________________
(६६९
४७-५३)
विद्युद्वेगा ततोऽगच्छत्स्वमातृपितृसन्निधौ । पिधाय द्वारमारोप्य सौधाग्रं प्राणवल्लभम् ॥ ४३ तावानेतुं कुमारोऽपि सुप्तवान् रक्तकम्बलम् । प्रावृत्य तं समालोक्य भेरुण्डः पिशितोच्चयम् ॥ ४४ मत्वा नीत्वा द्विजः सिद्धकूटाग्रे खादितुं स्थितः । चलन्तं वीक्ष्य सोऽत्याक्षीत्स तेषां जातिजो गुणः ॥ ४५ ततोऽवतीर्य श्रीपालः स्नात्वा सरसि भक्तिमान् । सुपुष्पाणि सुगन्धीनि समादाय जिनालयम् ॥४६ परीत्य स्तोतुमारेभे विवृत्तं द्वास्तदा स्वयम् । तन्निरीक्ष्य प्रसन्नः सन्नभ्यर्च्य जिनपुङ्गवान् ॥ ४७ अभिवन्द्य यथाकामं विधिवत्तत्र सुस्थितः । तमभ्येत्य खगः कश्चित्समुद्धृत्य नभःपथे ॥ ४८ गच्छन्मनोरमे राष्ट्रे शिवङ्करपुरेशिनः । नृपस्यानिलवेगस्य कान्ता कान्तवतीत्यभूत् ॥ ४९ तयोः सुतां भोगवतीमाकाशस्फटिकालये । मृदुशय्यातले सुप्तां का कुमारीयमित्यसौ ॥ ५० अपृच्छत्सोऽब्रवीदेषा भुजङ्गो विषमेति च । तदुक्ते स कुधा कृत्वा कन्या पितृसमीपगम् ॥ ५१ तमस्मत्कन्यकामेष भुजङ्गीति खलोऽब्रवीत् । इत्युवाच ततः कुद्ध्वा दुष्टो निक्षिप्यतामयम् ॥ ५२ दुर्बरोस्तपोभारधारियोग्ये घने वने । इत्यभ्यधान्नृपस्तस्य वचनानुगमादसौ ॥ ५३
महापुराण
यानंतर त्या कुमाराला गच्चीवर बसविले व द्वार बन्द करून विद्युद्वेगा आपल्या माता-पित्यांना आणण्यासाठी त्यांच्याकडे गेली. कुमार देखिल गच्चीवर तांबडे कंबळ ( शाल ) पांघरून झोपला. त्याला भेरुण्डपक्षाने पाहिले. हा मांसाचा ढीग आहे असे त्याला वाटले. त्याने त्याला सिद्धकूटाच्या शिखरावर नेले व त्याने खाण्याचा विचार केला पण तो हलत आहे असे पाहून त्याने त्याचा त्याग केला. हा त्या पक्षाचा जातिगुण आहे. स्वाभाविक गुण आहे ।। ४३-४५ ।
यानंतर त्या सिद्धकूटाच्या शिखरावरून तो श्रीपाल खाली उतरला. त्याने सरोवरात स्नान केले. भक्तियुक्त अशा त्याने सुगन्धित फुले घेतली व जिनमंदिराला प्रदक्षिणा देऊन त्याने जिनेश्वराची स्तुति प्रारंभिली. त्यावेळी जिनमंदिराचे द्वार आपोआप उघडे झाले. ते पाहून श्रीपालाने प्रसन्न होऊन यथाविधि जिनश्रेष्ठांची पूजा करून वंदना केली आणि तेथे तो स्वस्थ बसला. त्यावेळी कोणी एक विद्याधर त्याच्याकडे आला व त्याला उचलून आकाशात नेले. तेथून मनोरम नांवाच्या राष्ट्रात शिवकर नामक नगरात आले. त्या नगराचा राजा अनिलवेग होता. त्याच्या राणीचे नांव कान्तवती होते. या दोघाना जी कन्या झाली तिचे नांव भोगवती होते ।। ४६-४९ ।।
ती आकाशस्फटिकानी बांधविलेल्या घरामध्ये मऊ शय्येवर झोपली होती. त्या विद्याधराने ही कुमारी कोण आहे सांग असे कुमाराला विचारले. तेव्हां ही भयंकर नागीण आहे असे कुमाराने उत्तर दिले. ते ऐकून त्या विद्याधराने कुमाराला त्या कन्येच्या पित्याकडे, राजाकडे नेले व त्याला त्याने सांगितले कीं, ह्या दुष्टाने आपल्या मुलीला ही नागीण आहे असे म्हटले आहे. त्यानंतर तो राजा रागावला व दुर्धर आणि मोठ्या तपाचा भार धारण करणान्या तपस्व्यांना योग्य अशा वनात याला टाका असे म्हणाला. राजाच्या वचनाला अनुसरून त्या विद्याधराने विजयार्द्धपर्वताच्या उत्तर श्रेणीवरील मनोहर नामक नगराच्या जवळ असलेल्या
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org