Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६२८)
महापुराण
(४६-२६
तत्राभवत्प्रजापालः प्रजा राजा प्रपालयन् । फलं धर्मार्थकामानां स्वीकृत्य कृतिनां वरः ॥ २० कुबेरमित्रस्तस्यासीद्राजश्रेष्ठी प्रतिष्ठितः । द्वात्रिंशद्धनवत्याद्या भार्यास्तस्य मनःप्रियाः ॥२१ गहे तस्य समुत्तुङगे नानाभवनवेष्टिते । वसन्रतिवरो नाम्ना धीमान्पारावतोत्तमः ॥ २२ कदाचिद्राजगेहागतेन वैश्येशिना स्वयम् । स्नेहेन सस्मितालापः स्वहस्तेन समुद्धृतः ॥ २३ कदाचित्कामिनीकान्तकराब्जापितशर्करा । सम्मिश्रितान्सुशालीयतण्डुलानभिभक्षयन् ॥ २४ कदाचिच्छेष्ठिनोद्दिष्टहेतुदृष्टान्तपूर्वकम् । अहिंसालक्षणं धर्म भावयन्प्राणिने हितम् ॥ २५ कदाचिद्भवनायातयतिपादसरोजजम् । रेणुजालं निराकुर्वन्पक्षाभ्यां प्रत्युपागतः ॥ २६
- त्या नगरात पुण्यवंतात श्रेष्ठ, प्रजांचे रक्षण करणारा, धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांचे पालन करून त्यांच्या फलांचा उपभोग घेणारा असा प्रजापाल नांवाचा राजा होता ॥ २० ॥
या राजाच्या श्रेष्ठीचे नांव कुबेरमित्र असे होते. तो लोकात प्रतिष्ठावान् होता आणि त्याला धनवती आदिक बत्तीस पत्नी होत्या. त्या सर्व त्याच्या मनाला अतिशय आवडत होत्या ॥ २१ ॥
या श्रेष्ठीचा वाडा मोठा व उंच होता व अनेक घरांनी वेष्टित असा होता. या श्रेष्ठीच्या घरात रतिवर नांवाचा बुद्धिमान् आणि उत्तम असा एक पारवा राहात होता ॥२२॥
कोणे एकेवेळी तो सर्व व्यापा-यांचा स्वामी राजश्रेष्ठी राजवाड्यातून आपल्या घरी येऊन व प्रेमळपणाने व हसत मधुर भाषण करून त्या पारव्याला तो वारंवार आपल्या हातात घेत असे ॥ २३ ॥
केव्हा केव्हा तो पारवा सुंदर स्त्रियानी आपल्या करकमलानी दिलेले शर्करामिश्रित उत्तम तांदूळ भक्षण करीत असे ॥ २४ ॥
केव्हा केव्हा श्रेष्ठी हेतु व दृष्टान्तपूर्वक अहिंसा लक्षणयुक्त अशा धर्माचा उपदेश करीत असे व तो धर्म प्राण्याचे हित करतो अशी भावना, असे चिन्तन हा पारवा मनात करीत असे ।। २५ ॥
केव्हा केव्हा श्रेठीच्या वाड्यात आलेल्या यतीच्या चरणकमलावरील धूळ हा पारवा येऊन आपल्या दोन पंखानी नाहीशी करीत असे ।। २६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org