________________
४६-३६५)
महापुराण
तत्फलेनाच्युते कल्पे प्रतीन्द्रस्य प्रियाः क्रमात् । रतिषेणा सुसीमाख्या मुख्यान्या च सुखावती ॥३५४ सुभगेति च देव्यस्ता यूयं ताश्चेटिकाः पुनः । चित्रषणा क्रमाच्चित्रवेगा धनवती सती ॥ ३५५ धनश्रीरित्यजायन्त वनदेवेषु कन्यकाः । सुरदेवोऽप्यभून्मृत्वा पिङ्गलः पुररक्षकः ॥ ३५६ ।। स तत्र निजदोषेण प्रापन्निगलबन्धनम् । मातुस्तत्सुरदेवस्य प्राप्तायां राजसूनुताम् ॥ ३५७ श्रीपालाख्यकुमारस्य ग्रहणे बन्धमोक्षणे । सर्वेषां पिङ्गलाख्योऽपि मुक्तः संन्यस्य सम्प्रति ॥ ३५८ भूत्वाच्युतविमानेऽसाविहागत्य भविष्यति । स्वामी युष्मकमित्येतत् तच्चेतोहरणं तदा ॥ ३५९ परमार्थं कृतं तेन तथागत्य मुनेर्वचः । पृष्ट्वानुकन्यकाश्चनामात्मनो भाविनं पतिम् ॥ ३६० पूर्वोक्तपिङ्गलाख्यस्य सूनुर्नाम्नातिपिङ्गलः । सोऽपि संन्यस्य युष्माकं रतिदायी भविष्यति ॥३६१ इति तत्प्रोक्तमाकर्ण्य गत्वा तत्पूजनाविधौ । तासां निरीक्षणात्कामसम्मोहं प्रकृतं महत् ॥ ३६२ रतिकूलाभिधानस्य संविधानं मुनेः श्रुतम् । तत्पितुर्मणिनागादिदत्तस्य प्रकृतं तथा ॥ ३६३ सुकेतोश्चाखिले तस्मिन्सत्यभूते मुनीश्वरम् । ताः सर्वाः परितोषेण गताः समभिवन्द्य तम् ॥ ३६४ आवामपि तदा वन्दनाय यत्र गताविदम् । श्रुत्वा दृष्ट्वागतौ प्रीतिपरीतहृदयौ दिवम् ॥ ३६५
............
___त्या दानादिपुण्याच्या फलाने अच्युत स्वर्गात त्या प्रतीन्द्राच्या क्रमाने रतिषणा, सुसीमा, सुखावती आणि सुभगा अशा मुख्य देवी झाल्या आणि त्याच दासी क्रमाने चित्रषणा, चित्रवेगा, धनवती आणि धनश्री या वनदेवाच्या ठिकाणी दासी देवता झाल्या व सुरदेव नांवाचा राजा मरून पिंगल नांवाचा नगररक्षक झाला व त्या ठिकाणी आपल्या दोषामुळे कैद्याच्या अवस्थेला प्राप्त झाला सुरदेवाची माता राजाची कन्या झाली आहे ॥ ३५४-३५७ ॥
व ती श्रीपालकुमाराबरोर विवाहित झाली आहे. विवाहाच्या वेळी सर्व कैद्यांना बन्धनातून मुक्त केले व त्यावेळी पिंगलालाही मुक्त केले. त्याच्या बेड्या काढून टाकल्या. आता संन्यास घेऊन तो अच्युत स्वर्गात उत्पन्न होऊन तुमचा तो स्वामी होईल. इकडे मुनिराज असे मधुर भाषण करीत असता तिकडे पिंगलाने संन्यास धारण केला व तो अच्युत स्वर्गात उत्पन्न झाला व तेथून येऊन त्याने मुनिराजाचे वचन खरे केले. त्यावेळी चार व्यन्तरकन्या आल्या व त्यांनी सर्वज्ञाला आपल्या भावी पतिविषयी प्रश्न विचारला ॥ ३५८-३६० ॥
मुनिराज म्हणाले, पूर्वी ज्याचे वर्णन केले होते त्या पिंगल कोतवालाला अतिपिंगल नांवाचा मुलगा आहे. तो संन्यास धारण करून तुम्हाला आनंददायक पति होईल ॥ ३६१ ।।।
भीमकेवलीचे हे वचन ऐकून त्या व्यन्तरकन्या येऊन अतिपिंगलाची त्यांनी पूजा केली. त्याला पाहून त्या देवींचा कामविकार अधिक वाढला. त्या देवतानी रतिकूल नामक मुनीचे चरित्र ऐकले व त्यांचा पिता जो मणिनागदत्त त्याचेही चरित्र त्यांनी ऐकिले व सुकेतुचे चरित्रही ऐकले व हे सर्व सत्य असे सिद्ध झाल्यावर त्या मुनीश्वराला त्या सर्वांनी संतोषाने वन्दन केले व त्या निघून गेल्या ॥ ३६२-३६४ ॥
त्यावेळी आम्ही दोघेही वंदनेसाठी तेथे गेलो होतो व आम्ही हे सर्व तेथे ऐकले व पाहिले आणि आम्ही दोघे प्रेमाने भरलेल्या हृदयाचे झालो व तेथून स्वर्गात गेलो ।। ३६५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org