Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-२९८)
महापुराण
(६५७
इहैव पुष्कलावत्यां विषये पुण्डरीकिणीम् । परिपालयति प्रोत्या वसुपालमहीभजि ॥ २८९ विद्युद्वेगाह्वयं चौरमवष्टभ्य करस्थितम् । धनं स्वीकृत्य शेषं च भवता दीयतामिति ॥ २९० आरक्षिणो निगलीयर्दत्तं विमतये धनम् । इत्यब्रवीत्स सोऽप्याह गहीतं न मयेति तत् ॥२९१ विमतेरेव तद्गेहे दृष्ट्वोपायेन केनचित् । दण्डकारणिकैः प्रोक्तं कांस्यपात्रीत्रयोन्मितम् ॥ २९२ शकृतो भक्षणं मल्लैस्त्रिशन्मष्टयभिताडनम् । सर्वस्वहरणं चैतत्रयं जीवितवाञ्छया ॥ २९३ स सर्वमनुभूयायात् प्राणान्ते नारकी गतिम् । विद्युच्चोरस्त्वया हन्यतामित्यारक्षको नृपात् ॥ २९४ लब्धादेशोऽप्यहं हन्मि नैनं हिंसादिवर्जनम् । प्रतिज्ञातं मया साधोरित्याज्ञां नाकरोदसौ ॥ २९५ गृहीतोत्कोच इत्येष चोरारक्षकयोर्नृपः । शृङ्खलाबन्धनं रुष्ट्वा कारयामास निघृणम् ॥ २९६ त्वयाहं हेतुना केन हतो नेत्यनुयुक्तवान् । प्रतुष्यारक्षकं चौरः सोऽप्येवं प्रत्यपादयत् ॥ २९७ एतत्पुरममष्यैव राज्ञः पितरि रक्षति । गुणपाले महाश्रेष्ठी कुबेरप्रियसंज्ञया ॥ २९८
___ या विदेहक्षेत्रातील पुष्कलावतीदेशात पुण्डरीकिणी नगराचे वसुपालराजा प्रेमाने पालन करीत असता शिपायानी विद्युद्वेग नांवाच्या चोराला पकडले व त्याच्या हातातले धन त्यानी काढून घेतले व बाकीचे धन तू दे असे त्याला ते म्हणाले ।। २८९-२९० ॥
तेव्हा विद्यद्वेगाने सांगितले की, मी ते धन विमतिनामक मनुष्याला दिले आहे. पण विमति म्हणाला की, मी ते धन घेतले नाही ॥ २९१ ॥
परंतु काही उपाय शिपायानी केले तेव्हा ते धन त्याच्या घरात आढळून आले. त्यावेळी दण्ड करणाऱ्या न्यायाधीशानी त्या विमतीला म्हटले की, तुला जर जगण्याची इच्छा असेल तर काशाच्या तीन बुट्ट्या भरून विष्ठा खावी, पहिलवानाच्या तीस बुक्क्या खाव्यात व सर्व द्रव्य द्यावे, त्या तीनही दंडाना अनुभवून तो मरण पावला व नरकगतीत जन्मला ।। २९२-२९३ ॥
_ विद्युच्चोराला तू मारून टाक अशी राजाने आरक्षकाला-तळवराला आज्ञा केली तरीही राजाकडून ज्याला आज्ञा झाली आहे असाही मी या चोराला मारणार नाही कारण मी एका साधूपासून हिंसादिक कार्य करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आहे. त्या प्रतिज्ञेचे रक्षण करण्यासाठी त्याने चोराला मारले नाही ॥ २९४-२९५ ॥
याने लाच घेतली आहे असे राजाने मानले व त्याने त्या चोराला आणि त्या तळवराला रागावून निर्दयपणाने बेड्यांनी बांधून टाकले. त्यावेळी चोराने तळवरावर सन्तुष्ट होऊन विचारले की, कोणत्या कारणाने तू मला मारले नाहीस ते सांग, असे म्हटल्यावर तो तळवर याप्रमाणे सांगू लागला ॥ २९६-२९७ ॥
___ याच राजाचे पिता ज्यांचे नाव गुणपाल होते ते या नगराचे रक्षण करीत होते. त्यावेळी कुबेरप्रिय नामक एक श्रेष्ठी होते ॥ २९८ ।।
म.८६
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org