Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

Previous | Next

Page 687
________________ ६७६) महापुराण (४७-१२३ कन्याकृत्यैव गत्वातः कान्तया स सुकान्तया । रतिकान्ताख्यया कान्तवत्या च सहितः पुनः ॥१२३ स्थितः प्राक्तनरूपेण काचित्तं वीक्ष्य लज्जिता । रति समागमत्काचिन्नकभावा हि योषितः ॥ १२४ प्रसुप्तवन्तं तं तत्र प्रत्यूषे च सुखावती । यत्नेनोद्धृत्य गच्छन्ती तेनोन्मीलितचक्षुषा ॥ १२५ विहाय मामिहैकाकिनं त्वं क्व प्रस्थितेति सा । पृष्टा न क्वापि याताहं त्वत्समीपगता सदा ॥ १२६ आदिष्टो वनितारत्नलाभो नैवात्र ते भयम् । इत्यन्तहितरूपाद्य स्वरूपेण समागमः ॥ १२७ इत्याह तद्वचः श्रुत्वा प्रमुचैत्य खगाचले। पुरं दक्षिणभागस्थं गजादि तत्समीपगम् ॥ १२८ कञ्चिद्गजपति स्तम्भमुन्मूल्यारूढदर्पकम् । द्वात्रिंशदुक्तको डाभिः क्रीडित्वा वशमानयत् ॥ १२९ ततः समुदिते चण्डदोधितौ निजिताद्गजात् । कुमारागमनं पौरा बुद्ध्वा सन्तुष्टचेतसः ।। १३० प्रतिकेतनमुबद्धचलत्केतुपताकिकाः । प्रत्युद्गममकुर्वस्ते तत्पुण्योदयचोदिताः ॥ १३१ ततो नभस्यसौ गच्छन्कञ्चिद्धयपुरे हयम् । स्थितं प्रदक्षिणीकृत्य स्वं पश्यन्नात्तविस्मयः ॥ १३२ .................... यानंतर कन्येच्या आकृतीनेच पुढेही सुखावतीने त्याला तेथे नेले, जेथे कान्ता, सुकान्ता, रतिकान्ता आणि कान्तवती या कन्या होत्या. तेथे तो पुनः पूर्वरूपाचा पुरुषरूपाचा बनला. त्या रूपात त्याला पाहून कोणी स्त्री लज्जित झाली व कोण्या स्त्रीत प्रेम उत्पन्न झाले व हे असे अनेक भाव उत्पन्न होणे साहजिक आहे. कारण स्त्रियामध्ये अनेक भाव उत्पन्न होतात ॥१२३-१२४॥ श्रीपाल रात्री तेथेच झोपला व सकाळी सुखावती त्याला यत्नाने उचलून नेत असता त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले व मला एकट्याला येथे सोडून तू कोठे गेले होतीस असे त्याने तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली मी तुला सोडून कोठेच गेल्ये नव्हते. नेहमी मी तुझ्याजवळच बसल्ये होते ।। १२५-१२६ ।। हे कुमारा, येथे तुला स्त्रीरत्नाचा लाभ होणार आहे म्हणून येथे तुला भय नाही. म्हणन मी माझे रूप गप्त केले होते व आता मी स्वरूप धारण केले आहे असे ती सुखावती बोलली. ते तिचे भाषण ऐकन तो आनंदित झाला. यानंतर ते विजयार्द्धपर्वतावर दक्षिणभागी जवळ असलेल्या गजपुराजवळ आले ।। १२७-१२८ ॥ ज्याने बांधण्याचा खांब उपटला आहे व जो मदाने उन्मत्त झाला आहे अशा एका मोठ्या हत्तीला बत्तीस प्रकारच्या क्रीडानी खेळवून त्या कुमाराने वश केले ॥ १२९ ॥ यानंतर सूर्योदय झाला. ज्याला जिंकले आहे अशा हत्तीवर बसून कुमाराचे आगमन झाले आहे असे जाणून नगरवासी लोकाना फार आनंद वाटला. त्यानी आपआपल्या घरी ज्यांच्या पताका, वान्याने उडत आहेत असे ध्वज उभारले होते व कुमाराच्या पुण्योदयाने प्रेरित होऊन त्यानी त्याचे स्वागत केले ।। १३०-१३१ ॥ यानंतर आकाशातून जात जात तो कुमार हयपुर नगराला आला. तेथे एक घोडा कुमाराला प्रदक्षिणा घालून त्याच्याजवळ उभा राहिला. त्याला पाहून कुमाराला आश्चर्य वाटले ॥ १३२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 685 686 687 688 689 690 691 692 693 694 695 696 697 698 699 700 701 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720