Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-९०)
महापुराण
(६३५
कदाचिच्छेष्टिनो गेहं जङ्घाचारणयोर्युगम् । प्राविशद्धक्तितोऽस्थापयतां तौ दम्पती मुदा ॥ ८३ तदृष्टिमात्रविज्ञातप्राग्भवं तत्पदाम्बुजम् । कपोतमिथुनं पक्षः परिस्पृश्याभिनम्य तत् ॥ ८४ गलितान्योन्यसम्प्रीति बभूवालोक्य तन्मुनी । जातसंसारनिर्वेगौ निर्गत्यापगतौ गृहात् ॥ ८५ प्रियदत्तेङगित तदवगम्यान्यदा तु ताम् । रतिषणामपृच्छत्ते नाम प्राग्जन्मनीति किम् ॥ ८६ सा तुण्डेनालिखन्नाम रतिवेगेति वीक्ष्य तत् । ममैषा पूर्वभार्येति कपोतः प्रीतिमीयिवान् ॥ ८७ तया रतिवरः पृष्टः स्वनाम प्रियदत्तया। सुकान्ताख्योऽहमित्येषोऽप्यक्षराण्यलिखद्भुवि ॥ ८८ तनिरीक्ष्य ममैवायं पतिरित्यभिलाषका । रतिषेणाप्यगात्तेन सङ्गमं विध्यनुग्रहात् ॥ ८९ तत्सभावतिनामेतत् श्रुत्वा प्रीतिरभूदलम् । पुनः शुश्रूषवश्चासन्कथाशेषं सकौतुकाः ॥ ९०
..........
कोणे एके वेळी कुबेरकान्त श्रेष्ठीच्या घरी जंघाचरण ऋद्धिधारक मुनींची जोडी आली त्यावेळी त्या श्रेष्ठी व श्रेष्ठीनीनी त्याना भक्तीने उत्तम आसनावर बसविले. त्याना पाहिल्याबरोबर त्यांना पूर्वजन्माचे ज्ञान झाले आहे अशा पारव्यांचे युगलाने जोडीने आनंदाने आपल्या पंखांनी त्यांच्या पायाना स्पर्श केला व नमस्कार केला. त्यावेळी रतिवर व रतिषणा त्या कबूतराच्या जोडीचे जे एकमेकावर प्रेम होते ते गळून गेले. हे पाहून त्याना संसारापासून वैराग्य उत्पन्न झाले आहे असे ते दोघे मुनी त्या घरातून निघून गेले ॥ ८३-८५ ॥
एके वेळी मनातील अभिप्राय जाणणाऱ्या प्रियदत्तेने त्या रतिषणेला पूर्वजन्मी तुझे काय नांव होते असे विचारले. तेव्हा त्या कबूतरीने आपल्या तोंडाने रतिवेगा असे नांव लिहिले. ते पाहून माझी ही पूर्वजन्माची पत्नी आहे असे जाणून तो कबूतर फार आनंदित झाला ॥ ८६-८७ ॥
यानन्तर प्रियदत्तेने रतिवराला तुझे पूर्वजन्मी काय नांव होते ते सांग असे विचारले व त्याने मी पूर्वजन्मी 'सुकान्त' या नांवाचा होतो अशी अक्षरे त्याने जमिनीवर लिहिली ॥ ८८॥
__ ते पाहून हा सुकान्त माझा पूर्वजन्मी पति होता असे पाहून त्याच्याविषयी इच्छा करणाऱ्या रतिषेणेचा देखिल दैवाच्या अनुग्रहाने त्याच्याशी संगम झाला ॥ ८९ ॥
त्या सभेत असलेल्या लोकांना हे वृत्त ऐकून फार प्रेम उत्पन्न झाले व उरलेली कथा ऐकण्याचे त्यांच्या मनात कौतुक उत्पन्न झाले ॥ ९० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org