________________
४७-१२२)
महापुराण
(६७५
हतानुचरभार्यास्य काचिन्निरपराधकः । हतो नृपेण मद्भुर्तेत्यस्य शुद्धिप्रकाशिनी ॥ १११ तत्कुमारस्य संस्पर्शानिःशक्ति सा हुताशनम् । विदित्वा प्राविशदृष्ट्वा कुमारस्तां सकौतुकः ॥ अभेद्यमपि वज्रेण स्त्रीणां मायाविनिर्मितम् । कवचं दिविजेशा च नीरन्ध्रमिति निर्भयः ॥ ११३ स्थितस्तत्र स्मरन्नेवं सुता तन्नगरेशिनः । राज्ञो विमलसेनस्य वत्यन्तकमलाह्वया ॥ ११४ कामग्रहाहिता तस्यास्तद्ग्रहापजिहीर्षया । जने समुदिते सद्यः कुमारस्तमपाहरत् ॥ ११५ सत्योऽभूत्प्राक्तनादेश इति तस्मै महीपतिः । तुष्ट्वा तां कन्यकां दित्सुस्तस्यानिच्छां विबुध्य सः॥ अभ्यणं बन्धुवर्गस्य नेयोऽयं भवता द्रुतम् । यत्नेनेत्यात्मजं स्वस्य वरसेनं समादिशत् ॥ ११७ नीत्वा सोऽपि कुमारं तं विमलाविपुरो बहिः । वने तृष्णोपसन्तप्तं स्थापयित्वा गतोऽम्बुने ॥ ११८ तदा सुखावती कुब्जा भूत्वा कुसुममालया। परिस्पृश्य तृषां नीत्वा कन्यकां तं चकार सा ॥ ११९ धूमवेगो हरिवरश्चैतां वीक्ष्याभिलाषिणी । अभूतां बद्धमात्सयों तस्याः स्वीकरणं प्रति ॥ १२० द्वेषवन्तौ तदालोक्य युवयोविग्रहो वृथा। पतिर्भवत्वसावस्या यमेषाभिलषिष्यति ॥ १२१ इति बन्धुजनार्यमाणो वैराद्विरेमतुः । स्त्रीहेतोः कस्य वा न स्यात्प्रीतिघातः परस्परम् ॥ १२२
राजाने ज्या नोकराला मारले होते त्याच्या पत्नीने आपला पति निरपराध होता म्हणून त्याची शुद्धि प्रकट करावी असा हेतु मनात धरला व कुमाराच्या स्पर्शाने शक्तिरहित अग्नि झाला आहे असे तिने जाणले व त्या अग्नीत तिने प्रवेश केला. हे दृश्य कुमाराने कौतुकाने पाहिले ॥ १११-११२ ॥
स्त्रियांच्या मायेने निर्माण केलेले, कपटरूपी कवच देवांचा स्वामी अशा इन्द्राकडूनही फोडता येणार नाही कारण त्याला कोठे छिद्रच नाही असा विचार करीत तो तेथे निर्भयपणाने राहिला ॥ ११३ ॥
इकडे त्या नगराच्या राजाविमलसेनाची कमलावती नांवाची मुलगी होती. तिला कामरूपपिशाचाची बाधा होती व त्या पिशाचाला दूर करण्यासाठी लोक जमले होते व त्यावेळी कुमार तेथे गेला व त्याने त्या पिशाचाला काढून टाकले. त्यामुळे पूर्वी सांगितलेला निमित्तज्ञान्याचा आदेश सत्य झाला. तेव्हा विमलसेन राजा आनंदित होऊन आपली मुलगी त्या कुमाराला देण्यास तयार झाला पण कुमाराची तिचा स्वीकार करण्याची इच्छा नाही हे
यावर त्याने त्या कुमाराचे जे बन्धवर्ग आहेत त्यांच्याकडे त्याला यत्नाने पाठविण्यास त्याने आपल्या वरसेन नामक पुत्राला आज्ञा दिली ॥ ११४-११७ ॥
वरसेनाने त्या कुमाराला विमलपुराच्या बाहेर एका वनात नेले. तेथे कुमाराला फार तहान लागली. त्या वनात त्याने कुमाराला बसविले व स्वतः पाण्यासाठी गेला. त्यावेळी सुखावती कुबडी होऊन तेथे आली. पुष्पाच्या मालेने त्याला स्पर्श करून तिने त्याला तहानेने रहित केले आणि त्याला कन्या बनविले ॥ ११८-११९ ॥
तेथे धूमवेग व हरिवर यांनी त्या कन्येला पाहिले व त्यांच्या मनात तिची अभिलाषा उत्पन्न झाली. एकमेकात तिला ग्रहण करण्यासाठी मत्सर उत्पन्न झाला. ते द्वेषी होऊन एकमेकाशी लढण्यास उद्युक्त झाले. तुमचे हे लढणे व्यर्थ आहे. ज्याला ही कन्या इच्छील तो तिचा पति होवो असे बंधुजन म्हणाले. तेव्हा ते युद्धापासून परावृत्त झाले, बरोबरच आहे की, स्त्रीमुळे एकमेकात कोणाच्या बरे प्रीतीचा नाश होत नाही ? ॥ १२०-१२२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org