Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-१९)
( ६२७
तद्विलोक्य सपत्न्योऽस्याः श्रीमती सशिवङ्करा । पराश्च मत्सरोद्रेकादित्यन्योऽन्यं तदाब्रुवन् ॥ १० स्त्रीषु मायेति या वार्ता सत्या तामद्यकुर्वती । पतिमूर्च्छा स्वमूर्च्छायाः प्रत्ययीकृत्य मायया ॥ ११ पश्य कृत्रिम मूर्च्छात्तभावनाव्यक्तसंवृतिः । सततान्तस्थितप्रौढप्रेमप्रेरित चेतना ॥ १२ कन्याव्रतविलोपात्तगोत्रस्खलनदूषिता । पति रतिवरेत्युक्त्वायान्मूच्छ कुलदूषिणी ।। १३ इयं शीलवतीत्येवं निस्स्वनन्वर्णयत्ययम् । प्रायो रक्तस्य दोषोऽपि गुणवत्प्रतिभासते ॥ १४ प्रभावतीति सम्मृा कितवः कोपिनोमिमाम् । प्रतिसादयिषुः शोकं तत्प्रीत्या विदधाति नः ॥ १५ एनान् सर्वांस्तदालापान् जयोऽवधिविलोचनः । विदित्वा सस्मितं पश्यन्प्रियायाः स्मेरमाननम् ॥१६ कान्ते, जन्मान्तरावाप्तं विश्वं वृत्तान्तमावयोः । व्यावर्ण्यमां सभां तुष्टिकौतुकापहृतां कुरु ॥ १७ इति प्राचोदयत्सापि प्रिया तद्भाववेदिनी । कथां कथयितुं कृत्स्नां प्राक्रस्त कलभाषिणी ॥ १८ इह जम्बूमतिद्वीपे विदेहे प्राचि पुष्कलावती । विषयमध्यस्था नगरी पुण्डरीकिणी ॥। १९
महापुराण
सुलोचनेने पारव्याचे जोडपे पाहिले व हे रतिवरा असे म्हणून ती मूच्छित झाली. हे पाहून श्रीमति, शिवंकरा आणि इतरही तिच्या सवतींच्या मनात मत्सर उत्पन्न झाला व त्यामुळे आपसात त्या असे बोलू लागल्या ।। १० ।
स्त्रियामध्ये कपट असते असे जे म्हणणे आहे ते सत्य आहे असे आज हिने दाखविले. आपणास मूर्च्छा येण्यास पतीची मूर्च्छा कारण आहे असे हिने मायेने दाखविले. कपटाने आणलेल्या मूर्च्छने तिने आपला अभिप्राय स्पष्टपणे झाकला. पण मनात असलेले जे प्रौढ प्रेम त्यामुळे तिची चेतना जागृत झाली व कन्याव्रताचा विलोप केल्यामुळे तिच्या मुखातून गोत्रस्खलन झाले. अर्थात् दुसन्या पतीच्या नामोच्चरणाने ही दूषित झाली आहे. आपल्या कुलाला दूषित करणा-या या सुलोचनेने आपल्या पहिल्या पतीला रतिवरा असे बोलून ही बनावटी मूर्च्छला प्राप्त झाली. पण हा आमचा पति जयकुमार ही शीलवती आहे असे म्हणून हिचे वर्णन करीत आहे. बरोबरच आहे अनुरक्त झालेल्या व्यक्तीला दोष देखिल गुणाप्रमाणेच वाटत असतो ।। ११-१४ ॥
प्रभावती हे प्रभावती असे म्हणून व मूच्छित होऊन या रागीट स्त्रीला प्रसन्न करण्याच्या इच्छेने हा धूर्त राजा तिच्यावरील प्रीतीने आम्हाला दुःखी करीत आहे ।। १५ ।। ज्याला अवधिज्ञानरूपी डोळा आहे अशा जयकुमाराने सुलोचनेच्या सवतींची ही भाषणे जाणली व हसत हसत त्याने आपल्या पत्नीचे हास्ययुक्त प्रफुल्लित मुखाकडे पाहिले ॥ १६ ॥
व तो म्हणाला, 'हे कान्ते आपल्या दोघांचे पूर्वजन्मी झालेले सर्व वृत्त तू विस्ताराने सांग आणि या सभेला आनंद व आश्चर्य उत्पन्न कर ' ।। १७ ।।
असे बोलून त्याने तिला कथा सांगण्यास प्रेरित केले. आपल्या पतीचा अभिप्राय जाणणारी व मधुर भाषण करणारी अशा सुलोचनेने संपूर्ण कथा सांगण्यास सुरुवात केली ॥ १८॥ या जंबूद्वीपातील पूर्वविदेहक्षेत्रात पुष्कलावती नामक देशाच्या मध्यभागी पुण्डरीकणी नावाचे नगर आहे ॥ १९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org