Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(४६-४४
सुगन्धिसलिलं गाडगं गम्भीरं मधुरं ध्वनन् । अम्भोधरो नभोभागादासन्नादवमुञ्चति ॥३६ कल्पद्रुमद्वयं वस्त्रभूषणानि प्रयच्छति । अन्नपानं ददात्यन्यदयं कल्पमहीरुहोः ॥ ३७ एवमन्यच्च भोगाङगमशेषं देवनिमितम् । शश्वन्निविशतस्तस्य पूर्ण प्राथमिकं वयः ॥ ३८ तीक्ष्य पितरावेष किमेकामभिलाषुकः । कि बह्वीरिति चित्तेन सन्दिहानौ समाफुलौ ॥ ३९ प्रियसेनं समाहूय तत्प्रश्चात्तन्मनोगतम् । अवादीधरतां मैत्री सैव या त्वेकचितता ॥ ४० ततः समुद्रदत्ताख्यो धनवत्या सहाभवत् । स्वसा कुबेरमित्रस्य तन्नामैवैतयोः सुता ॥ ४१ प्रियवत्ताह्वया तस्याश्चेटिका रतिकारिणी । कन्यकास्तां विधायादि द्वात्रिशत्सुन्दराकृतीः ॥ ४२ श्रेष्ठी कदाचिदुद्याने यक्षपूजाविधौ सुधीः । सुपरीक्ष्य निमित्तेन प्रियदत्तां गुणान्विताम् ॥ ४३ अवधार्यास्य पुत्रस्य पञ्चताराबलान्विते । दिने महाविभूत्यैनां कल्याणविधिनाग्रहीत् ॥ ४४
एक वीणा नेहमी मनोहर असे शब्द करीत असे. कुबेरकान्ताच्या स्नानाच्या वेळी गंभीर व मधुर शब्द-गर्जना करणारा मेघ जवळच्या आकाश भागापासून सर्व रोग, घाम व मल दूर करणारे आणि सुगन्धी असे गंगेचे पाणी सोडीत असे ।। ३५-३६ ॥
दोन कल्पवृक्ष वस्त्रे आणि अलंकार देत असत आणि दुसरी कल्पवृक्षाची जोडी अन्न प पाणी देत असे ॥ ३७॥
याप्रमाणे देवांनी उत्पन्न केलेली सगळी भोगांची साधने नेहमी उपभोगणाऱ्या या कुबेरकान्ताचे प्राथमिक वय-बालपणाचे वय संपले ।। ३८ ।।
कुबेरकान्ताचे बालवय संपून जेव्हा तो तरुण झाला तेव्हा त्याचे माता-पिता एकाच पत्नीची अभिलाषा याला आहे का अनेक पत्नींची याला अभिलाषा आहे अशा संशयाने व्याकुळ झाले आणि त्यानी त्याच्या प्रियमित्राला प्रियसेनाला बोलावून घेतले व त्याने आपल्या कुबेरकान्त मित्राला प्रश्न करून त्याचे मनोगत काढून घेतले. बरोबरच आहे की दोघांचे मन एक असणे यालाच मित्रता म्हटले आहे ॥ ३९-४० ।।
___ या नंतर धनवती जी कुबेरमित्राची पत्नी तिच्याबरोबर उत्पन्न झालेला अर्थात् धनवतीचा भाऊ समुद्रदत्त नांवाचा होता व त्याच्याशी कुबेरमित्राच्या बहिणीचा विवाह झाला होता. तिचे नांव कुबेरमित्रा होते. या दोघांच्या कन्येचे नांव प्रियदत्ता असे होते. हिच्या दासीचे नांव रतिकारिणी होते. या समुद्रदत्ताला प्रियदत्ता वगैरे बत्तीस मुली होत्या. त्या सर्व सुंदर होत्या ॥४१-४२ ।।
तो उत्तम बुद्धिमान कुबेरमित्र एके वेळी बगीचात यक्षाची पूजा करण्याच्या वेळी काही उत्तम शकुनादिनिमित्ताने उत्तम परीक्षण' करून प्रियदत्तेला ही कुबेरकान्ताची पत्नी होण्याला
१टोप- चांगली मुलगी कोणती याची परीक्षा करण्याचा प्रकार असा .. कांही निमित्ताने मुलींना आपल्या घरी जेवायला बोलवावे. त्या आल्या असता त्यांच्या पुढे नाना प्रकारच्या पक्वान्नानी भरलेले एक एक ताट ठेवावे व एखाद्या ताटात कोणास समजू न देता एक रत्न घालावे. ते रत्न ज्या मुलीच्या पात्रात सापडेल ती मुलगी विवाहयोग्य समजावी.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org