Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-२०२)
बन्धः सर्वोऽपि सम्बन्धो भोगो रोगो रिपुर्वपुः । दीर्घमायासयत्यायुस्तृष्णाग्नेरिन्धनं धनम् ॥ १९६ आदौ जन्म जरारोगा मध्येऽन्तेऽप्यन्तकः खलः । इति चक्रकसम्भ्रान्तिर्जन्तोर्मध्ये भवार्णवम् ॥ १९७ भोगिनो भोगवद्भोगा भोगा नाम न भोग्यकाः । एवं भावयतो भोगान्भूयोऽभूवन्भयावहाः ॥१९८ निषेव्यमाणा विषया विषमा विषसंनिभाः । देदीप्यन्ते बुभुक्षाभिर्दोपनीयैरिवौषधैः ॥ १९९ न तृप्तिरेभिरित्येष एव दोषो न पोषकाः । तृषश्च विषवल्लर्याः संसृतेश्चावलम्बनम् ॥ २०० वनितातनु सम्भूत कामाग्निस्नेहदीपनैः । कामिनं भस्मसाद्भावमनीत्वा न निवर्तते ॥ २०१ जन्तोर्भागेषु भोगान्ते सर्वत्र विरतिर्ध्रुवा । स्थैर्ये तस्याः प्रयत्नोऽस्य क्रियाशेषो मनीषिणः ॥ २०२
महापुराण
(६४७
स्त्री-पुत्रादिकांचा जेवढा सम्बन्ध आहे तो सगळाच आत्म्याला प्रतिक्षणी कर्मबन्ध होण्यास कारण आहे. पंचेन्द्रियांचे भोगोपभोगाचे पदार्थ हे संसाररोगाला उत्पन्न करणारे आहेत व हे शरीर जीवाचा शत्रु आहे व दीर्घ आयुष्य आत्म्याला त्रास देते आणि हे धन तृष्णारूपी अग्नि प्रदीप्त करण्यास लाकडाप्रमाणे आहे ।। १९६ ॥
या प्राण्याला प्रथम जन्म प्राप्त होतो. त्यानन्तर मध्यदशेंत वृद्धावस्था आणि रोग प्राप्त होतात व अन्ती हा दुष्ट यम याला पीडा देतो. याप्रमाणे या संसारसमुद्रात चक्राप्रमाणे फिरावे लागत आहे ।। १९७ ।।
हे भोगाचे पदार्थ भोगी - सर्पाच्या भोगवत् - शरीराप्रमाणे भयानक असल्यामुळे भोगण्यास योग्य नाहीत. याप्रमाणे वारंवार भावना करणाऱ्या आत्म्याला हे भोग मोठे भयंकर वाटतात ।। ९९८ ॥
हे सेविले जाणारे विषय विषाप्रमाणे विषम-सन्ताप देणारे आहेत. जसे दीपन करणा-या औषधानी जठराग्नि प्रदीप्त होतो तसे हे विषय भोग उपभोगांच्या इच्छा वाढल्यामुळे अधिकच पेट घेतात. वारंवार हे भोगाचे पदार्थ मिळावेत अशी इच्छा उत्पन्न होते ।। १९९ ॥
या विषयांच्या सेवनाने तृप्ति होत नाही एवढाच दोष यात आहे असे नाही तर हे तृष्णेला - आशेला पोषक आहेत. याचप्रमाणे संसाररूप जी विषवेल आहे तिला हे विषय आश्रयस्थान आहेत ॥ २०० ॥
स्त्री ही शरीरात उत्पन्न झालेल्या मदनाग्नीला स्नेह-प्रेमरूपी तेलाने वाढवून कामी पुरुषाला भस्म केल्यावाचून राहत नाही ॥ २०१ ।।
Jain Education International
या जीवाला विषयांचा भोग घेतल्यानन्तर त्या भोगाविषयीं सर्वत्र विरक्तपणा उत्पन्न होतो. तो विरक्तपणा स्थिर राहावा म्हणून विद्वान् लोकांच्या स्वाध्याय, ध्यानादिक क्रिया असतात ॥ २०२ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org