________________
६६६) महापुराण
(४७-११ तयोः कुमारः श्रीपालः पुरुषो नर्तयत्ययम् । अस्तु स्त्रीवेषधार्यत्र स्त्री चेत्पुंरूपधारिणी ॥११ स्यादेवं स्त्री प्रनृत्यन्ती नृत्तं युक्तमिदं भवेत् । इत्याह तद्वचः श्रुत्वा नटी मूर्छामुपागता ॥ १२ उपायः प्रतिबोध्यनां तदा प्रश्रयपूर्वकम् । इति विज्ञापयामास काचित्तं भाविचक्रिणम् ॥ १३ सुरम्यविषये श्रीपुराधिपः श्रीधराह्वयः । तद्देवी श्रीमती तस्याः सुता जयवतीत्यभूत् ॥ १४ तज्जातौ चक्रिणो देवी भाविनीत्यादिशन्त्विदः । अभिज्ञानं च तस्यैतत् नटनटयोविवेत्ति यः ॥१५ भेदं स चक्रवर्तीति तत्परीक्षितुमागता । पुण्यात् दृष्टस्त्वमस्माभिनिधिकल्पो यदृच्छया ॥ १६ अहं प्रियरतिर्नाम्ना सुतेयं मम नर्तकी । ज्ञेया मदनदेगाख्या पुरुषाकारबारिणी ॥ १७ नटोऽयं वासवो नाम ख्यातः स्त्रीवेषधारकः। तच्छुत्वा नृपतिस्तुष्ट्वा तां सन्तर्प्य यथोचितम् ॥१८ गुरुं वन्दितुमात्मीयं गच्छन्सुरगिरि ततः । अश्वं केनचिदानीतमारुह्यासक्तचेतसा ॥ १९ अधावयदसौ किञ्चिदन्तरं धरणीतले । गत्वा गगनमारुह्य व्यक्तीकृतखगाकृतिः ॥ २०
त्यावेळी श्रीपालकुमाराने म्हटले की, येथे हा स्त्रीचा वेष धारण करून पुरुष नृत्य करीत आहे व ही स्त्री पुरुषाचा वेष धारण करून नृत्य करीत आहे. स्त्री जर स्त्रीचे रूप धारण करून नृत्य करील तर हे नृत्य योग्य झाले असते. हे श्रीपालाचे भाषण ऐकून नटी मूच्छित झाली ॥ ११-१२॥
तेव्हा काही उपायानी तिला सावध केले. त्यावेळी कोणी एक स्त्री त्या भावी चक्रवर्तीला विनयाने असे म्हणाली. सुरम्य देशात श्रीपुरनगराचा राजा श्रीधर आहे. त्याच्या राणीचे नांव श्रीमती आहे. श्रीधर व श्रीमती या दोघाना कन्या जयवती या नांवाची झाली. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा निमित्त जाणणाऱ्या विद्वान लोकानी ही चक्रवर्तीची पट्टराणी होईल असे सांगितले. त्याविषयी त्यानी ही खूण सांगितली. जो नट व नटीचा भेद जाणील तो चक्रवर्ती होईल. तेव्हा त्याची परीक्षा करण्यासाठी आम्ही लोक आलो आहोत. पुण्योदयाने, हे कुमार आपण निधीसारखे आमच्या दृष्टीला अकल्पित रीतीने दिसले आहात ॥ १३-१६ ॥
मी प्रियरति या नांवाची आहे आणि ही माझी पुरुषाकार धारण करणारी नर्तकी कन्या मदनवेगा नांवाची आहे व स्त्रीवेष धारण करून नृत्य करणाऱ्या या नटाचे वासव नाम आहे. हे ऐकून राजाने प्रसन्न होऊन त्या नर्तकीला योग्य असे पारितोषिक देऊन सन्तुष्ट केले ॥ १७-१८॥
यानंतर आपल्या पित्याला वन्दन करण्यासाठी तो श्रीपाल सुरगिरि नामक पर्वताकडे निघाला. त्यावेळी कोणीतरी घोडा घेऊन आला व त्यावर आसक्तचित्त होऊन तो बसला व त्याला तो पळवू लागला. तो घोडा कांही अन्तरपर्यन्त जमीनीवरून धावला व नंतर त्याने विद्याधराचे रूप प्रकट केले आणि तो आकाशात त्याला घेऊन गेला ॥ १९-२० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org