________________
४६-७२)
महापुराण
(६३३
पट्टबन्धात्परं मत्वा तत्क्रमाहूमहीपतिः। प्रातरास्थानमध्यास्य मन्त्र्यादी नित्यबुबुधत् ॥ ६४ ललाटे यदि केनापि राजा पादेन ताडितः । कर्तव्यं तस्य किं वाच्यं ततो मन्त्र्यवीविदम् ॥ ६५ पट्टात् ललाटो नान्येन स्पृश्यः स यदि ताडितः । पादेन केनचिद्वध्यः स प्राणान्तमिति स्फुटम्॥६६ तदाकावधूयनं स्मितेनाहूय मातुलम् । नृपोऽप्राक्षीत्स चाहैतत्प्रस्तुतं प्रस्तुतार्थवित् ॥ ६७ तस्य पूजा विधातव्या सर्वालङ्कारसम्पदा । इति तद्वचनात्तुष्ट्वा मणिवार्ता न्यवेदयत् ॥ ६८ मणिर्न जलमध्येऽस्ति तटस्थतरुसंश्रितः । प्रभा वाप्यामिति प्राह तद्विचिन्त्य वणिग्वरः ॥ ६९ तदा कुबेरमित्रस्य प्रज्ञामज्ञानमात्मनः । दौष्ट्यं च मन्त्रिणो ज्ञात्वा पश्चात्तापान्महीपतिः ॥ ७० पश्यधूतरहं मूढो वञ्चितोऽस्मीति सर्वदा । श्रेष्ठिनं प्राप्तसन्मानं प्रत्यासन्नं व्यधात्सुधीः ॥७१ तन्त्रावापमहाभारं ततः प्रभृति भूपतिः । तस्मिन्नारोप्य निर्व्यग्रः स धर्म काममन्वभूत् ॥ ७२
तिच्या पायाचे चिह्न पट्टबन्धनापेक्षाही उत्कृष्ट भूषण मानून सकाळी सभेमध्ये बसून मन्त्री वगैरेना त्याने असे विचारले- जर कोण्या व्यक्तीने आपल्या पायाने राजाच्या कपाळावर आघात केला तर त्या व्यक्तीला काय करावे हे सांगा? हे ऐकून फल्गुमति मन्त्री म्हणाला महाराज, पट्टाशिवाय राजाच्या कपाळाला कोणी स्पर्श करू नये आणि जर कोणी व्यक्तीने पायाने राजाच्या कपाळावर ताडन केले तर त्याचे प्राण जाईपर्यन्त त्याला शिक्षा करावी व हे अगदी स्पष्ट आहे ।। ६४-६६ ।।
_ हे ऐकून राजाने हसून त्याचा तिरस्कार केला व त्याने आपल्या मामाला बोलाविले व त्याला वरीलप्रमाणे विचारले. तेव्हां वास्तविक अभिप्राय जाणणाऱ्या श्रेष्ठीने योग्य उत्तर दिले. तो म्हणाला, हे राजन्, ज्याने लाथ मारली आहे त्याचा सर्व प्रकारच्या अलंकारांनी आदर करावा. या श्रेष्ठीच्या वचनाने राजा आनंदित झाला व त्याने मण्याची हकीकत सांगितली. तेव्हां श्रेष्ठीने असे सांगितले. तो मणि पाण्यामध्ये नाही. तो विहिरीच्या तटावरील झाडावर आहे आणि त्याची प्रभा-कान्ति विहिरीमध्ये पडली आहे असा विचार करून श्रेष्ठीने उत्तर दिले. तेव्हां कुबेरमित्राची बुद्धिमत्ता व आपले अज्ञान व मंत्र्याचा दुष्टपणा जाणून राजाला पश्चात्ताप झाला व तो म्हणाला, 'पाहा मला मूढाला या धूर्तानी फसविले आहे. असे म्हणून त्या श्रेष्ठीचा त्या सुबुद्धियुक्त राजाने सन्मान केला व नेहमी त्याला आपल्या जवळ ठेविले ॥ ६७-७१ ।।
__त्या दिवसापासून आपल्या राज्याचे रक्षण करणे व इतर राष्ट्राशी आपला कोणता संबंध आहे या विषयीच्या विचाराचा भार राजाने आपल्या मामावर सोपविला व आपण धर्म आणि काम याचा अनुभव घेत राहिला ।। ७२ ।। म. ८३
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org