Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६४८)
महापुराण
(४६-२०३
प्रापितोऽप्यसकृददुःखं भोगस्तानेव याचते । धत्तेऽवताडितोऽप्याघ्री मात्रास्या एवं बालकः ॥२०३ भध्रुवत्वं गुणं मन्ये भोगायुःकायसम्पदाम् । ध्रुवेष्वेषु कुतो मुक्तिविना मुक्तेः कुतः सुखम् ॥२०४ वित्रम्भजननः पूर्व पश्चात्प्राणार्थहारिभिः । पारिपन्थिकसङ्काविषयः कस्य नापदः ॥ २०५ तदुःखस्यैव माहात्म्यं स्यात्सुखं विषयश्च यत् । यत्कारवेल्लकं स्वादु प्राभवं ननु तत्क्षुधः ॥२०६ सङ्कल्पसुखसन्तोषाद्विमुखश्चात्मजात्सुखात् । गुजाग्नितापसन्तुष्टशाखामृगसमो जनः ॥ २०७ सदास्ति निर्जरा नासौ मुक्त्यै बन्धच्युतेविना । तच्च्युतिश्च हतेर्बन्धहेतोस्तत्तद्धतौ यते ॥ २०८ केन मोक्षः कथं जीव्यं कुतः सौख्यं क्व वा मतिः । परिग्रहमहाग्राहगहीतस्य भवार्णवे॥ २०९ कि भव्यः किमभव्योऽयमिति संशेरते बुधाः । ज्ञात्वाप्यनित्यतां लक्ष्मीकटाक्षशरशायिते ॥ २१०
या पंचेन्द्रियांच्या विषयभोगांनी या जीवाला वारंवार दुःख दिले आहे. तथापि हा जीव पुनः पुनः त्यांचीच याचना करतो. जसे बालकाला मातेने लाथ मारली तर तो बालक त्या लाथेलाच-पायालाच पकडतो । २०३ ।।
भोग, आयु, शरीर आणि संपत्ति यांच्यामध्ये अध्रुवपणा-अस्थिरपणा हा गुणच आहे असे मला वाटते. जर हे पदार्थ नित्य असते तर मुक्तिलाभ कोणालाच झाला नसता व मुक्ति प्राप्त झाली नाही तर, मुक्तीचे खरे सुख कोणालाच मिळाले नसते ॥ २०४ ॥
प्रथम विश्वास उत्पन्न करणारे व नन्तर प्राण आणि धन हरण करणारे शत्रुसारखे असलेल्या या विषयांनी कोणाला बरे दुःखें प्राप्त होणार नाहीत ॥ २०५ ॥
मनुष्याला विषयसेवनाने सुख वाटते. ते तसे वाटणे हे दुःखाचे माहात्म्य सामर्थ्य समजावे. कारण कारले जे गोड लागते ते खरोखर भुकेचेच सामर्थ्य आहे ।। २०६ ।।
केवल संकल्पिलेल्या सुखाने आनंदित होऊन आत्मस्वरूपापासून उत्पन्न होणाऱ्या सुखापासून पराङमुख झालेला हा जीव तांबड्या गुंजांना अग्नि समजून त्याच्या तापाने उष्णतेने सन्तुष्ट होणा-या माकडाप्रमाणे समजावा ।। २०७ ॥
___ कर्मांची नेहमी निर्जरा होते पण ती निर्जरा मोक्षाला कारण नाही. कारण ती निर्जरा बन्धाने रहित नाही. बन्धाची जी मिथ्यात्वादिक कारणे आहेत ती नष्ट जोपर्यन्त झाली नाहीत. तोपर्यन्त कर्मबन्ध होत राहणारच. बन्धाची कारणे नष्ट झाली म्हणजे बन्ध नाहीसा होतो व कर्मबन्धरहित निर्जरा ही मुक्तिलाभाला कारण होते. म्हणून मी बन्धाच्या कारणांचा घात करण्यात प्रयत्न करीन ।। २०८॥
__ या संसारसमुद्रात बाह्य आणि अन्तरंग परिग्रहरूपी सुसरीने पकडलेल्या या जीवाला मोक्ष कसा मिळावा अर्थात् परिग्रहरूपीसुसरीपासून त्याची कशी सुटका व्हावी? त्याने कसे जगावे ? त्याला सुख कशापासून होईल ? व त्याने आपली बुद्धि कशात बरे ठेवावी ॥ २०९ ।।
__या जगाची अनित्यता जाणून देखिल किंवा लक्ष्मीच्या कटाक्षरूपी बाणावर झोपलेल्या जीवाच्या ठिकाणी हा भव्य आहे ? किंवा अभव्य आहे अशी विद्वान् लोक शंका घेतात ॥२१०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org