Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६५२)
महापुराण
(४६-२३९
पुनस्तत्रागता दृष्टा वीक्षेयं केन हेतुना । तवेति सा मया पृष्ठा प्रप्रणम्य प्रियोक्तिभिः ॥ २३९ श्रेष्ठ्येव ते तपोहेतुरिति प्रत्यब्रवीदसौ । निगूढं तद्वचः श्रेष्ठी श्रुत्वागत्य पुरः स्थितः ॥ २४० मामजैषीत्सखासौ मे क्वायेति परिपृष्टवान् । सोऽपि मत्कारणेनैव गृहीत्वेहागतस्तपः ॥ २४१ इति तद्वचनाच्छ्रेष्ठी नपश्चाभ्येत्य तं मुनिम् । वन्दित्वा धर्ममापृच्छय काललब्ध्या महीपतिः॥२४२ गुणपालाय तद्राज्यं दत्वा संयममाददौ । निकटे रतिषणस्य विद्यापरमुनीशिनः ।। २४३ पंचमं स्वपदे सुनुं नियोज्यान्यः सहात्मजः । ययौ श्रेष्ठी च तत्रैव दीक्षां मोक्षाभिलाषुकः ॥ २४४ तथोक्त्वा कान्तवृत्तान्तं सा समुत्पन्नसंविदा । विरज्य गृहसंवासात्कुबेराविधियं सती ॥ २४५ गणपालाय दत्वा स्वां सुतां गुणवतीं श्रिता । प्रभावत्युपदेशेन प्रियवत्ताप्यदीक्षत ॥ २४६
पुत्रासह उत्तम शिबिकेमध्ये बसून मी प्रियदत्ता वनाकडे चालले होते व कुबेरश्रीचा गर्भ माझ्या पोटात होता. अशी मी वनात आल्यानंतर मला गांधारीने पाहिले व तिने मला निराळे नेऊन असे विचारले- तुझा श्रेष्ठी जो तुझा पति आहे तो पुरुष आहे किंवा नाही. कारण मी पुरुष नाही असे तो म्हणाला होता. ते त्याचे म्हणणे खरे की खोटे सांग? तेव्हा मी तिला म्हणाले ते सत्य आहे. माझ्याहून अन्य स्त्रीच्या ठिकाणी तो पुरुष नाही. ते ऐकून ती गांधारी विरक्त झाली व आपल्या पतीसह तिने संयमाचा आश्रय केला ॥ २३४-२३८ ।।
पुनः त्या ठिकाणी आलेल्या तिला मी पाहिले. तिला मी नमस्कार केला व मधुर भाषणानी 'तुला ही दीक्षा कोणत्या कारणाने प्राप्त झाली, असे विचारले. तिने मला म्हटले की, तुझा श्रेष्ठीच-पतीच कारण आहे असे ती मला म्हणाली. ते तिचे भाषण गप्तपणाने ऐकन श्रेष्ठी (कबेरकान्त) पढे येऊन उभे राहिले व त्यानी तिला विचारले की, ज्याने मला
असा माझा मित्र आज कोठे आहे ? तेव्हा तिने श्रेष्ठीला सांगितले की, माझ्या कारणानेच तुझ्या मित्राने तप धारण केले आहे व तोही येथे आला आहे. हे तिचे वचन ऐकून राजा व श्रेष्ठी त्या मुनीकडे आले व त्या मुनीला त्यानी वन्दन करून धर्माचे स्वरूप विचारले. काललब्धि आल्यामुळे लोकपालराजाने गुणपालाला ते राज्य दिले व विद्याधर मुनीश अशा रतिषणाच्या जवळ त्याने दीक्षा धारण केली ।। २३९-२४३ ।।
कुबेरकान्त श्रेष्ठीने आपल्या पाचव्या मुलाला (कुबेरप्रियाला) आपल्या राजश्रेष्ठीपदावर स्थापिले आणि बाकीच्या पुत्रासह तो त्याच गुरुजवळ-रतिषेणाजवळ गेला व मोक्षाभिलाषेने त्यानी दीक्षा घेतली ।। २४४ ।।
याप्रमाणे श्रेष्ठिनीने आपल्या पतीची हकीकत सांगितली व तिने ही उत्पन्न झालेल्या आत्मज्ञानाने वैराग्य धारण केले. तिने आपली मुलगी कुबेरश्री ही गुणपालाला दिली. त्याच्याशी तिचा विवाह केला. घरात राहण्यापासून तिला विरक्तता उत्पन्न झाली. प्रभावतीच्या उपदेशाने गुणवतीआयिकेचा तिने आश्रय घेतला व तिच्याजवळ तिने (प्रियदत्तेने ) दीक्षा घेतली ॥ २४५-२४६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org