Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(४६-९१
अन्यच्चाकणतं दृष्टमावाभ्यां यदि चेत्त्वया । ज्ञायते तच्च वक्तव्यमित्युक्तवति कौरवे ॥ ९१ निजवागमृताम्भोभिः सिञ्चन्ती तां सभां शुभाम् । सुलोचनाब्रवीत्सम्यग्ज्ञायते श्रूयतामिति ॥ ९२ तदा मुनेर्गृहाद्भिक्षां त्यक्त्वा गमनकारणम् । अज्ञात्वा भूपतेः प्रश्नादाहामितमतिः श्रुतम् ॥ ९३ विषयेऽस्मिन्खगक्ष्माभृत्प्रत्यासन्नं वनं महत् । अस्ति धान्यकमालाख्यं तदभ्यर्णे पुरं परम् ॥ ९४ शोभानगरमस्येशः प्रजापालमहीपतिः । देवश्रीस्तस्य देव्यासीत्सुखदा श्रीरिवापरा ॥ ९५ शक्तिषेणोऽस्य सामन्तस्तस्याभूत्प्रीतिदायिनी । अटवीश्रीस्तयोः सत्यदेवः सूनुरिमे समम् ॥ ९६ सर्वेऽप्यासन्नभव्यत्वादस्मत्पादसमाश्रयात् । श्रुत्वा धर्मं नृपेणामा समापन्मद्यमांसयोः ॥ ९७ त्यागं पर्वोपवासं च शक्तिषेणोऽपि भक्तिमान् । मुनिवेलात्यये भुक्तिमग्रहीत्स गृहिव्रतम् ॥ ९८ तत्पत्नी शुक्लपक्षादिदिनेऽष्टम्यामथापरे । पक्षे पञ्चसमास्त्यागमाहारस्य समग्रहीत् ॥ ९९ अनुप्रवृद्धकल्याणनामधेयमुपोषितम् । सत्यदेवश्च साधूनां स्तवनं प्रत्यपद्यत ॥ १००
६३६)
आणखीही जे आपण दोघांनी ऐकले व पाहिले ते जर तू जाणत असशील तर ते सांग असे जयकुमाराने सुलोचनेला म्हटले. तेव्हा आपल्या वचनरूपी अमृतजलानी त्या शुभसभेवर सिंचन करणाऱ्या सुलोचनेने म्हटले की मला चांगले माहीत आहे व ते आपण ऐका. त्यावेळी भिक्षा न घेता मुनि घरातून निघून जाण्याचे काय कारण घडले हे आम्हाला समजले नाही असा तो ऐकून राजानें प्रश्न केला. अमितमति आर्थिकेने त्या चारणर्षीपासून ऐकलेले याप्रमाणे सांगितले. या पुष्कलावतीदेशात विजयार्धपर्वताच्या जवळ धान्यकमाल नांवाचे मोठे वन आहे व त्या वनाजवळ एक उत्तम नगर आहे त्याचे शोभानगर असे नांव आहे. प्रजापाल नांवाचा राजा या नगराचा स्वामी आहे. त्याच्या राणीचे देवश्री असे नांव आहे व ती लक्ष्मीप्रमाणे राजाला सुख देत असे ।। ९१-९५ ।।
या प्रजापाल राजाचा शक्तिषेण नांवाचा मांडलिक राजा होता. या शक्तिषेणाला आनंदित करणारी अटवीश्री नांवाची पत्नी होती. या दोघांना सत्यदेव नांवाचा मुलगा झाला. हे सगळे आसन्नभव्य असल्यामुळे आमच्या चरणाचा आश्रय घेऊन प्रजापाल राजाबरोबर या सर्वानी धर्माचे स्वरूप ऐकले. मद्यमांसाचा त्यांनी त्याग केला व पर्वदिवशी उपवास करण्याचे व्रत घेतले. शक्तिषेण भक्तिमान् असल्यामुळे त्याने मुनीची आहाराची वेळ टळून गेल्यावर भोजन करीन असे गृहस्थव्रत घेतले. त्याच्या पत्नीने शुक्लपक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी व अष्टमी दिवशी आणि कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेच्या व अष्टमीच्या दिवशी पाच वर्षेपर्यन्त आहाराचा त्याग करीन असे व्रत घेतले व सत्यदेवाने साधूंची स्तुति करण्याचे व्रत घेतले ।। ९६-१०० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org