Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६६०)
महापुराण
(४६-३१९
प्रवेश्य पापधी राजसमीपं स्वयमास्थितः । वसुं गृहीतष्ठिस्वरूपं वीक्ष्य महीपतिः॥३१९ श्रेष्ठी किमर्थमायातोऽकाल इत्यवदत्तदा । अनात्मज्ञोऽयमायातःपापी सत्यवतीं प्रति ॥ ३२० मदनानलसंतप्त इति मैथुनिकोऽब्रवीत् । तद्वाक्यादपरीक्ष्येव तमेवाह प्रहन्यताम् ॥ ३२१ श्रेष्ठी त्वयति श्रेष्ठी च तस्मिन्नेव दिने निशि । स्वगृहे प्रतिमायोगधारको भावयन् स्थितः ॥ ३२२ पृथुधीस्तमवष्टभ्य गृहीत्वा घोषयन् जने । अपराधमसन्तं च नीत्वा प्रेतमहीतलम् ॥ ३२३ आरक्षककरे हन्तुमर्पयामास पापभाक् । सोऽपि राजनिदेशोऽयमित्यहन्नसिना दृढम् ॥ ३२४ तस्य वक्षःस्थले तत्र प्रहारो मणिहारताम् । प्राप शीलवतो भक्तस्याहत्परमदैवते ॥ ३२५ दण्डनादपरीक्ष्यास्य महोत्पातः पुरेऽजनि । क्षयःस येन सर्वेषां किं नादुष्टवधाद्भवेत् ॥ ३२६ नरेशो नागराश्चतदालोच्य भयविह्वलाः । तमेव शरणं गन्तुं श्मशानाभिमुखं ययुः ॥ ३२७ तदोपसर्गनिर्णाशे विस्मयानाकवासिनः । शीलप्रभावं व्यावर्ण्य वणिग्वर्यमपूजयन् ॥ ३२८ अपरीक्षितकार्याणामस्माकं क्षन्तुमर्हसि । इति तेषु भयत्रस्तमानसेष नृपादिषु ॥ ३२९ अस्मदजितदुष्कर्मपरिपाकादभूदिदम् । विषादस्तत्र कर्तव्यो न भवद्भिरिति ध्रुवम् ॥ ३३० वैमनस्यं निरस्यैषां श्रेष्ठी प्रष्ठः क्षमावताम् । सर्वैः पुरस्कृतः पूज्यो विभूत्या प्राविशत्पुरीम् ॥३३१ झाला आहे असे मंत्रिपुत्र पृथुश्रीने राजाला सांगितले. त्याच्या त्या भाषणाचा विचार न करताच राजाने याला तूच मारून टाक असे पृथुश्रीला सांगितले. पण श्रेष्ठी त्या दिवशी रात्री आपल्या घरी प्रतिमायोग धारण करून आत्मचिन्तनात स्थिर झाला होता. राजाची आज्ञा मिळाल्यावर त्या पृथुश्रीने त्याला चांगले बांधले व लोकामध्ये त्याच्या नसलेल्या अपराधाची त्याने घोषणा केली व त्याने त्याला श्मशान भूमीवर नेले व त्या पापी पृथुश्रीने त्या श्रेष्ठीला मारण्यासाठी तळवराच्या आधीन केले. त्याने देखिल राजाची आज्ञा आहे असे समजून त्याच्यावर तरवारीचा दढप्रहार केला ॥ ३१८-३२४ ॥
अर्हत्परमेष्ठी हेच परम उत्कृष्ट दैवत आहे असे समजून त्यांच्या ठिकाणी उत्तम भक्ति करणारा व शीलसंपन्न अशा त्या श्रेष्ठीच्या छातीवर तलवारीने तळवराने केलेला प्रहार रत्नहार बनला. या श्रेष्ठीला विचार न करिता शिक्षा केल्यामुळे नगरात मोठा उत्पात झाला की, ज्याने सर्वाचा नाश होण्याची पाळी आली. बरोबरच आहे की, जो दुष्ट नाही अशाचा वध करण्यापासून कोणता अनर्थ होणार नाही बरे ? या कठिण प्रसंगाचा विचार करून नागरिक लोक आणि राजा ह्या भीतीने व्याकुळ झाले व त्या श्रेष्ठीलाच शरण जाण्यासाठी श्मशानाकडे गेले. त्यावेळी उपसर्गाचा नाश झाला. स्वर्गीय देव आश्चर्ययुक्त होऊन वैश्यश्रेष्ठ श्रेष्ठीच्या शीलाच्या प्रभावाचे वर्णन करून त्याची त्यानी पूजा केली ।। ३२५-३२८ ॥
राजा व प्रधान वगैरे लोकांचे मन भीतीने त्रस्त झाले होते. आम्ही काही विचार न करून हे अकार्य केले आहे. यास्तव हे श्रेष्ठिन्, आपण आम्हाला क्षमा करावी. त्यावेळी श्रेष्ठी स्याना म्हणाले, आम्ही जे पूर्वजन्मी अशुभ कर्म प्राप्त करून घेतले आहे त्याचा हा उदय आहे. याविषयी आपण बिलकूल खिन्न होऊ नका. क्षमा धारण करणा-या लोकात त श्रेष्ठ असलेल्या श्रेष्ठीने त्याच्या मनातील खेद याप्रमाणे बोलन दूर केला. सर्वानी ज्याला पुढे केले आहे अशा पूज्य श्रेष्ठीने वैभवाने नगरात प्रवेश केला. याप्रमाणे काल जात असता श्रेष्ठीची कन्या जी वारिषेणा तिचा आपल्या वसुपाल पुत्राबरोबर राजाने वैभवाने विवाह केला ।। ३२९-३३१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org