Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-३४२)
महापुराण
एवं प्रयाति कालेऽस्य वारिषेणां सुतां नपः । वसुपालाय पुत्राय स्वस्यादत्त विभूतिमान् ॥ ३३२ अथान्येयुः सभामध्ये पष्टवान्वेष्ठिनं नपः । विरुद्धं कि न वान्योन्यं धर्मादीति चतुष्टयम् ॥ ३३३ परस्परानुकूलास्ते सम्यग्दृष्टिषु साधुषु । न मिथ्यादृक्ष्विति प्राह श्रेष्ठी धर्मादितत्त्ववित् ।। ३३४ इति तद्वचनाद्राजा तुष्टोऽभीष्टं त्वयोच्यतम् । दास्यामीत्याह सोऽप्याख्यज्जातिमत्युक्षयाविति॥३३५ न मया तवयं साध्यमिति प्रत्याह भूपतिः। मां मुञ्ज साधयामीति तमवोचद्वणिग्वरः ॥ ३३६ तदाकर्ण्य गृहत्यागमहं च सह तेऽधुना । करोमि किन्तु मे पुत्रा बालका इति चिन्तयन् ॥ ३३७ सद्यो भिन्नाण्डकोदभतान्मक्षिकादानतत्परान । क्षधापीडाहतान्वीक्ष्य सहसा गहकोकिलान ॥ ३३८ सर्वेऽपि जीवनोपायं जानते जन्तवस्तराम् । स्वेषां विनोपदेशेन तत्कि मे बालचिन्तया ॥ ३३९ इत्यसौ वसुपालाय दत्वा राज्यं यथाविधि । विधाय यौवराज्यं च श्रीपालस्य सपट्टकम् ॥ ३४० गुणपालमहाराजः स कुबेरप्रियोऽग्रहीत् । बहुभिर्भूभुजैः सार्ध तपो यतिवरं श्रितः ॥ ३४१ श्रेष्ठयहिंसाफलालोकान्मयाप्यग्राहि तद्वतम् । तस्मात्त्वं न हतोऽसीति ततस्तुष्टाव सोऽपि तम् ॥
यानन्तर एके दिवशी सभेत राजाने धर्मादि चार पुरुषार्थ एकमेकाबरोबर विरुद्ध आहेत किंवा नाहीत असे श्रेष्ठीला विचारले. श्रेष्ठी म्हणाले जे सम्यग्दृष्टि साधु आहेत त्याच्या ठिकाणी हे धर्मादिक एकमेकाना अनुकूल आहेत पण मिथ्यादृष्टि जनामध्ये ते अन्योन्यानुकूल नाहीत असे धर्माचे स्वरूप जाणणाऱ्या श्रेष्ठीने सांगितले. हे श्रेष्ठिवचन ऐकून राजा आनन्दित झाला व श्रेष्ठीला म्हणाला आपणास जे इष्ट आहे ते मागा मी ते देईन. श्रेष्ठी म्हणाले मला जन्ममरणाचा क्षय हवा आहे. राजा म्हणाला जन्ममरणाच्या क्षयाची मला प्राप्ति झाली नाही. मी त्याचा क्षय आपणास कसा देऊ शकेन ? असे राजा म्हणाला. यानन्तर बरे मला परवानगी द्या मी जन्ममरणाचा क्षय साधू शकतो असे श्रेष्ठी बोलले ॥ ३३२-३३६ ॥
श्रेष्ठीचे भाषण ऐकन राजा म्हणाला मी तुमच्याबरोबर गृहत्याग केला असता पण माझे पुत्र अद्यापि बालक आहेत. असा राजा विचार करीत असता त्यावेळी अंडे फोडन त्यातून पालीची पिल्ले बाहेर पडली आणि भुकेने पीडित होऊन त्यांनी माश्या पकडावयास सुरुवात केली. हे पाहून राजा म्हणाला सर्व प्राणी जगण्याचा उपाय उत्तम रीतीने जाणतात व त्या विषयाच्या उपदेशाची त्यांना आवश्यकता नसते. म्हणून मी बालकांची चिन्ता करणे आवश्यक समजत नाही. याप्रमाणे गुणपालमहाराजाने विचार केला आणि त्याने वसुपालाला विधीला अनुसरून राज्य दिले व श्रीपालाला पट्टबंधनाने युक्त असे युवराजपद दिले. कुबेरप्रिय श्रेष्ठी व अनेक राजे यांच्यासह गुणपालमहाराजानी एका श्रेष्ठ मुनीचा आश्रय घेऊन तपाचा स्वीकार केला ॥ ३३७-३४१ ।।
__ श्रेष्ठीच्या अहिंसावताचे फल पाहून मीही ते अहिंसाव्रत ग्रहण केले. म्हणून मी तुला ठार मारले नाही. हे त्या तळवराचे भाषण ऐकून तो विद्युच्चोर देखिल त्याची स्तुति करू लागला ।। ३४२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org