________________
६५०)
महापुराण
(४६-२१९
प्रभावती च तन्मात्रा गुणवत्यास्तपोऽगमत् । कुतश्चन्द्रमसं मुक्त्वा चन्द्रिकायाः स्थितिः पथक् ॥ सद्वत्तस्तपसा दीप्रो दिगम्बरविभूषणः । निस्सङ्गो व्योमगाम्येकविहारी विश्ववन्दितः ॥ २२० नित्योदयो बुधाधीशो विश्वदृश्वा विरोचनः । स कदाचित्समागच्छन्मोदयन् पुण्डरी किणीम् ॥२२१ सुप्रभाचन्द्रलेखेव सह तत्र प्रभावती । गुणवत्या समागस्त सङ्गतिः स्याद्यदृच्छया ॥ २२२ गुणवत्यादिका दृष्ट्वा नत्वोक्ताः प्रियदत्तया । कुतोऽसौ गणिनीत्याख्यत्स्वर्गतेति प्रभावती ॥२२३ तच्छरुत्वा नेत्रभता नौ सैवेति शुचमागता। कुतः प्रीतिस्तयेत्युक्ता साब्रवीप्रियदत्तया ॥ २२४ न स्मरिष्यसि कि पारावतद्वन्द्वं भवद्गृहे । तत्राहं रतिषेणेति तच्छ्रुत्वा विस्मितावदत् ॥ २२५
प्रभावतीने ही आपल्या पतीच्या मातेसह-शशिप्रभासासूसह गुणवती आर्यिकेजवळ दीक्षा घेतली. बरोबरच आहे की, चन्द्राला सोडून त्याची चन्द्रिका ज्योत्स्ना-प्रभावती कशी वेगळी राहू शकेल बरे ? ॥ २१९ ।।
ते हिरण्यवर्मा मुनिराज सूर्याप्रमाणे दिसत होते. सूर्य सद्वृत्त-पूर्णगोल असतो. हे मुनिराजही सद्वृत्त उत्तम आचारयुक्त होते. तपश्चरणाने दीप्र-उज्ज्वल-तेजस्वी होते. सूर्य आपल्या उष्णतेने तेजस्वी असतो. सूर्य दिशा व आकाशाला भूषणस्वरूप असतो व हे मुनिराज दिशारूपी वस्त्रांच्या भूषणानी युक्त होते. सूर्य आकाशात कोणाशी संबंध ठेवीत नाही हे मुनिवर्यही निःसङ्ग-परिग्रहममत्वरहित होते. सूर्य आकाशातून गमन करणारा व हे मुनिराज व्योमगामी तपोऋद्धीने आकाशातून विहार करणारे व एकविहारी होते. सूर्य विश्वमान्य असतो, हे मुनि विश्ववंदित होते. सूर्य दररोज उदयाला येतो, हे मुनि दररोज आचरणात उदयउत्कर्षयुक्त होते. सूर्य बुध वगैरे ग्रहांचा स्वामी असतो व हे मुनि बुधाधीश- सर्व विद्वानांचे प्रभु होते. सूर्य विश्वदृश्वा सर्व जगातील पदार्थाना प्रकाशित करतो, हे मुनिराज विश्वदृश्वासर्व विश्वाला जाणत होते ॥ २२० ।
असे हे मुनिराज कोणे एकेवेळी लोकाना आनंदित करीत पुण्डरीकिणी नगरीला आले. चन्द्राची कोर जशी प्रभायुक्त असते तशी प्रभावती आर्यिका देखिल गुणवती आयिकेबरोबर साहजिक रीतीने त्याच नगरीला आली ।। २२१-२२२ ।।
गुणवती वगैरे आर्यिकाना पाहून व त्याना वन्दन करून प्रियदत्तेने त्याना विचारले की, ती अमितमति आर्यिका कोठे आहे ? तेव्हा गुणवती आयिकेने सांगितले की, ती स्वर्गवासिनी झाली आहे. हे ऐकून ती प्रभावती आर्यिका म्हणाली की, ती तर आम्हा दोघाना डोळयासारखी होती म्हणून ती शोकयुक्त झाली. तेव्हा प्रियदत्तेने विचारले की, तिच्याशी तुमची प्रीति कशी ? त्यावेळी प्रभावती म्हणाली की, तुमच्या घरी दोन कबूतरांची जोडी होती हे तुम्हाला आठवत नाही काय ? त्यापैकी मी रतिषेणा नामक कबुतरी होते ती आता मी प्रभावती झाल्ये आहे. ते ऐकून ती प्रियदत्ता आश्चर्ययुक्त होऊन असे बोलली ॥ २२३-२२५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org