Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६४६)
महापुराण
(४६-१८२
पुनः प्रियां जयः प्राह प्रकृतं किञ्चिदस्त्यतः । अवशिष्टं तदप्युच्चस्त्वया कान्ते निगद्यताम् ॥१८६ इति पत्युः परिप्रश्नाद्दशनज्योत्स्नया सभाम् । मूर्तिः कुमद्वतीं वेन्दोविकाशमुपनीय ताम् ॥ १८७ सातवीदिति तद्वृत्तं स्वपुण्यपरिपाकजम् । सुखं राज्यसमुद्भूतं यथेष्टमपि निविशन् ॥ १८८ परेयुः कान्तया साधं स्वेच्छया विहरन्वनम् । सरो धान्यकमालाख्यं वीक्ष्यादित्यगतेः सुतः ॥१८९ स्वप्राच्यभवसम्बन्धं प्रत्यक्षमिव लक्षयन् । काललब्धिबलाल्लब्धनिर्वेदो विदुषां वरः ॥ १९० भङगुरः सङ्गमः सर्वोऽप्यङगिनामभिवाञ्छितः । कि नाम सुखमत्रेदमल्पसङ्कल्पसम्भवम् ॥ १९१ आयुर्वायुचलं कायो हेय एवामयालयः । साम्राज्यं भुज्यते लोलैर्बालिशैर्बहुदोषलम् ॥ १९२ अदूरपारः कायोऽयमसारो दुरितशयः । तादात्म्यमात्मनोऽनेन धिगेनमशुचिप्रियम् ॥ १९३ देहवासो भयं नास्य यानमस्मान्महद्भयम् । देहिनः किल मार्गस्य विपर्यासोऽत्र निर्वृतेः ॥ १९४ नीरूपोऽयं स्वरूपेण रूपी देहैररूपता । निर्वाणाप्तिरतो हेयो देह एव यथा तथा ॥ १९५
पुनः हे कान्ते, प्रस्तुतकथेचा काही भाग अद्यापि सांगावयाचा राहिला आहे तो देखिल सगळा सांग असे जयकमाराने तिला म्हटल्यावर चन्द्राची मति जशी कमलिनीला आपल्या चांदण्याने प्रफल्ल करते तशी आपल्या दन्तकान्तीच्या चांदण्याने सुलोचनेने त्या सभारूपी कमलिनीला विकसित करून पुढे सांगितल्याप्रमाणे ते वृत्त सांगितले. ती म्हणाली- आदित्यगतीचा पुत्र अशा हिरण्यवर्माने आपल्या पुण्याच्या उदयाने प्राप्त झालेले राज्याचे सुख यथेष्ट भोगले व पुनः एके दिवशी आपल्या कान्तेसह स्वेच्छेने वनात विहार करीत धान्यकमाल नामक वनात गेला. तेथे त्याला आपल्या पूर्वीच्या भवाचा संबन्ध साक्षात् अनुभवत आहोत असे वाटले व काललब्धीच्या सामर्थ्याने त्याला वैराग्य उत्पन्न झाले. विद्वच्छ्रेष्ठ अशा हिरण्यवर्माने प्राण्यानी इच्छिलेले सर्व स्त्री-पुत्र, धनादिक पदार्थांचे संयोग नाशवन्त आहेत. यात अल्प अशा संकल्पाने उत्पन्न झालेले हे सुख काय स्वरूपाचे आहे ? अर्थात् नाशवंत आहे ॥ १८६-१९१ ॥
आयष्य वान्याप्रमाणे चंचल आहे व हा काय- म्हणजे हे शरीर रोगाचे घर आहे व त्याज्य आहे व हे साम्राज्य लुब्ध झालेल्या अज्ञानी लोकाकडून भोगले जाते व हे अनेक दोषानी भरले आहे. हे शरीर ज्याचा किनारा जवळ आला आहे असे आहे अर्थात् लौकरच नाश पावणारे आहे व पापांची खाण आहे व साररहित आहे. पण आमच्या आत्म्याला हे अगदी आपणाशी एकरूप राहावे असे वाटत असते. अपवित्र पदार्थ ज्यास प्रिय आहेत अशा या आत्म्याला धिक्कार असो. या आत्म्याला अशा देहात राहत असता बिलकुल भय वाटत नाही. पण यातून निघून जाणे मात्र याला फार भयाचे वाटते. या आत्म्याला जो सुखाचा मार्ग नाही तो सुखाचा मार्ग आहे असा विपर्यास उत्पन्न झाला आहे ।। १९२-१९४ ॥
हा आत्मा स्वरूपानी रूप- स्पर्श, गंध, रस, रूप आदिकानी रहित आहे पण कार्मण, तेजस, औदारिकादिदेहानी हा रूपी बनला आहे साकार बनला आहे व याला मोक्षप्राप्ति झाली म्हणजे हा अरूप- निराकार, स्पर्शादिकानी रहित व ज्ञानदर्शनसम्पन्न बनतो. म्हणून या आत्म्याने देहाचा त्याग केला पाहिजे ॥ १९५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org