Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-५५)
महापुराण
(६३१
तन्निमित्तपरीक्षायामवलोकितुमागते । सुते गुणवती राज्ञो यशस्वत्यभिधा परा ॥ ४५ भाजनं भक्ष्यसंपूर्णमदत्तवति मातुले । स्वाभ्यां लज्जाभरानम्रवदने जातनिविदे ॥ ४६ अमितानन्तमत्यापिकाभ्यसे संयमे परम् । आददाते स्म यात्येवं काले तस्मिन्महीपतौ ॥ ४७ लोकपालाय दत्तात्मलक्ष्मी संयममागते । शीलगुप्तगुरोः पावें शिवङ्करवनान्तरे ॥ ४८ देव्यः कनकमालाद्याः परे चोपाययुस्तपः । दुर्गमं च वजन्त्यल्पाः प्रभुर्यदिपुरःसरः ॥ ४९ लोकपालोऽपि सम्प्राप्तराज्यश्रीविश्रुतोदयः । कुबेरमित्रबुद्धयैव धरित्री प्रत्यपालयत् ॥ ५० मन्त्री व फल्गुमत्यारव्यो बालोऽसत्यवचःप्रियः । सवयस्कोनृपस्याज्ञः प्रकृत्या चपलः खलः ॥ ५१ तत्समीपे नृपेणामा यद्वा तद्वा सुखागतम् । शङ्कमानो वचो वक्तुं श्रेष्टयपायं विचिन्त्य सः ॥ ५२ स्वीकृत्यं शयनाध्यक्षं सामदानस्त्वया निशि । देवतावत्तिरोभूय राजन् पितसमं गुरुम् ॥ ५३ विनयाद्विच्युतं राजष्ठिनं तव सन्निधौ। विधाय सर्वदा मास्थाः कार्यकाले स हृयताम् ॥ ५४ इति वक्तव्यमित्याख्यत् सोऽपि सर्व तथा करोत् । अर्थाथिभिरकर्तव्यं न लोके नाम किञ्चन ।।
योग्य आहे असे ठरविले व पाच-तान्यांनी युक्त अशा शुभ दिवशी ( सूर्य, चंद्र, गुरू, शुक्र व मंगळ या पाच तान्यांच्या बलाने सहित ) मोठ्या वैभवाने कल्याणकारक विधीने त्या प्रियदत्तेचा आपल्या पुत्रासाठी स्वीकार केला ॥ ४३-४४ ॥
त्या निमित्ताच्या परीक्षेच्या वेळी राजाच्या दोन मुली गुणवती व यशस्वती याही पाहण्यासाठी आल्या होत्या. पण त्यांच्या मामाने त्यांना पक्वान्नाने भरलेले ताट दिले नाही म्हणून त्या दोघींनी लज्जेने खाली तोंडे केली. त्या दोघींना वैराग्य उत्पन्न झाले ॥ ४५-४६ ।।
___ त्या दोघी अमितमति व अनन्तमति या दोन आयिकाकडे गेल्या आणि त्यांच्याजवळ त्या दोघीनी उत्तम संयम धारण केला. याप्रमाणे काही काल गेल्यावर प्रजापाल राजाने आपल्या लोकपालनामक पुत्राला आपली राज्यलक्ष्मी दिली व शिवंकरवनात शीलगुप्त गुरूच्या जवळ त्याने संयम धारण केला. त्यावेळी कनकमाला वगैरे राण्यानीही व इतर लोकानीही तप धारण केले. बरोबरच आहे की जर एखादी समर्थ व्यक्ति पुढे चालू लागली तर अल्पशक्तिधारक देखिल दुर्गम मार्गात जाण्यास समर्थ होतात ॥ ४७-४९ ।।
___ ज्याला राज्यलक्ष्मी प्राप्त झाली आहे व ज्याचा उत्कर्ष सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे असा लोकपाल राजा देखिल कुबेरमित्र श्रेष्ठीच्या बुद्धीला अनुसरून पृथ्वीचे रक्षण करू लागला. खोटे बोलणे ज्याला आवडते, ज्याचे वय राजाच्या बरोबरीचे आहे, जो अज्ञानी मूर्ख व स्वभावतः चंचल आहे व दुष्ट आहे असा फल्गुमति या नांवाचा एक मुलगा राजाच्या प्रधानासारखा होता. श्रेष्ठी ज्यावेळी राजाजवळ असे तेव्हा राजाबरोबर यद्वातद्वा जे तोंडात येईल ते बोलण्यास हा फल्गुमति भीत असे म्हणून श्रेष्ठीला राजापासून कसे दूर करावे याचा तो विचार करू लागला. त्याने शयनगृहाच्या मुख्य अधिका-याला काही समजावून व कांही धन देऊन वश केले व त्याला सांगितले की आज रात्री देवतेप्रमाणे गुप्त होऊन राजाला असे बोल- हे राजा, हा राजश्रेष्ठी नम्रतेपासून च्युत झाला आहे, तो तुझ्या पित्याप्रमाणे आहे व गुरुप्रमाणे आहे. नेहमी त्याला
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org