराजवळ आली व भयरहित होऊन या विद्याधराबरोबर युद्ध करून विजयी हो असे सुखावतीला म्हणाली. कुमारही निराकुल-निर्भय होता. त्यावेळी सुखावतीने कुमाराला सोडून दिले व शौर्याने शोभणाऱ्या अशा तिने दीर्घकालपर्यन्त धूमवेगाबरोबर विद्यांच्या साहाय्याने लढून त्याला अडवून ठेविले ॥ १४९-१५२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org