Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

Previous | Next

Page 666
________________ ४६-२७७) महापुराण (६५५ तज्ज्ञात्वा मत्पिता पुत्र किमेभिर्दुष्करर्वथा । दारिन्यकर्दमालिप्तदेहानां निष्फलैरिह ॥ २७० वतान्येतानि दास्यामस्तस्मै स्वर्लोककाङक्षिणे । ऐहिकं फलमिच्छामो भवेद्येनेह जीविका ॥ २७१ व्रतं दत्तवतः स्थानं तस्य मे दर्शयेत्यसो । मामवादीद्गृहीत्वैनमाव्रजन्नहमन्तरे ॥ २७२ वज्रकेतोर्महावीथ्यां देवतागृहकुक्कुटम् । भास्वकिरणसंशोष्यमाणधान्योपयोगिनम् ॥ २७३ पुंसो हतवतो दण्डं जिनदेवापितं धनम् । लोभादपन्हुवानस्य धनदेवस्य दुर्मतेः॥ २७४ रसनोत्पाटनं हारमनमर्घणिनिर्मितम् । श्रेष्ठिनः प्राप्य चौर्येण गणिकार्य समर्पणात् ॥ २७५ रतिपिङ्गलसञ्जस्य शूले तलवरार्पणात् । निशि मातुः कनीयस्याः कामनिर्लुप्तसंविदः ॥ २७६ पुत्र्या गेहं गतस्याङ्गच्छेदनं पुररक्षिणः । क्षेत्रलोभानिजे ज्येष्ठे मृते दण्डहते सति ॥ २७७ माझ्या पित्याला मी आठ मूलगुण धारण केले आहेत हे समजले तेव्हा मला ते म्हणाले हे पुत्रा, ही व्रते पाळणे मोठे कठिण आहे व ही व्रते व्यर्थ आहेत. दारिद्र्याच्या चिखलाने आपला देह भरला आहे व ही व्रतें निष्फळ आहेत. या लोकी यांचे फल मिळत नाही ॥२७०।। ही व्रते स्वर्गलोकाची ज्याला इच्छा आहे त्याला आपण ही व्रतें देऊ या व ज्याने इहलोकी आमची उपजीविका चालेल असे ऐहिक फल आपणास पाहिजे आहे ते आपण घेऊ या ॥ २७१ ॥ ___ ज्याने हे व्रत तुला दिले आहे त्याचे ठिकाण मला दाखव असे माझे वडील मला म्हणाले व तेव्हा मी वडिलाना घेऊन मुनीकडे जाण्यास निघालो असता वाटेत पुढे वर्णिल्याप्रमाणे गोष्टी घडल्या त्या अशा- ॥ २७२ ॥ __ मोठ्या मार्गात मी असे पाहिले- सूर्याच्या किरणानी वाळणारे धान्य एका देवळातील एक कोंबडा येऊन खात होता. वज्रकेतुनामक मनुष्याने त्याला ठार मारले. तेव्हा त्याला लोक दण्ड करीत आहेत असे वडिलानी मला सांगितले ॥ २७३ ॥ श्रीजिनदेवाने अर्पण केलेले धन लोभाने छपविणारा व ज्याची बुद्धि दुष्ट झाली आहे अशा धनदेवाची जीभ उपडली जात आहे असे दृश्य पिता-पुत्रानी पाहिले ॥ २७४ ।। पुढे जात असता, आणखी एक दृश्य त्यानी पाहिले- एका श्रेष्ठीचा अमूल्यरत्नानी बनविलेला हार चोरीने मिळवून तो रतिपिङ्गलनामक मनुष्याने एका वेश्येला दिला त्यामुळे त्याला पकडून तलवर- कोतवालाने त्याला सुळावर चढविले होते हे दृश्य त्यानी पाहिले ॥ २७५ ॥ यानंतर पुढे जात असता ज्याची कामवेदनेने विवेक बुद्धि नष्ट झाली आहे व त्यामुळे आपल्या धाकट्या सावत्र मातेच्या मुलीच्या घरी जो गेला होता अशा फौजदाराचे अंग तोडणे हे दृश्य दिसले ।। २७६ ॥ शेताच्या लोभाने आपल्या वडील भावाला काठीने ठोकून ज्याने मारले आहे व लोल (लोभी) ज्याचे सार्थक नांव आहे अशा मनुष्याला देशातून हाकालून देत असता जो शोक चालला होता हे दृष्य त्या पिता-पुत्रानी पाहिले ।। २७७ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 664 665 666 667 668 669 670 671 672 673 674 675 676 677 678 679 680 681 682 683 684 685 686 687 688 689 690 691 692 693 694 695 696 697 698 699 700 701 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720