________________
६४२)
महापुराण
(४६-१४९
माता पितापि या यश्च सुकान्तरतिवेगयोः । जन्मन्यस्मिन्किलाभूतां चित्रं तावेव संसृतिः॥ १४९ हा मे प्रभावतीत्याह जयश्चेत्ससुलोचनः । रूपादिवर्णनं तस्याः किं पुनः क्रियते पृथक् ॥ १५० यौवनेन समाक्रान्तां कन्यां दष्ट्वा प्रभावतीम् । कस्मै देयेयमित्याह खगेशो मन्त्रिणस्ततः ॥ १५१ शशिप्रभा स्वसा देव्या भ्रातादित्यगतिस्तथा। परे च खचराधीशाः प्रीत्यायाचन्त कन्यकाम् ॥१५२ ततः स्वयंवरो युक्तो विरोधस्तन्न केनचित् । इत्यभाषन्त निश्चित्य तद्भूपोऽप्यभ्युपागमत् ॥१५३ ततः सर्वेऽपि तद्वार्ताकर्णनादागमन्वराः । कमप्येतेषु सा कन्या नाग्रहीद्रत्नमालया ॥ १५४ मातापितृभ्यां तदृष्ट्वा सम्पृष्टा प्रियकारिणी । यो जवेद्गतियुद्धे मां मालां संयोजयाम्यहम् ॥१५५ कण्ठे तस्येति वक्त्येषा प्रागित्याह सखी तयोः । श्रुत्वा तत्तद्दिने सर्वानुचितोक्त्या व्यसर्जयत् ॥१५६
__ सुकान्त आणि रतिवेगा यांच्या या भवातील जी माता व जो पिता तेच माता-पिता या जन्मातही झाले. यावरून संसार फार आश्चर्यकारक आहे असे म्हणावयास हरकत नाही. (सुकान्ताचे पिता अशोकदेव व माता जिनदत्ता तेच या भवात आदित्यगति व शशिप्रभा झाले व रतिवेगेचे माता-पिता विमलश्री आणि श्रीदत्त होते ते या भवात स्वयंप्रभा आणि वायुरथ झाले) ॥ १४९ ॥
सुलोचनेने सहित असा जयकुमार "हे माझ्या प्रभावती" असे म्हणाला त्या अर्थी त्या प्रभावतीच्या रूपादिसौंदर्याचे वर्णन वेगळे करण्याची पुनः काय आवश्यकता आहे ? ॥ १५० ।।
जेव्हा प्रभावती यौवनाने मुसमुसली त्यावेळी ही कोणाला द्यावी असे विद्याधरेशाने मन्त्र्याना विचारले ।। १५१ ॥
त्यानन्तर मन्त्र्यानी म्हटले की हे प्रभो शशिप्रभा आपली बहिण आहे व आदित्यगति आपल्या पट्टराणीचा भाऊ आहे. हे व इतरही विद्याधरराजे प्रीतीने कन्येची याचना करीत आहेत. म्हणून आपण स्वयंवर करणे योग्य आहे व त्यामध्ये कोणाशी विरोध उत्पन्न होणार नाही असा मंत्र्यानी निश्चय करून सांगितले व राजानेही त्यांचे म्हणणे मान्य केले ॥ १५२-१५३ ॥
यानंतर स्वयंवराची वार्ता ऐकून सर्व वर आले पण त्यापैकी कन्येने रत्नमाला गळ्यात घालून कोणाचाही स्वीकार केला नाही ॥ १५४ ॥
ते पाहून माता-पित्यानी तिच्या प्रियकारिणी नामक मैत्रिणीला विचारिले. तेव्हा जो मला गतियुद्धात जिंकील त्याच्या गळ्यात मी माला घालीन असे ही पूर्वी आमच्याजवळ बोलली आहे असे त्या सखीने त्या दोघाना सांगितले. ते ऐकून राजाने त्याचदिवशी सर्व राजपुत्राना योग्य भाषण करून पाठवून दिले ॥ १५५-१५६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org