Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-११०)
इत्यभूवन्नमी श्रद्धाविहीनव्रतभूषणाः । स मृणालवतीं नेतुं कदाचिदटवीश्रियम् ॥ १०१ पित्रोः पुरीं प्रवृत्तः सन् शक्तिषेणः ससैन्यकः । वने धान्यकमालाख्ये प्राप्य सर्पसरोवरम् ॥ १०२ निविष्टवानिदं चान्यत्प्रकृतं तत्र कथ्यते । पतिर्मृणालवत्याख्यनगर्या धरणीपतिः ॥ १०३ सुकेतुस्तत्र वैश्येशस्तनुजो रतिवर्मणः । भवदेवोऽभवत्तस्य विपुण्यः कनकश्रियाम् ॥ १०४ तत्रैव दुहिता जाता श्रीदत्तस्थातिवल्लभा । विमलादिश्रिया ख्याता रतिवेगाख्यया सती ॥ १०५ सुकान्तोऽशोक वे वेष्ट जिनदत्तासुतोऽजनि । भवदेवस्य दुर्वृत्त्या दुर्मुखाख्योऽप्यजायत ।। १०६ स एष द्रव्यमावयं रतिवेगां जिघृक्षुकः । वाणिज्यार्थं गतस्तस्मान्नायात इति सा तदा ॥ १०७ मातापितृभ्यां प्रादायि सुकान्ताय सुतेजसे । देशान्तरात्समागत्य तद्वार्ताश्रवणाद्भृशम् ॥ १०८ दुर्मुखे कुपिते भीत्वा तदानीं तद्वधूवरम् । व्रजित्वा शक्तिषेणस्य शरणं समुपागतम् ।। १०९ तदुर्मुखोऽपि निर्बन्धादनुगत्य वधूवरम् । शक्तिषेणभयाद्वद्धवैरो निववृते ततः ॥ ११०
महापुराण
(६३७
याप्रमाणे हे सगळे श्रद्धा अविहीन - श्रद्धेने सहित व्रतभूषणानी शोभणारे झाले. तो शक्तिषेण आपल्या अटवीश्री नामक पत्नीला तिच्या आईबापाकडे नेण्यासाठी मृणालवती नगरीकडे आपल्या सैन्यासह निघाला होता. धान्यकमाल नामक वनात सर्पसरोवरावर त्याने मुक्काम केला ।। १०१-१०२ ॥
येथे या कथेला अनुसरून असलेला वृत्तांत सुलोचनेने सांगितला तो असा-या मृणालवती नगरीचा राजा धरणीपति हा आहे. या नगरीत सुकेतु नांवाचा व्यापारी होता. त्याच्या पित्याचे नांव रतिवर्मा होते. सुकेतु व्यापाऱ्याच्या पत्नीचे नांव कनकश्री होते व या दोघाना पुण्यरहित असा भवदेवनामक पुत्र झाला ।। १०३ - १०४ ॥
त्याच नगरात श्रीदत्त वैश्य राहात होता. त्याला अतिशय आवडती विमलश्री नांवाची पत्नी होती व या दोघाना रतिवेगा या नांवाची सद्गुणी कन्या झाली ।। १०५ ।।
Jain Education International
अशोकदेवाची पत्नी जिनदत्ता या उभयाना सुकान्त नांवाचा मुलगा झाला. भवदेवाला दुराचरणामुळे दुर्मुख हे नांवही प्राप्त झाले होते. भवदेव उर्फ दुर्मुखाने आपण द्रव्य मिळवून रतिवेला ग्रहण करावे असा विचार केला व तो व्यापार करण्यासाठी परदेशी गेला व तेथून जेव्हां तो आला नाही तेव्हां रतिवेगेच्या मातापित्यानी तेजस्वी सुकान्ताला ती दिली. अर्थात् सुकान्ताबरोबर तिचा विवाह झाला. तो दुर्मुख देशान्तराहून आला तेव्हां त्याला ती वार्ता ऐकल्यामुळे अतिशय क्रोध आला. तो अतिशय रागावल्यामुळे ते जोडपे भ्याले व ते शक्तिषेणाकडे जाऊन त्याच्या रक्षणाखाली राहिले. तो दुर्मुखदेखील हट्टाने त्या वधूवराच्या पाठीमागे लागला. त्याने त्यांच्याशी दृढवैर बांधले पण शक्तिषेणाच्या भयामुळे तो तेथून पुनः परतला ।। १०६-११० ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org