________________
४७-३१)
महापुराण
न्यग्रोधपादपाधःस्थप्रतिमावासिना भृशम् । देवेन तजितो भीत्वाश निवेगोऽमुचत्खगः ॥ २१ कुमारं पर्णलध्वाख्यविद्यया स्वनियुक्तया । रत्नावर्तगिरेर्मूनि स्थितं तं सन्ति भाविनः ॥ २२ बहवोऽप्यस्य लम्भा इत्यगृहीत्वा निवृत्तवान् । देवः सरसि कस्मिश्चित्स्नानादिविधिना श्रमम् ॥ मार्गजं स्थितमुद्धूय तमेकस्मात्सुधागृहात् । आगत्य राजपुत्रोऽयमिति ज्ञात्वा यथोचितम् ॥ २४ दृष्ट्वा षड्राजकन्यास्ताः स्ववृत्तान्तं न्यवेदयन् । स्वगोत्रकुलनामादि निर्दिश्य खचरेशिना ॥ २५ बलादशनिवेगेन वयमस्मिन्निवेशिताः । इति तत्प्रोक्तमाकर्ण्य कुमारस्यानुकम्पिनः ॥ २६ निजागमन वृत्तान्तकथनावसरे परा । विद्युद्वेगाभिधा विद्याधरी तत्र समागता ॥ २७ पापिनाशनिवेगेन हन्तुमेनं प्रयोजिता । समीक्ष्य मदनक्रान्ताभू च्चित्राश्चित्तवृत्तयः ॥ २८ नुस्तनितवेगस्य राज्ञो राजपुरेशिनः । खगेशोऽशनिवेगाख्यो ज्योतिर्वेगाख्य मातृकः ॥ २९ स्वमत्र तेन सौहार्दादानीतः स ममाग्रजः । विद्युद्वेगाह्वयाहं च प्रेषिता ते स मैथुनः ॥ ३० रत्नागिरि याहि स्थितस्तत्रेति सादरम् । भवत्समीपं प्राप्तवमिति रक्तविचेष्टितम् ।। ३१
( ६६७
वडाच्या झाडाखाली असलेल्या प्रतिमेत राहणारा देव त्यावेळी प्रकट होऊन अशनिवेगावर अतिशय रागावला. त्यामुळे तो विद्याधर भ्याला व त्याला - श्रीपालाला त्याने स्वतः योजलेल्या पर्णलघ्वी ( पानाप्रमाणे हलके करणारी) विद्येने रत्नावर्त गिरिनामक पर्वताच्या शिखरावर सोडले. त्या पर्वतावर या कुमाराला पुष्कळ लाभ होणार आहेत असे जाणून त्या देवाने त्याला बरोबर न घेता तेथेच सोडले व तो निघून गेला. यानन्तर त्या श्रीपालाने कोण्या एका सरोवरामध्ये स्नानादिकार्य केले व मार्गात उत्पन्न झालेले श्रम त्याने नाहीसे केले ।। २१-२३ ॥
यानंतर स्वस्थ बसलेल्या त्या श्रीपालाकडे एका शुभ्रमहालातून सहा राजकन्या आल्या व हा राजपुत्र आहे असे ओळखून व योग्य आदराने त्याला पाहून त्यानी आपले गोत्र, कुल, नाव वगैरे सांगितले व आम्हाला जबरदस्तीने अशनिवेगविद्याधराने येथे आणून ठेविले आहे अशी स्वतःची हकीकत त्यानी त्याला सांगितली. ती ऐकून त्या कुमाराला दया उत्पन्न झाली ।। २४-२५ ॥
स्वतःचे येणे येथे कसे झाले हे वृत्त तो सांगत आहे अशावेळी विद्युद्वेगा नांवाची एक विद्याधरी तेथे आली. त्या पापी अशनिवेगाने या कुमाराला मारून टाकण्यासाठी तिला पाठविले होते. पण या कुमाराला पाहून ती कामविकाराने ग्रस्त झाली. जीवाच्या चित्ताचे विचार आश्चर्यकारक असतात असे येथे म्हणावयास हरकत नाही ।। २६-२८ ।।
राजपुर नगराचा राजा स्तनितवेग व राणी ज्योतिर्वेगा यांच्या पुत्राचे नांव अशनिवेग हा विद्याधरांचा राजा - स्वामी आहे. हे श्रीपाला त्याने तुला येथे स्नेहामुळे आणिले आहे व तो अशनिवेग माझा वडील भाऊ आहे व हे कुमारा माझे नांव विद्युद्वेगा आहे व त्याने तुझ्याकडे मला पाठविले आहे व तो तुझा मेहुणा आहे. अर्थात् तू माझ्याशी विवाह करावा असा अभिप्राय तिने व्यक्त केला. मला माझ्या भावाने रत्नावर्त गिरीवर जा व तो तुला तेथे भेटेल म्हणून मी येथे आदराने तुझ्याकडे आले आहे. असे म्हणून तिने प्रेमाचे हावभाव केले व जवळच असलेल्या शुभ्रमंदिरात जाऊ असे त्याला ती म्हणाली. पण आपल्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org