Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-१२८)
महापुराण
(६३९
अधस्ताद्ववनविवरं घ्राणस्येति तदप्ययं । क्षमते नेति सर्वेषां तवकर्मण्यतां ब्रुवन् ॥ १२० गन्तुं सहात्मना तस्यानभिलाषाद्विषण्णवान् । परस्मिन्नपि भूयासं भवे ते स्नेहगोचरः॥ १२१ इति कृत्वा निदानं स द्रव्यसंयममाश्रितः । प्रपेदे लोकपालत्वं तद्गतस्नेहमोहितः ॥ १२२ कदाचिच्छुक्लपक्षस्य दिनादौ भार्यया सह । कृतोपवासया शक्तिषणो भक्तिपुरःसरः ॥ १२३ मुनिभ्यां दत्तदानेन पंचाश्चर्यमवाप्तवान् । दृष्ट्वा तच्छ्रेष्ठिधारिण्यावावयोरन्यजन्मनि ॥ १२४ एतावपत्ये भूयास्तां निदानं कुरुतामिति । मन्त्रिणस्तस्य चत्वारोऽप्यस्तसर्वपरिग्रहाः ॥ १२५ तपो विधाय कालान्ते समापन्लोकपालताम् । वधूवरं च दानानुमोदपुण्यमवाप्तवत् ॥ १२६ तवाकर्ण्य महीशस्य देवी वसुमती तदा । स्वजन्मान्तरसम्बोधमूर्छानन्तरबोषिता ॥ १२७ अहं पूर्वोक्तदेवश्रीस्त्वत्प्रसादादिमां श्रियम् । प्राप्ता तदातनो राजा वद क्वाद्य प्रवर्तते ॥ १२८
तुझ्या नाकाच्या खाली तोंडाचे बीळ आहे हे देखील म्हणणे याला सहन होत नाही. असे बोलून त्याच्या कार्य करण्यातील असमर्थतेचे त्याने वर्णन केले ॥ १२० ॥
__ माझ्याबरोबर चल म्हणून पित्याने म्हटले पण त्याला जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तो पिता खिन्न झाला व पुढच्या जन्मी मी तुझ्या स्नेहाला पात्र होईन असे म्हणून त्याने निदान बांधले व द्रव्यसंयम स्वीकारून तो मुनि झाला व मरण पावून स्वर्गात लोकपाल जातीचा देव झाला ॥ १२१-१२२ ॥
कोणे एकेवेळी शुक्लपक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी शक्तिषेणाच्या स्त्रीने भक्तिपूर्वक उपवास धारण केला ।। १२३ ॥
त्याने दोन मुनीना आहारदान दिले. त्यामुळे पंचाश्चर्याना तो प्राप्त झाला. हे पाहून मेरुदत्त व त्याची स्त्री धारिणी या दोघानी पुढील जन्मी हे दोघे शक्तिषेण व त्याची स्त्री आपली अपत्ये व्हावीत असे निदान केले. या मेरुदत्ताच्या चौघा मंत्र्यानीही परिग्रहांचा त्याग केला व त्यानी तपश्चरण केले आणि शेवटी ते लोकपालदेव झाले. याचप्रमाणे सुकान्त व रतिषणा या दोघा वधूवरानीही दानानुमोदनाने पुण्य प्राप्त करून घेतले ॥ १२४-१२६ ।।
ते सर्व ऐकून लोकपाल राजाच्या राणीला-वसुमतीला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले व ती मूच्छित झाली. सावध झाल्यावर ती म्हणाली, 'मी पूर्वजन्मी शोभानगरीच्या राजा प्रजापालाची राणी होते. माझे नांव देवश्री असे होते व अहो अमितमति आर्यिकाबाई आपल्या प्रसादामुळे मी या वैभवाला प्राप्त झाले आहे. माझे पूर्वजन्माचे पति महाराज प्रजापाल आज कोठे आहेत हे आपण सांगा ?' ।। १२७-१२८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org