Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-१८५)
(६४५
जिनेन्द्रभवने भवस्था नानोपकरणैः सदा । विधाय पूजां समजायामहीह खगाधिपाः ॥ १७४ पिताहं भवदेवस्य रतिवर्माभिधस्तदा । भूत्वा श्रीवर्मनामातः संयमं प्राप्य शुद्धधीः ॥ १७५ चारणत्वं तृतीयं च ज्ञानं प्राप्तमिहेत्यदः । श्रुत्वा मुनिवचः प्रीतिमापद्येतां तरां च तौ ॥ १७६ एवं सुखेन यात्येषां काले वायुरथः पृथुम् । विशरारुं समालोक्य स्तनयित्नुं प्रतिक्षणम् ॥ १७७ विश्वं विनश्वरं पश्यन् शश्वच्छाश्वतिकों मतिम् । जनः करोति सर्वत्र दुस्तरं किमिदं तमः ॥ १७८ इति याथात्म्यमासाद्य दत्वा राज्यं विरज्य सः । मनोरथाय नैःसङग्यं प्रपित्सुरभवत्तदा ।। १७९ आदित्य गतिमभ्येत्य प्रीत्या सर्वेऽपि बान्धवाः । प्रभावतीसुता देया भवतेयं रतिप्रभा ॥ १८० मनोरथस्य पुत्राय कन्या चित्ररथाय सा । इत्याहुः सोऽप्यनुज्ञाय कृत्वा बन्धुविसर्जनम् ॥ १८१ हिरण्यवर्मणः सर्वखगराज्याभिषेचनम् । विधाय बहुभिः सार्धं सम्प्राप्य मुनिपुङ्गवम् ॥ १८२ संयमं प्रतिपन्नः स सहवायुरथः स्वयम् । तपो द्वादशधा प्रोक्तं यथाविधि समाचरत् ॥ १८३ इत्युक्त्वा रतिवेगाहं रतिषेणा प्रभावती । चाहमेवेति सभ्यानां निजगाद सुलोचना ॥ १८४ तदाकर्ण्य जयोऽप्याह पतिस्तासामहं क्रमात् । जाये स्म तत्र तत्रेति विश्वविस्मयकृद्वचः ॥ १८५
महापुराण
याप्रमाणे या सर्वांचा काल सुखाने चालला होता. त्यावेळी वायुरथ राजाने मोठा पण प्रतिक्षणी कमी कमी होत चाललेला मेघ पाहिला व हे विश्व नाशवन्त आहे असे पाहूनही सर्व - पदार्थात सर्व लोक हे कायमचे नित्य आहेत अशी बुद्धि करतात. यावरून सर्वांच्या अन्तःकरणात दुस्तर दाट अज्ञान पसरले आहे असा विचार केला. याप्रमाणे जगाचे खरे स्वरूप समजून व मनोरथ नामक आपल्या पुत्राला राज्य देऊन पूर्ण निःसंगपणाला प्राप्त करून घेण्याची इच्छा करू लागला ।। १७७ - १७९ ।।
त्यावेळी सगळे आप्त नातलग आदित्यगति राजाकडे आले व त्याला म्हणाले की, आपण प्रेमाने मनोरथाच्या चित्ररथ नामक पुत्राला प्रभावतीची कन्या रतिप्रभा द्यावी. त्याने देखिल त्यांचे म्हणणे मान्य केले व त्या सर्व बांधवांचे विसर्जन केले ॥ १८०
त्यावेळी हिरण्यवर्माला सर्व विद्याधरांचा राजा म्हणून अभिषेक केला व नंतर पुष्कळ लोकासह तो वायुरथ श्रेष्ठ मुनीकडे आला व त्याने स्वतः संयम धारण केला व बारा प्रकारचे तप विधीला अनुसरून तो करू लागला ॥ १८१-१८३ ॥
याप्रमाणे सुलोचनेने पूर्वभववृत्त सांगून रतिवेगा, रतिषेणा व प्रभावती मीच आहे असे सर्व सभेत आलेल्या लोकाना सांगितले ।। १८४ ।। .
ते ऐकून जयकुमार देखिल या रतिवेगादिक तिघींचा मीच क्रमाने पति झालो होतो • असे त्या सभेत सर्वाना आश्चर्यकारक वृत्त बोलला ।। १८५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org