Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-३१८)
पठन्मुनीन्द्र सद्धर्मशास्त्र संश्रवणाद्भुतम् । अन्येद्युः प्राक्तनं जन्म विदित्वा शममागते ।। ३११ यागहस्तिनि मांसस्य पिण्डादानमनिच्छति । तद्वीक्ष्योपायविच्छ्र ेष्ठी विबुद्ध्यानेकपेङगितम् ॥ ३१२ सपर्गुडपयो मिश्रशाल्योदनसमर्पितम् । पिण्डं प्रायोजयत्सोऽपि द्विरदस्तमुपाहरत् ॥ ३१३ तवा तुष्ट्वा महीनाथो वृणुष्वेष्टं तवेति तम् । प्राह पश्चाद्गृहीष्यामीत्यभ्युपेत्य स्थितः स नतम् ॥ ३१४ सचिवस्य सुतं दृष्ट्वा नीयमानं शुचा नृपात् । वरमादाय तद्घातात् दुर्वृत्तं तं व्यमोचयत् ।। ३१५ श्रेष्ठिनैव निकारोऽयं ममाकारीत्यमंस्त सः । पापिनामुपकारोऽपि स भुजङ्गपयायते ॥ ३१६ अन्येद्युर्मैथुनो राज्ञः स्वेच्छया विहरन्वने । खेचरान्मुद्रिका मापत्कामरूपविधायिनीम् ॥ ३१७ कराङगुलौ विनिक्षिप्य तां वसोः स्वकनीयसः । सङ्कल्प्य श्रेष्ठिनो रूपं सत्यवत्या निकेतनम् ॥ ३१८
महापुराण
राजाने सत्यवतीला याविषयी विचारले असता तिने ते धन राजापुढे आणून ठेविले. तेव्हा राजा त्या पृथुश्री मेहुण्यावर रागावला. या दुष्टाला मारून टाका असे त्याने आपल्या पायदळाला सांगितले. तेव्हा न्यायाने वागणाऱ्या राजाचे हे कृत्य योग्यच होय ।। ३०८-३१० ॥
(६५९
एके वेळी एक मुनीश्वर सद्धर्मशास्त्राचे पठन करीत असता राजाच्या मुख्य हत्तीच्या कानी त्या शास्त्राचे पठन पडले त्यामुळे शीघ्र त्याला पूर्वजन्माचे स्वरूप समजले, आपण मागील जन्मी कोण होतो याचे स्मरण त्याला झाले व तो शान्त वृत्तीचा बनला व मांसाच्या पिण्डाचा आहार करू नये असे त्याला वाटू लागले. हे पाहून उपाय जाणणान्या त्या श्रेष्ठीने हत्तीच्या मनातील अभिप्राय ओळखला आणि तूप, गूळ, दूध यांनी मिश्र असे तांदळाच्या भाताचे गोळे त्याला खावयास दिले. हा आहार त्याला दररोज देण्यात येऊ लागला व तो हत्ती तोच आहार घेऊ लागला. त्यामुळे राजा श्रेष्ठीवर प्रसन्न झाला व जे तुला आवडते ते माग असे श्रेष्ठीला म्हणाला. तेव्हा पुढे मागेन असे श्रेष्ठीने राजाला म्हटले व तो श्रेष्ठी स्वस्थ बसला ।। ३११-३१४ ॥
याचवेळी त्या पृथुश्री नांवाच्या प्रधानपुत्राला मारण्यासाठी नेत असता पाहून श्रेष्ठीला खेद वाटला आणि त्याने राजापासून पूर्वीचा वर मागून घेतला व त्या दुराचारी प्रधान पुत्राचा वधापासून बचाव केला ।। ३१५ ।।
माझा तिरस्कार या श्रेष्ठीनेच केला असे मंत्रिपुत्राने मानले. बरोबरच आहे की पाप्यावर दुष्टावर उपकार केला तरीही तो सर्पाला पाजलेल्या दुधासारखा होतो ।। ३१६ ॥
एके दिवशी मंत्रिपुत्र वनात विहार करीत असता त्याला एका विद्याधरापासून इच्छितरूप बनविणारी आंगठी प्राप्त झाली ।। ३१७ ।।
Jain Education International
त्या मंत्रिपुत्राने आपल्या धाकट्या वसु नांवाच्या भावाच्या बोटात अंगठी घातली आणि श्रेष्ठीच्या रूपाचा संकल्प करून त्याला त्याने सत्यवतीच्या घरी पाठविले व तो पापी मंत्रिपुत्र व स्वतः राजाकडे जाऊन बसला. ज्याने श्रेष्ठीचे रूप धारण केले आहे अशा वसूला राजाने श्रेष्ठी मानले व त्याला पाहून हा श्रेष्ठी अवेळी का आला असे राजा बोलला. तेव्हा हा श्रेष्ठी अविचारी आहे व पापी आहे व हा सत्यवतीकडे आला आहे. हा मदनाग्नीने सन्तप्त
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org