Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६-३५)
महापुराण
(६२९
स कदाचिद्गतिः का स्यात्पापापापात्मनामिति । कुतूहलेन पृष्टः सन् जनस्तुण्डेन निर्दिशन् ॥ २७ अधोभागमथोवं च मौनीवागमपारगः । क्षयोपशममाहात्म्यात्तियंचोऽपि विवेकिनः ॥ २८ क्रीडन्नानाप्रकारेण कान्तया रतिषेणया। सार्धमेव चिरं तत्र सुखं कालमजीगमत् ॥ २९ असौ रतिवरः कान्तस्त्वमहं सा तव प्रिया । रतिषणा भवावर्ते जन्तुः कि कि न जायते ॥ ३० सुतः कुबेरमित्रस्य धनवत्याश्च पुण्यवान् । जातः कुबेरकान्ताख्यः कुबेरो वापरः सुधीः ॥ ३१ द्वितीय इव तस्यासीत प्राणः सोनुचराग्रणीः । प्रियसेनाह्वयो बाल्यादारभ्य कृतसङगतिः ।। ३२ आजन्मनः कुमारस्य कामधेनुरनुत्तमा । मनोऽभिलषितं दुग्धे समस्तसुखसाधनम् ॥ ३३ क्षेत्रं निष्पादयत्येकं गन्धशालीमनारतम् । इर्नमृतदेशीयानन्यत्स्थूलांस्तनुत्वचः ॥ ३४ स्वयं मनोहरं वीणा दध्वनीति निरन्तरम् । तत्स्नानसमये सर्वरोगस्वेदमलापहम् ॥ ३५
या रतिवर पारव्याला एखादे वेळी 'हे रतिवरा, जे पापी लोक आहेत व जे अपापपुण्यवान् लोक आहेत त्याना कोणती गति प्राप्त होते' असे कौतुकाने लोकानी विचारले असता तो आपले तोंड खाली आणि वर करून क्रमाने उत्तर देत असे. जसा एखादा आगमाच्या दुसन्या किना-याला गेलेला मौनव्रती आपले तोंड खाली व वर करून उत्तर देतो तसे हा पारवा उत्तर देत असे. पापी लोकाना मरणोत्तर अधोगति-नरकगति होते व निष्पाप लोकाना उर्ध्वगति
गति प्राप्त होते. बरोबरच आहे की, ज्ञानावरणकर्माच्या क्षयोपशमाने पशपक्षी देखिल विवेकी होतात ।। २७-२८॥
आपल्या रतिषणाकान्तेबरोबर अनेक प्रकारच्या क्रीडा करणारा तो रतिवर दीर्घकालपर्यन्त सुखाने राहिला ।। २९ ॥
येथे सुलोचना जयकुमाराला म्हणते की तो रतिवर म्हणजे आपण माझे पति होता व मी रतिषेणा आपली प्रियपत्नी होते. या संसाराच्या भोवऱ्यात प्राण्याला कोणकोणती अवस्था प्राप्त होत नाही बरे ? ॥ ३० ॥
या कुबेरमित्र व धनवती श्रेष्ठीला एक पुण्यवान् कुबेरकान्त नांवाचा पुत्र झाला व तो सुबुद्धिमान् जणु दुसरा कुबेर आहे असे वाटत असे ।। ३१ ।।
या कुबेरकांताचा जणु दुसरा प्राणच असा व बालपणापासून जो त्याच्याबरोबर राहत असे असा प्रियसेन नांवाचा सर्वमित्रामध्ये श्रेष्ठ असा मित्र होता ।। ३२ ॥
या कुबेरकान्ताची त्याच्या जन्मापासून त्याच्याजवळ राहणारी एक अनुपम उत्तम कामधेनु होती, तो त्याच्या मनाने इच्छिलेले सर्व सुखसाधक पदार्थ देत असे ।। ३३ ।।
या कुबेरकान्ताचे एक शेत होते व ते नेहमी सुगन्धित अशा साळी पिकवीत असे आणि दुसरे शेत ज्यांचो साल पातळ आहे व जे स्थूल आणि अमृताप्रमाणे ज्यांचा रस आहे असे ऊस नेहमी पिकवीत असे ।। ३४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org