Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-२३८)
महापुराण
(६५१
क्वासौ रतिवरोऽद्येति सोऽपि विद्याधराधिपः । हिरण्यवर्मा कर्मारेतिरत्रेति साब्रवीत् ॥ २२६ प्रियदत्तापि तं गत्वा वन्दित्वैत्य महामुनिम् । प्रभावतीपरिप्रश्नात्पत्युरित्याह वृत्तकम् ॥ २२७ विजयाद्धगिरेरस्य गान्धारनगरादिह । विहर्तुं रतिषणोऽमा गान्धार्या प्रिययागमत् ॥ २२८ गान्धारी सर्पदष्टाहमिति तत्र मृषा स्थिता । मन्त्रौषधीः प्रयोज्यास्याः श्रेष्ठी विद्याधरश्च सः ॥२२९ मायया नास्मि शान्तेति तद्वाक्यात्खेदमागते । आहर्तुं स्वपतौ याते वनं शक्तिमदौषधम् ॥ २३० गान्धारी बन्धकीभावमुपेत्य स्मरविक्रियाम् । दर्शवन्ती निरीक्ष्याह वणिग्वर्यो दृढव्रतः ॥ २३१ अहं वर्षधरो वेत्सि न कि मामित्युपायवित् । व्यधाद्विरक्तचित्तां तां तदेव हि धियः फलम् ॥२३२ तदानीमागते पत्यो स्वे स्वास्थ्यमहमागता । पूर्वोषधप्रयोगेणेत्युक्त्वागात्सपतिःपुरम् ॥ २३३ दयितान्तकुबेराख्यो मित्रान्तश्च कुबेरवाक् । परः कुबेरदत्तश्च कुबेरश्चान्त्यदेववाक् ॥ २३४ कुबेरादिप्रियश्चान्यः पञ्चैते सञ्चितश्रुताः । कलाकौशलमापन्नाः सम्पन्ननवयौवनाः ॥ २३५ एतैः स्वसूनुभिः सार्धमारुह्य शिबिकां वनम् । धृत्वा कुबेरश्रीगर्भ मां विहाँ समागताम् ॥ २३६ दृष्ट्वा कदाचिद्गान्धारी पृथक्पृष्टवती पुमान् । त्वच्छ्रेष्ठी नेति तत्सत्यमत नेत्यन्ववादिशम् ॥२३७ तत्सत्यमेव मत्तोऽन्यां प्रत्यसो न पुमानिति । तदाकर्ण्य विरज्यासौ सपतिः संयमं श्रिता ॥ २३८
तो रतिवर आता कोठे आहे असे विचारल्यावर प्रभावती म्हणाली की, तो देखिल विद्याधराचा स्वामी हिरण्यवर्मा झाला आहे व कर्मशत्रूचा नाश करणारा तो येथेच आहे असे प्रभावती बोलली ॥ २२६ ।।
तेव्हा प्रियदत्ता देखिल त्याच्याकडे गेली व तिने त्या महामुनीला वन्दन केले व परत आली तेव्हा प्रभावतीच्या प्रश्नामुळे तिने आपल्या पतीचे याप्रमाणे वृत्त सांगितले ॥ २२७ ।।
या विजयार्ध पर्वताच्या गांधारनगरातून येथे क्रीडा करण्यासाठी रतिषेण आपल्या प्रिय गांधारीसह आला असे प्रियदत्तेने सांगितले. गांधारी मला सर्प चावला असे खोटे सांगून तेथेच बसली तेव्हा रतिषेण व श्रेष्ठी हे हिच्यावर मन्त्र व औषधीचा प्रयोग करू लागले. परन्तु तिने कपटाने मला कांही शान्तता वाटत नाही असे सांगितले तेव्हा तो रतिषणविद्याधर मनात खिन्न झाला व तो सामर्थ्ययुक्त औषध आणण्यासाठी गेला. यानन्तर ती गांधारी वेश्येप्रमाणे कामविकाराचे प्रदर्शन करू लागली. ते पाहून आपल्या शीलपालनात दृढ असलेला वैश्यश्रेष्ठ कुबेरकान्त योग्य उपाय मनात योजून तिला म्हणाला की, मी वर्षधर आहे अर्थात् नपुंसक आहे हे तू जाणत नाहीस काय ? असे म्हणून त्याने तिला विरक्त बनविले, तिला या दुर्व्यसनापासून विरक्त केले. हेच बुद्धीचे फल होय ॥ २२८-२३२ ॥
त्यावेळी तिचा पति आल्यानंतर आता मी स्वस्थ झाल्ये आहे. पूर्वीच्या औषध प्रयोगाने मला बरे वाटत आहे असे बोलून ती आपल्या पतिसह नगरीत आली ॥ २३३ ।।
__प्रियदत्तेला पाच पुत्र होते. त्यांची नांवे क्रमाने अशी- कुबेरदयित, कुबेरमित्र, कुबेरदत्त, कुबेरदेव, कुबेरप्रिय. हे पाच पुत्र सर्व शास्त्रांचे अध्ययन केलेले होते. अनेक प्रकारच्या कलामध्ये ते कुशल होते व त्यांनी नवतारुण्यात प्रवेश केला होता. या आपल्या सर्व
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org