Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६५४)
महापुराण
(४६-२६०
प्रभावतीचरी देवी श्रुत्वा देवश्च तत्पतिः । स्वपूर्वभवसम्बन्धं तत्रागातां सभावनेः ॥ २६० निजान्यजन्मसौख्यानुभूतदेशानिजेच्छया। आलोकयन्तौ तत्सर्पसरोवणसमीपगौ ॥ २६१ सहसार्थेन भीमाख्यं साधुं दृष्ट्वा समागतम् । विनयेनाभिवन्धनं धर्म तौ समपृच्छताम् ॥ २६२ मुनिस्तद्वचनं श्रुत्वा नाहं धर्मोपदेशने । सर्वागमार्थविकार्येऽसमर्थो नवसंयतः ॥ २६३ प्ररूपयिष्यते किञ्चित्स युष्मदनुरोधतः । मया तथापि श्रोतव्यं यथाशक्त्यवधानवत् ॥२ ६४ इति सम्यक्त्वसत्पात्रदानादिश्रावकाश्रयम् । यमादियतिसम्बन्धं मागं गतिचतुष्टयम् ॥ २६५ तद्धेतुफलपर्यन्तं भुक्तिमुक्तिनिबन्धनम् । जीवादिद्रव्यतत्त्वं च यथावत्प्रत्यपादयत् ॥ २६६ ततश्रुत्वा पुनरप्याभ्यां भवता केन हेतुना । प्रव्रज्येत्यनयुक्तोऽसौ वक्तुं प्रकान्तवान्मुनिः ॥ २६७ विदेहे पुष्कलावत्यां नगरी पुण्डरीकिणी । तत्राहं भीमनामासं स्वपापाद्दुर्गते कुले ॥ २६८ अन्येार्यतिमासाद्य किञ्चित्कालादिलब्धितः । श्रुत्वा धर्म ततो लेभे गृहिमूलगुणाष्टकम् ।। २६९
त्याच वेळी पूर्वी प्रभावती असलेली देवी आणि तिचा पति असलेला देव यानीही त्या जिनेश्वरापासून स्वतःच्या पूर्वभवाचा सम्बन्ध ऐकला व नंतर ते दोघे समवसरणातून त्या ठिकाणी आले जेथे त्यांनी आपल्या अन्य जन्मात-पूर्वजन्मात सौख्याचा अनुभव घेतला होता. अर्थात् सर्पसरोवराच्या जवळ वनात ते दोघे आले. तेथे व्यापारी लोकांच्या समूहाबरोबर आलेल्या भीम नामक साधूला त्यानी पाहिले व विनयाने त्या दोघानी त्याना वन्दन केले आणि धर्माचे स्वरूप त्यानी त्याला विचारले. मुनीनी त्यांचे वचन ऐकले व ते म्हणाले सर्वागमातील जीवादिपदार्थाच्या स्वरूपाचा मी जाणता नाही. म्हणून धर्मोपदेश करण्याच्या कार्यात मी असमर्थ आहे व नवीन यति झालो आहे. पण तुम्ही मला आग्रह केला आहे यास्तव मी माझ्या शक्तीला अनुसरून सांगतो. तुम्ही लक्ष देऊन ऐकावे. असे म्हणून सम्यक्त्व, सत्पात्रदान, आदिक श्रावकसंबंधी धर्म आणि आजन्म पाळण्याचे महाव्रतादि मुनिसम्बंधी मार्ग, मनुष्यादिक चार गति, त्यांची कारणे व त्यांची फले यांचे त्यांनी यथार्थ वर्णन केले. स्वर्गादि सुखभोग व मुक्तीची कारणे यांचे त्यानी वर्णन केले व जीवादिद्रव्यांचे जसे स्वरूप आहे तसे त्यानी सांगितले ॥ २६०-२६६ ॥
तो त्या मुनीचा उपदेश ऐकल्यानन्तर पुनः आम्ही दोघानी आपण कोणत्या कारणाने दीक्षा घेतली असा प्रश्न त्याना केला तेव्हा ते मुनि याप्रमाणे सांगू लागले ॥ २६७ ।।
विदेहक्षेत्रातील पुण्डरीकिणी नगरीत माझ्या पूर्व पापामुळे दरिद्री कुलात जन्म झाला. माझे भीम असे नांव आहे ।। २६८ ।।।
एके दिवशी माझ्या काही काललब्धीमुळे मी यति जैनसाधूकडे गेलो. त्यांचा धर्मोपदेश ऐकला व त्यांच्यापासून गृहस्थाच्या आठ मूलगुणांचा स्वीकार केला ॥ २६९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org