Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६४४)
(४६-१६६
तद्विलोक्य कुमारोऽभूत्प्रभावत्यां प्रसक्तषीः । सापि तस्मिंस्तयोः प्रीतिः प्राक्तन्यद्विगुणाभवत् ॥ १६६ सम्भूय बान्धवाः सर्वे कल्याणाभिषवं तयोः । अकुर्वशिव कल्याणं द्वितीयं ते चिकीर्षवः ॥ १६७ दशम्यां सिद्धकूटाग्रे स्नानपूजाविधौ क्वचित् । हिरण्यवर्मणा वीक्ष्य परमावधिचारणः ॥ १६८ प्रभावत्या च पृष्टोऽसौ स्वपूर्वभववृत्तकम् । अभाषत सुनिश्चैवमनुग्रहषिया तयोः ॥ १६९ तृतीयजन्मनीतोऽत्र सम्भूतौ वणिजां कुले । रतिवेगा सुकान्तश्च प्राक्मृणालवतीपुरे ॥ १७० भर्तृभार्यादिसम्बन्धं सम्प्राप्यारिभयाद्गतौ । कृत्वानुमोदनं शक्तिषेणदाने सपुण्यकौ ।। १७१ पारापतभवे चाप्य धर्म जातौ युवामिति । विधाय पितरौ वैश्यजन्मनोर्याविहापि तौ ।। १७२ तृतीयजन्मनो युष्मद्गुरवोऽहं च सङ्गताः । रतिषेणगुरोः पार्श्वे गृहीतप्रोषधाश्चिरम् ॥ १७३
महापुराण
तो पट्टक बघून हिरण्यवर्मकुमार प्रभावतीवर अधिक आसक्त झाला व ती प्रभावती देखिल त्याच्यावर आसक्त झाली. यामुळे त्यांचे प्रेम एकमेकावर दुप्पट वाढले ।। १६६ ।।
सर्व बन्धुगण जमून त्या दोघांचे जणु दुसरे कल्याण करण्याची इच्छा करीत आहेत अशा रीतीने त्या दोघाना त्यानी कल्याणस्नान घातले ॥ १६७ ॥
कोणे एके वेळी दशमी तिथीचे दिवशी सिद्धकूट जिनमंदिरात जिनेश्वराचा स्नान-अभिषेक पूजाविधि होत असता हिरण्यवर्माने परमावधिज्ञानयुक्त चारणमुनींना पाहिले व प्रभावतीनेही पाहिले. नंतर त्यानी त्याना आपले पूर्वभवाचे वृत्त विचारले. त्या दोघावर अनुग्रह करण्याच्या बुद्धीने त्यानी ते याप्रमाणे सांगितले ।। १६८ - १६९ ।।
या जन्मापासून मागच्या तिसऱ्या भवात तुम्ही मृणालवती नगरात वैश्य कुलात सुकांत व रतिवेगा होऊन जन्मला होता. त्या भवात तुम्ही पति-पत्नी सम्बन्धाला प्राप्त झालेले होता व शत्रुभयामुळे तुम्ही मृणालवती नगरातून निघून शक्तिषेणाच्या आश्रयाला गेला. तेथे तुम्ही मुनिदानात अनुमोदन देऊन पुण्यवान् झाला. यानंतर कबूतर व कबूतरीच्या भवात तुम्ही दोघे धर्म धारण करून येथे विद्याधर व विद्याधरी झालेले आहात. वैश्यजन्मात जे तुमचे मातापिता होते तेच या जन्मातही धर्मधारण करून तुम्हा दोघांचे माता-पिता झाले आहेत. तिसन्या जन्मात तुमचे माता-पिता व मी एकत्र येऊन रतिषेणगुरूंच्या जवळ प्रोषधव्रत घेतले होते व त्याचे आम्ही दीर्घकालपर्यन्त पालन केले. जिनमंदिरात आम्ही नाना उपकरणानी नेहमी जिनपूजा केली व त्यामुळे आम्ही येथे विद्याधरराजे झालो आहोत ।। १७०-१७४ ।।
मी पूर्वभवी भवदेवाचा पिता रतिवर्मा नांवाचा होतो व आता श्रीवर्मनांवाचा विद्याधर राजा झालो. पुढे मी मुनिसंयम धारण केला. माझी बुद्धि निर्मल झाली व त्यामुळे मी चारण ऋद्धिधारक व अवधिज्ञानी झालो आहे. हे मुनींचे भाषण ऐकून हिरण्यवर्म व प्रभावतीला अत्यंत प्रसन्नता प्राप्त झाली ।। १७५-१७६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org