________________
४६-१४८)
महापुराण
(६४१
इति तेऽमितमत्युक्तकथावगमतत्पराः । स्वरूपं संसृतेः सम्यक् मुहुर्मुहुरभावयन् ॥ १३९ एवं प्रयाति कालेऽसौ प्रियदत्ता प्रसङ्गतः। यशस्वतोगुणवत्यौ युवाभ्यां केन हेतुना ॥ १४० इयं दीक्षा गृहीतेति पप्रच्छोत्पन्नकौतुका । ते च तत्कारणं स्पष्टं यथावत्तमवोचताम् ॥ १४१ ततो धनवती दीक्षा गणिन्याः सन्निधौ ययौ। माता कुबेरसेना च तयोराथिकयोर्द्वयोः ॥ १४२ तावन्येयुः कपोतौ च ग्रामान्तरमुपाश्रितो। तण्डलाधुपयोगाय समतिप्रचोदितौ ॥ १४३ भवदेवचरेणानुबद्धवैरेण पापिना । दृष्टमात्रोत्थपापेन मारितौ पुरुदंशसा ॥ १४४ तद्राष्ट्रवजयार्षस्य दक्षिणश्रेणिमाश्रिते । गान्धारविषयोशीरवत्याख्यनगरेऽधिपः ॥ १४५ आदित्यगतिरस्यासीन्महादेवी शशिप्रभा । तयोहिरण्यवर्माख्यः सुतो रतिवरोऽभवत् ॥ १४६ तस्मिन्नेवोत्तरश्रेण्यां गौरीविषयविश्रुते । पुरे भोगपुरे वायुरथो विद्याधराधिपः ॥१४७ तस्य स्वयम्प्रभादेव्यां रतिषणा प्रभावती । बभूव जैनधर्माशोऽप्यभ्युद्धरति देहिनः ॥ १४८
याप्रमाणे अमितमति आर्येने सांगितलेली कथा जाणण्यात जे तत्पर झाले होते त्या सर्वानी वारंवार संसाराच्या स्वरूपाचा चांगला विचार केला ।। १३९ ॥
याप्रमाणे काही काल लोटल्यावर एके वेळी प्रियदत्तेने प्रसंग पाहून यशस्वती व गुणवती या दोन आर्यिकाना तुम्ही दीक्षा कोणत्या कारणाने घेतली मला याविषयी कौतुक वाटत आहे असे जेव्हा विचारले तेव्हा त्यानी दीक्षेचे कारण जसे घडले होते ते स्पष्ट करून सांगितले ।। १४०-१४१ ॥
यानन्तर कुबेरमित्राच्या पत्नीने-धनवतीने आर्यिकासंघाची स्वामिनी अशा अमितमती आर्यिकेजवळ दीक्षा धारण केली व त्या दोन आर्यिकांची माता अशा कुबेरसेनेने देखिल आपल्या मुलीजवळ दीक्षा घेतली ।। १४२ ॥
कोणे एके दिवशी यमाने ज्याना प्रेरिले आहे अशी ती दोन कबूतरें तान्दुळ वगैरे खाण्यासाठी दुसऱ्या गावाला गेलीं ॥ १४३ ।।।
तेव्हा पूर्वजन्मापासून ज्याच्या ठिकाणी वैर उत्पन्न झाले होते व जो पूर्वजन्मी भवदेव होता व या जन्मी जो मांजर होऊन जन्मला अशा त्या पापी मांजराला त्याना पाहिल्याबरोबर पापाची भावना उत्पन्न झाली व त्याने त्या दोघाना ठार मारले ॥ १४४ ।।
त्याच पुष्कलावती देशातील विजयाईपर्वताच्या दक्षिणश्रेणीमध्ये गांधार नामक देशातील उशीरवती नामक नगरात आदित्यगति नांवाचा विद्याधर राजा राज्य करित होता. त्याच्या महादेवीचे-महाराणीचे नांव शशिप्रभा असे होते. या उभयताना तो रतिवर कबूतर हिरण्यवर्म नावाचा मुलगा झाला व याच विजयाध पर्वताच्या उत्तरश्रेणीत गौरीनामक देशात प्रसिद्ध असे भोगपुर नामक नगर होते व तेथे वायुरथ नामक विद्याधरांचा स्वामी-राजा राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नांव स्वयम्प्रभादेवी असे होते. तिच्या ठिकाणी ही रतिषणा प्रभावती नामक कन्या झाली. बरोबरच आहे की, जैनधर्माचा अंश देखिल प्राण्यांचा उद्धार करतो ॥ १४५-१४८ ॥ म. ८४
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org