________________
६३८)
महापुराण
(४६-१११
तकस्मै वियच्चारणद्वन्द्वाय समीयुषे । शक्तिषेणो ददावन्नं पाथेयं परजन्मनः ॥ १११ तत्रैवागत्य सार्थेशो निविष्टो बहुभिः सह । विभुमेरुकदत्ताख्यः श्रेष्ठी भार्यास्य धारिणी ॥ ११२ मन्त्रिणस्तस्य भूतार्थः शकुनिः सबृहस्पतिः । धन्वन्तरिश्च चत्वारः सर्वे शास्त्रविशारदाः ॥ ११३ एभिः परिवृतः श्रेष्ठी हीनाङ्गकञ्चिवागतम् । समीक्ष्यैनं कुतो हेतोर्जातोऽयमिति तान् जगौ ॥११४ शकुनिः शकुनाद्दुष्टाद्ग्रहात्पापाबृहस्पतिः । धन्वन्तरिस्त्रिदोषेभ्यो जन्मनीति समादिशत् ॥ ११५ भूतार्थस्त्वस्तु तत्सर्व कर्म हिंसाद्यपाजितम् । प्रधानकारणं तेन होनाङग इति सूक्तवान् ॥ ११६ शक्तिषणमहीपालप्रतिपन्नसुतः पिता। सत्यदेवस्य दृष्ट्वास्मिस्तमन्विष्यन्यदृच्छया ॥ ११७ तदा कृत्वा महदुःखं सभ्यराकर्ण्यतामिदम् । च्युतं पयोऽतिपाकेन भाजनात्तण्डुलानपि ॥ ११८ भक्ष्यमाणान्कपोताद्यैः पश्यंस्तूष्णीमयं स्थितः । क्रोधान्मातुः कनीयस्या भर्त्सनावागतोऽसहः ॥११९
तेथे एका आकाशगमनऋद्धिधारी चारणमुनीच्या जोडीला शक्तिषेणाने परलोकी शिदोरीसारखे उपयोगी पडणारे आहारदान दिले ॥ १११ ॥
तेथेच अनेक व्यापाऱ्यांचा स्वामी व मोठा धनिक असा मेरुकदत्त नांवाचा व्यापारी आपल्या धारिणी नामक पत्नीबरोबर व पुष्कळ लोकाबरोबर येऊन राहिला होता ।। ११२ ॥
या मेरुकदत्ताचे भूतार्थ, शकुनि, बृहस्पति व धन्वन्तरि असे चार मन्त्री सर्व शास्त्रात अतिशय चतुर असे होते. या चौघानी युक्त असलेल्या मेरुकदत्तश्रेष्ठीने एका हीनाङ्ग व्यक्तीला जी तेथे आली होती तिला पाहिले व हा मनुष्य कोणत्या कारणामुळे असा झाला आहे असे त्याने त्याना विचारले ॥ ११३-११४ ॥
जन्मवेळी अशुभ शकुनामुळे हा हीनाङ्ग झाला आहे असे शकुनीने उत्तर दिले व बृहस्पतीने पापग्रहामुळे हा हीनाङ्ग झाला असे म्हटले आणि धन्वन्तरीने वात, पित्त व कफ या त्रिदोषाच्या विकाराने असा झाला असे म्हटले ॥ ११५ ॥
जो भूतार्थ नामक मन्त्री होता त्याने पूर्वजन्मी हिंसादिक कार्य करून जे अशुभ कर्म याने उपाजिले आहे त्याच्या उदयाने हा हीनाङ्ग झाला आहे. ते हिंसादिक पापकर्म प्रधानकारण आहे असे योग्य भाषण केले ॥ ११६ ॥
शक्तिषेण राजाने ज्याला आपला मुलगा मानले होते अशा सत्यदेवाचा पिता सत्यक त्याला हुडकीत या अरण्यात आला व त्याला पाहून अतिशय दुःख व्यक्त करून हे सभ्यजन हो आपण ऐका असे म्हणून तो असे बोलला- भगोण्यातले पाणी अतिशय तापून ते उतू येऊन बाहेर पडू लागले व त्याबरोबर आतील तांदूळ बाहेर पडत असलेले कबूतर वगैरे पक्षी जमून ते खाऊ लागले. पण हा मात्र पाहात स्वस्थ बसला. त्यावेळी त्याच्या आईची धाकटी बहीण रागावली व तिने त्याची निंदा केली. ती याला सहन न झाल्याने हा येथे आला आहे ।। ११७-११९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org