Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

Previous | Next

Page 676
________________ सप्तचत्वारिंशत्तमं पर्व । कान्ते तत्रान्यदप्यस्ति प्रस्तुतं स्मर्यते त्वया । श्रीपालचक्रिसम्बन्धमित्यप्राक्षीत्स तां पुनः ॥१ बाढं स्मरामि सौभाग्यभागिनस्तस्य वृत्तकम् । यथैवाद्येक्षितं वेति सा प्रवक्तुं प्रचक्रमे ॥२ जम्बूद्वीपे विदेहेऽस्मिन् पूर्वस्मिन्पुण्डरीकिणी । नगरी नगरीवासौ वासवस्यातिविश्रुता ॥३ श्रीपालवसुपालारव्यौ सूर्याचन्द्रमसौ च तौ। जित्वा महीं सहैवावतः स्मेव नयविक्रमौ ॥४ जननी वसुपालस्य कुबेरश्रीदिनेऽन्यदा । वनपाले समागत्य केवलावगमोऽभवत् ॥५ गुणपालमुनीशोऽस्मत्पतेः सुरगिराविति । निवेदितवति क्रान्त्वा पुरः सप्तपदान्तरम् ॥६ प्रणम्य वनपालाय दत्वासो पारितोषिकम् । पौराः सपर्यया सर्वेऽप्यायेयुरिति घोषणाम् ॥ ७ विधाय प्राकस्वयं प्राप्य भगवन्तमवन्दत । श्रीपालवसुपालौ च ततोऽनु समुदौ गतौ ॥८ प्रमदाख्यं वनं प्राप्य सद्रुमै रम्यमन्तरे। प्राग्जगत्पालचक्रेशो यस्मिन्यग्रोधपादपे ॥९ देवताप्रतिमालक्ष्ये स्थित्वा जग्राह संयमम् । तस्याधस्तात्समीक्ष्येक्ष्यं प्रवृत्तं वृत्तमादरात् ॥ १० हे प्रिये, तू जे आतापर्यन्त सांगितले आहेस त्यात अवश्य जे सांगण्यासारखे आहे त्याची आठवण तुला होत आहे काय ? अर्थात् श्रीपाल चक्रवर्तीच्या सम्बंधाचे स्मरण तुला होते काय असे सुलोचनेला जयकुमारने पुनः विचारले. तेव्हां ती म्हणाली, उत्तम भाग्यवंत असलेल्या त्या श्रीपालाचे वृत्त मला चांगले आठवत आहे. मी जणु त्याचे चरित्र आज पाहात आहे असे मला वाटते. असे म्हणून ते तिने सांगावयास प्रारंभिले ।। १-२॥ । __या जंबूद्वीपातील पूर्व विदेहक्षेत्रात पुण्डरीकिणी नांवाचे नगर इंद्राच्या नगराप्रमाणे प्रसिद्ध आहे. या नगरांत जणू सूर्य-चंद्र असे श्रीपाल व वसुपाल हे दोन राजे राहत होते व ते पृथ्वीला जिंकून तिचे दोघेही रक्षण करीत होते व ते जणु नय व पराक्रम आहेत असे लोकाना वाटत होते ॥ ३-४ ॥ ___ एके दिवशी वसुपालाची माता जी कुबेरश्री तिच्याकडे वनपाल आला व तो आमचे स्वामी श्रीगुणपाल मुनीश्वरांना सुरगिरिपर्वतावर केवलज्ञान झाले आहे असे म्हणाला, तेव्हां कुबेरश्री आसनावरून उठून सात पावले पुढे गेली व गुणपालमुनीश्वराना तिने परोक्ष नमस्कार केला. त्या वनपालाला तिने त्या आनंदाप्रीत्यर्थ बक्षिस दिले व सर्व नगरवासीलोकांनी पूजनसामग्रीसह यावे अशी दौंडी नगरात तिने देवविली व स्वतः भगवन्ताकडे जाऊन तिने त्यांना वंदिले व श्रीपाल व वसुपाल हे दोघेही आनंदाने तिच्या मागून गेले ॥ ५-८॥ श्रीपाल व वसुपाल मार्गामध्ये उत्तम वृक्षांनी सुन्दर अशा प्रमदनामक वनात ते पोहोचले. तेथे देवतांच्या प्रतिमांनी युक्त अशा वडाच्या झाडाखाली जगत्पाल चक्रवर्तीने पूर्वी संयम धारण केला होता तेथे ते दोघे येऊन पोहोचले. त्या वडाच्या झाडाखाली पाहण्याला योग्य असे नृत्य चालू होते व हे दोघेजण आदराने ते नृत्य पाहू लागले ।। ९-१० ।। म. ८७ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 674 675 676 677 678 679 680 681 682 683 684 685 686 687 688 689 690 691 692 693 694 695 696 697 698 699 700 701 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720