Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७-१४१)
(६७७
तत्रापि विदितादेशैर्नागरैः प्राप्तपूजनः । पुनस्ततोऽपि निष्क्रम्य समागच्छन्निजेच्छया ॥ १३३ चतुर्जनपदाभ्यन्तरस्थसीममहाचले । जने महति सम्भूय स्थिते केनापि हेतुना ॥ १३४ कस्यचित्कोशतः खड्गं कस्मिश्चिदपि यत्नतः । सत्यशक्ते समुत्खातुं तं समुद्गीयं हेलया ॥ १३५ कुमारः प्राहरद्वंशस्तम्बं सम्भृतवंशकम् । तदालोक्य जनः सर्वः प्रमोदादादरं व्यधात् ॥ १३६ तत्र कश्चित्समागत्य मूकः समुपविष्टवान् । प्रप्रणम्यकुमारं तं जयशब्दपुरःसरम् ।। १३७ १ कुणिश्च कश्चिवङगुल्या प्रसारितकराङगुलिः । अञ्जल मुकुलीकृत्य समीपे समुपस्थितः ॥ १३८ यो मणिपाकाय समुद्युक्तस्तदा मुदा । तेषां पाके व्यलोकिष्ट कुमारं विनयेन सः ॥ १३९ प्रागुक्त करवालेशः पुरेऽभूद्विजयाह्वये । सोऽस्य सेनापतिर्भावी भविष्यच्चक्रवर्तिनः ॥ १४० तत्पुरे वरकीर्तीष्टकीर्तिमत्यात्मजापने । खड्गोत्पाटनमादेशस्तस्य श्रीपाल चक्रिणः ॥ १४१
महापुराण
तेथेही ज्यानीं नैमित्तिकाचा आदेश जाणला आहे अशा नागरिकानी त्याचा आदर केला. पुनः तेथूनही आपल्या इच्छेला अनुसरून तो निघाला. पुढे जात जात चार देशाच्या मध्यसीमेमध्ये एक मोठा पर्वत होता तेथे तो आला. त्या ठिकाणी काही कारणाने फार लोक एकत्र येऊन उभे राहिले होते. तेथे कोणी तरी कोणाच्या म्यानातून खड्ग बाहेर काढण्याचा यत्न करीत होता. पण यत्न करूनही कोशातून तो खड्ग काढू शकला नाही. पण या कुमाराने त्या कोशातून तो खङ्ग सहज काढला व ज्यात पुष्कळ वेळू एकत्र वाढले होते अशा वेळूच्या खांबावर कुमाराने खड्गाचा प्रहार केला तेव्हा सर्व लोकानी ते त्याचे कृत्य पाहून अतिशय आनंदाने त्याचा आदर केला ।। १३३-१३६ ।।
तेथे त्यावेळी कोणी मुका मनुष्य आला. त्याने जय शब्द उच्चारून कुमाराला नमस्कार केला व तो जवळ बसला ॥ १३७ ॥
कोणी एका बोटाने थोटा असलेला मनुष्य आला त्याने आपल्या हाताची बोटे पसरून नंतर कळीप्रमाणे आपले दोन हात जोडले व तो श्रीपालाच्या पुढे बसला ।। १३८ ।।
एक मनुष्य हिरे शिजविण्याकरिता उद्युक्त झाला व ते हिरे जेव्हा शिजले तेव्हा आनंदाने व विनयाने त्याने कुमाराला पाहिले ।। १३९ ।।
पूर्वी ज्याचा उल्लेख केला आहे असा खड्गाचा मालक जो विजयनामक नगरात होता. तो भविष्यच्चक्रवर्तीचा श्रीपालाचा भावी सेनापति होय ॥ १४० ॥
त्याच विजयपुर नगराचा राजा जो वरकीर्ति व राणी कीर्तिमती या दोघाना एक कन्या होती. तिच्या वराविषयी निमित्तज्ञान्यानी असे सांगितले होते की, हिचा वर श्रीपाल चक्रवर्ती होईल व याला ओळखण्याचे चिह्न असे की, तो म्यानातून तरवार उपसून बाहेर काढील ॥ १४१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org