Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६३२)
महापुराण
(४६-६३
भुत्वा तद्वचनं राजा सभीराहूय मातुलम् । नागन्तव्यमनाहूतैरित्यनालोच्य सोऽब्रवीत् ॥ ५६ पश्चाद्विषविपाकिन्यः प्रागनालोचितोक्तयः । श्रेष्ठी तद्वचनात्सद्यः सोद्वेगं स्वगृहं ययौ ॥ ५७ राजा कदाचित्प्रावाजीद्धटया ललिताख्यया। विहाराथं वनं तत्र वाप्यामालोक्य विस्मयात् ॥५८ सटशुष्काङघ्रिपासन्नशाखाग्रस्थः परिस्फुरन् । परायो वायसानीतःपद्मरागमणिप्रभाम् ॥ ५९ मणि मत्वा प्रविश्यान्त षु केनाप्यलम्भ्यसौ। भ्रान्त्या प्रवर्तमानानां कुतः क्लेशाद्विना फलम् ॥६० चिरं निरीक्ष्य निविण्णाः सर्वे ते परमागमन् । बुद्धिर्नाग्रेसरी यस्य न निर्बन्धः फलत्यसौ ॥ ६१ कदाचिदभपतिः श्रष्ठिसुतया रक्तचित्तया। वसुमत्या विभावर्यामात्मसौभाग्यसूचिना ॥ ६२ क्रमेण कुङकुमाईण ललाटे स्फुटमडकितः । कान्ताः किं किं न कुर्वन्ति स्वभागपतिते नरे॥
आपल्याजवळ घेऊन बसत जाऊ नकोस, कार्याच्या वेळी त्याला बोलावीत जा. त्यानेही ते सर्व मान्य केले व तसे त्याने देवतेप्रमाणे अदृश्य होऊन बोलून दाखविले. यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही व द्रव्यलोभी मनुष्याने न करण्यासारखे जगात काहीच नाही ।। ५०-५५ ॥
अदश्यव्यवतीचे ते भाषण ऐकन राजा भ्याला व त्याने आपल्या मामाला बोलावन असे सांगितले- अहो मामा, आपण न बोलावता येऊ नये. हे राजाने विचार न करता भाषण केले ॥ ५६ ॥
पूर्वी न विचार करता जे भाषण केले जाते ते मागावून विषाप्रमाणे वाईट परिणाम करणारे होते. राजाच्या या भाषणाने श्रेष्ठी खिन्न होऊन तत्काल आपल्या घरी गेला ॥ ५७ ॥
कोणे एके वेळी राजा ललितघट नामक हत्तीवर बसून विहार करण्यासाठी वनात गेला आणि तेथे त्याने विहिरीत पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. विहिरीच्या तटावर एक वाळलेले झाड होते व त्याच्या फांदीच्या अग्रभागात चमकणारा अमूल्य पद्मरागमणि होता. तो तेथे एका कावळ्याने आणला होता. त्या मण्याच्या प्रभेला मणि समजून लोकानी विहिरीत प्रवेश केला पण कोणीही मिळवू शकला नाही. भ्रान्तीने प्रवृत्त झालेल्या लोकाना क्लेशाशिवाय दुसरे कोणते फल प्राप्त होणार ? ॥ ५८-६० ॥
पुष्कळ वेळपर्यन्त मण्याचा शोध करून ते सर्व लोक थकले व नगराकडे आले. बरोबरच आहे की, ज्या प्रयत्नाला बुद्धीचा पाठिंबा मिळत नाही तो प्रयत्न सफल होत नाही ॥ ६१ ।।
जिचे मन राजावर अनुरक्त झाले अशा श्रेष्ठीच्या व सुमतिनामक मुलीने कोणे एके वेळी रात्री वापल्या सौभाग्याला सुचविणारा व केशराने ओला झालेला अशा आपल्या पायाने राजाच्या कपाळावर स्पष्ट छाप उमटविला, चिह्न उमटविले. हे बरोबरच आहे की पुरुष आपल्या आधीन झाला असता स्त्रिया काय काय करीत नाहीत बरे ।। ६२-६३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org