Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६६४)
महापुराण
(४६-३६६
इत्यात्मीयभवावलीमनुगतैर्मान्यैर्मनोरञ्जनः । स्पष्टैस्खरलितैः कलैरविरलैख्याकुलर्जल्पितैः ॥
आत्मोपात्तशुभाशुभोदयवशोद्भूतोच्चनीचस्थितिम् । संसर्पदशनांशुभूषितसभासभ्यानसावभ्यधात् ॥ ३६६ श्रुत्वा तां हृदय प्रियोक्तिमतुषत्कान्तो रतान्ते यथा। संसच्च व्यकसत्तरां शरदि वा लक्ष्मीः सरःसंश्रया ॥ कान्तानां वदनेन्दुकान्तिरगलत्तद्वाग्दिनेशोद्गतेः। अस्थाने कृतमत्सरोऽसुखकरस्त्याज्यस्ततोऽसौ बुधैः ॥ ३६७ कान्तोऽभूद्रतिवेगया वणिगसौ पूर्व सुकान्तस्तनः। सञ्जातो रतिषेणया रतिवरो गेहे कपोतो विशाम् ॥ वत्यन्तप्रभयाभवत्खगपतिवर्मा हिरण्यादिवाक।
देवः कल्पगतो मया सह महादेव्याजनीड्यो भवान् ॥ ३६८ सकलमविकलं तत्सप्रपञ्च रमण्या। मुखकमलरसावतं श्रोत्रपात्रे निधाय ॥ तदुदितमपरं च श्रोतुकामो जयोऽभूत् । न रसिकदयितोक्तैः कामुकास्तृप्नुवन्ति ॥ ३६९ इत्याचे त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते जयसुलोचना
___ भवान्तरवर्णनं नाम षट्चत्वारिंशत्तमं पर्व समाप्तम् ॥ ४६
चोहीकडे पसरणाऱ्या दातांच्या किरणांनी जिने सभेला भूषविले आहे अशा या सुलोचनेने स्वतः ग्रहण केलेल्या शुभाशुभकर्माच्या उदयाच्या आधीन झालेली जी आपली उच्च व नीच अवस्था तिने युक्त जी आपली अनेक जन्मांची पंक्ति ती सर्व सभ्यांना मान्य, मनोरञ्जक, स्पष्ट अखण्ड, मधुर व व्याकुलतारहित अशा भाषणानी सांगितली ।। ३६६ ॥
__ तिचा पति जयकुमार जसा संभोगाच्या शेवटी आनंदित होत असे तसा तिचे हृदयाला आवडणारे असे भाषण ऐकून आनन्दित झाला. शरदृतुमध्ये सरोवराचा आश्रय घेतलेली लक्ष्मी जशी शोभते तशी ती सभा अधिक विकसित झाली, आनंदित झाली. पण सुलोचनेच्या वचनरूप सूर्याचा उदय झाल्यामुळे तिच्या सवतीच्या मुखचन्द्राची कान्ति गळून गेली व हे योग्यच झाले कारण अस्थानी केलेला मत्सर हा दुःखदायक असतो तो विद्वानानी त्यागावा ॥ ३६७ ॥
सुलोचना जयकुमाराला म्हणते- स्तुत्य असे आपण पूर्वी सुकान्त नांवाचा वैश्य होता व त्यावेळी आपण रतिवेगेशी विवाह होऊन तिचे कान्त पति झालात. यानन्तर आपण श्रेष्ठीच्या घरी रतिषणेसह रतिवर नांवाचा कबूतर झाला. यानन्तर प्रभावतीबरोबर हिरण्यवर्मा नामक विद्याधर पति झालात. नंतर महादेवी अशा माझ्याबरोबर स्वर्गात देव झालात ।। ३६८ ॥
मुखकमलातील रसाने भरलेला अविकल- दोषरहित असा सुलोचनेचा सविस्तर सर्व भाषणसमूह जयकुमाराने आपल्या कर्णरूपी पात्रात ठेवला व सुलोचनेचे इतर भाषणही ऐकण्याची इच्छा त्याला झाली. बरोबरच आहे की, रसिक अशा स्त्रीने केलेल्या भाषणानी कामुकजन तृप्त होत नाहीत. नेहमी त्याना रसिक स्त्रीचे भाषण ऐकावे असेच वाटत असते ॥ ३६९ ॥
___ भगवद्गुणभद्राचार्यांनी रचलेल्या आर्ष त्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहांतील जयकुमार व सुलोचना यांच्या भवान्तरांचे वर्णन करणारे हे शेहेचाळीसावें पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org